भारत आणि मंगोलिया यांच्यातील संयुक्त लष्करी कवायतींना मेघालयात सुरुवात

0
मंगोलिया
भारत-मंगोलिया-संयुक्त-लष्करी-सराव- नोमॅडिक एलिफंटचा - मेघालयात शुभारंभ

भारत आणि मंगोलिया यांच्या सैन्यांमधील संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट’ चे 16 वे सत्र आज मेघालयच्या उमरोई येथे सुरू झाले आहे. दोन आठवड्यांचा हा सराव 16 जुलै रोजी संपेल, असे भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) आयएचक्यूमधील अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयाने सांगितले की, या सरावाचा उद्देश अर्ध-शहरी/डोंगराळ प्रदेशात अर्ध-पारंपारिक मोहिमांदरम्यान दोन सैन्यांमधील आंतरसंचालनीयता (interoperability) वाढवणे हा आहे.

भारतीय तसेच मंगोलियन लष्कर यांच्यातील ‘नोमॅडिक एलिफंट’ हा संयुक्त लष्करी सराव 3 ते 16 जुलै दरम्यान मेघालयातील उमरोई येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार निमशहरी/डोंगराळ प्रदेशात अर्ध-पारंपरिक मोहिमा आयोजित करण्यासाठी दोन्ही सैन्यांमधील आंतरसंचालनीयता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या आयएचक्यूने एका ट्विटद्वारे म्हटले आहे.

नोमॅडिक एलिफंट (NOMADIC ELEPHANT)  हा एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो मंगोलिया आणि भारतात आलटून पालटून आयोजित केला जातो.संरक्षण मंत्रालयाच्या आधीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘नोमॅडिक एलिफंट’ या संयुक्त लष्करी सरावाचे 15वे सत्र मंगोलियाच्या उलानबाटार येथे आयोजित करण्यात आले होते. मंगोलियन सशस्त्र सेना युनिट 084 चे सैनिक तसेच जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे भारतीय सैन्याचे सैनिक या सरावात सहभागी झाले होते.

यावर्षी मे महिन्यात, भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयांच्या  संयुक्त कृती गटाची (जेडब्ल्यूजी) 12वी बैठक मे महिन्यात उलानबाटार येथे पार पडली. या बैठकीत विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आणि दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी कसे वाढवता येईल या दृष्टीने आढावा घेण्यात आला.

शिवाय, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीवरही दोन्ही गटांनी विचारांची देवाणघेवाण केली. शिष्टमंडळाने भारतीय संरक्षण उद्योगाची कुवत आणि क्षमता अधोरेखित केली. तसंच मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबत फलदायी भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली. मंगोलियन शिष्टमंडळाने भारतीय उद्योगाची कुवत आणि क्षमता यावर आपला विश्वास असल्याचं सांगितलं. यानिमित्ताने दोन्ही देशांमधील वाढत्या संबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सातत्याने परस्पर सहकार्य आणि संबंधांच्या गरजेवरही यावेळी भर दिला गेला.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleWhy Ajit Doval Remains Central To India’s National Security Architecture
Next articleYemen’s Houthi Rebels Claim To Attack Israeli Port City Of Haifa Again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here