भारत-मलेशिया संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी, द्विपक्षीय पुढाकार

0

मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीची (MIDCOM) 13 वी बैठक, मलेशियांच्या कुआलालंपूरमध्ये 19 फेब्रुवारी रोजी पार पडली. ज्यामध्ये भारत आणि मलेशियाने आपापसांतील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. तसेच गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील लष्करी संवादात, सातत्याने वाढ होत असल्याचेही सांगितले.

भारताचे संरक्षण सचिव- राजेश कुमार सिंग आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव- जनरल लोकमन हकीम बिन अली, यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी व्यावहारिक आणि प्रभावी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही पक्षांनी सायबरसुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांत अधिक सखोल सहकार्य करण्याचे वचन दिले.

सिंग यांनी, भारताच्या संरक्षण उद्योगाची ताकद अधोरेखित केली आणि मलेशियाच्या लष्करी दलांच्या क्षमता वाढीसाठी व आधुनिकीकरणासाठी औद्योगिक भागीदारीद्वारे त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली.

संवेदनशील संरक्षण क्षेत्रातील नवीन उपक्रमांची पूर्णत: अंमलबजावणी करण्यासाठी, दोन्ही देशांनी यावेळी आपल्या प्रयत्नांना दुजोरा दिला, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियन पंतप्रधान दातो सिरि अन्वर इब्राहीम, यांच्या ऑगस्ट 2024 मधील भारत दौऱ्यादरम्यान, निश्चीत केलेल्या दृष्टीकोनाशी सुसंगत होता.

नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीचा एक महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे, स्ट्रॅटेजिक अफेअर्स वर्किंग ग्रुप स्थापनेसाठी अंतिम केलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) चे झालेले आदान-प्रदान. हा गट MIDCOM आणि त्याच्या उपसमितींमध्ये एक मध्यवर्ती सल्लागार यंत्रणा म्हणून कार्य करेल, ज्याचा उद्देश सर्व प्रकारच्या संरक्षण सहकार्याच्या पैलूंना पुढे नेणे हा असेल.

तसेच, भारतीय आणि मलेशियन वायुसैन्यांमधील सहकार्य वाढवण्यासाठी, दोन्ही पक्षांनी Su-30 फोरम स्थापन करण्याचे औपचारिक कार्यही यावेळी केले. या फोरमद्वारे Su-30 विमानांच्या देखभालीत कौशल्य आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होईल, ज्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा आणि इंटरऑपरेबिलिटी (सहकार्य क्षमता) वाढेल.

या बैठकीत, भारत आणि मलेशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सहकार्यावर आधारित दृष्टीकोन ठरवला गेला, ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये दोन्ही देशात अधिक सखोलपणे सहकार्याचे मार्ग खुले राहतील.

टीम भारतशक्ती


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here