भारत आणि इस्रायल परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणार

0

भारत आणि इस्रायल यांनी बुधवारी, दीर्घकालीन रणनीतिक दृष्टिकोनाला प्राधान्य देत, आधीपासूनच मजबूत असलेले परस्पर संरक्षण सहकार्य आणखी दृढ करण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्लीत, भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान हा महत्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी संरचनात्मक आराखडा निर्माण करण्याच्या दिशेने काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.”

मेजर जनरल बाराम यांनी यावेळी, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या लढाईला, इस्रायलचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांना प्रतिसाद देताना राजेश कुमा सिंग यांनी, भारताची दहशतवादाच्या विरोधातील भारताची ‘शून्य सहिष्णुता’ नीती पुन्हा अधोरेखित केली. तसेच 7 ऑक्टोबर 2023 रोजी, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि सर्व बंधकांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी, अशी मागणीही केली.

दोन्ही प्रतिनिधीमंडळांनी, जुलै 2024 मध्ये झालेल्या संयुक्त कार्यकारी गटाच्या बैठकीनंतर सुरू असलेल्या संरक्षण सहकार्य उपक्रमांतील प्रगतीचा आढावा घेतला. “इस्रायली महासंचालकांचा हा दौरा भारत-इस्रायल संरक्षण संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, दोन्ही देशांची रणनीतिक भागीदारी दृढ करण्याच्या दृढनिश्चयाला बळकटी देणारा आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

7 ते 10 मे दरम्यान, पाकिस्तानसोबतच्या सीमापार संघर्षात “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारताने इस्रायली बनावटीच्या अनेक शस्त्र प्रणालींचा वापर केला. यामध्ये हारोप आणि हार्पी या “कामीकाझे” ड्रोनचा देखील समावेश होता. हे लोटरिंग म्युनिशन प्रकारातील ड्रोन आहेत, जे एखाद्या क्रूझ क्षेपणास्त्रासारखे शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण तळांवर खोलवर जाऊन हल्ला करतात.

भारताने इस्रायलसोबत संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘बाराक-8’ या मध्यम पल्ल्याच्या, जमिनीवरुन आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींचा देखील ऑपरेशन सिंदूरमध्ये वापर केला. या प्रणालींचा उपयोग भारताच्या लेअर्ड हवाई संरक्षण व्यवस्थेचा भाग म्हणून करण्यात आला, जेणेकरून पाकिस्तानकडून लॉन्च करण्यात आलेल्या तुर्की ड्रोन आणि चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करणे भारताला सोपे गेले.

भारत आणि इस्रायल या दोन महाशक्तींमधील वाढती संरक्षण भागीदारी, दोन्ही देशांकरिता भविष्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे असे म्हणता येईल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा, भारत चिनी नागरिकांना Tourist Visa देऊ करणार
Next articleफिलीपिन्स अध्यक्षांच्या आगामी भारत दौऱ्यात सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here