भारत–नेपाळ यांच्यातील क्रीडा संबंधांना चालना; क्रिकेट सहकार्याचाही विस्तार

0

नेपाळच्या क्रिकेट विकासासाठी भारताने दिलेली मदत, भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांचा एक स्थिर आधारस्तंभ बनत आहे. हे भारताच्या ‘Neighbourhood First’ या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे. पुढील महिन्यात, नेपाळचा राष्ट्रीय क्रिकेट संघ बंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षण शिबिरासाठी दाखल होणार आहे.

हे प्रशिक्षण शिबिर, 20 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार असून, याचा उद्देश नेपाळ संघाला यावर्षी ओमानमध्ये होणाऱ्या ICC Men’s T20 वर्ल्ड कप क्वालिफायरसाठी तयार करणे हा आहे.

भारत सरकारच्या पुढाकाराने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि नेपाळ क्रिकेट असोसिएशन (CAN) यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत. याआधी दोन वर्षांत अशाच स्वरूपाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे, नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघ व CAN अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नेपाळमधील क्रिकेटला भारताकडून सातत्यपूर्ण पाठबळ राहील, अशी पुनःपुष्टी केली. या सहकार्यांत कोचिंग कॅम्प्स, भारतीय राज्य संघांसोबत स्पर्धात्मक सामने आणि युवक क्रिकेट स्तरावरील आदानप्रदान यांचा समावेश होता, ज्यामुळे नेपाळमध्ये अधिक मजबूत क्रिकेटिंग टॅलेंट निर्माण होण्यास मदत होत आहे.

वरिष्ठ संघांबरोबरच, भारताने नेपाळच्या १९ वर्षांखालील आणि महिला क्रिकेट संघांनाही सहाय्य केले आहे. यामध्ये नेपाळच्या महिला संघाने मे महिन्यात थायलंडमध्ये झालेल्या ICC महिला आशिया वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये अंतिम फेरी गाठण्याआधी दिल्लीत प्रशिक्षण घेतले होते, हे विशेष उल्लेखनीय आहे. तसेच, उदयोन्मुख युवक क्रिकेटपटूंना भोपाळ आणि इतर ठिकाणी विशेष कोचिंग प्रोग्राम्समधून प्रशिक्षण देण्यात आले.

नेपाळचे पंतप्रधान लवकरच भारत दौऱ्यावर

ही वाढती क्रीडा भागीदारी अशा काळात घडत आहे, जेव्हा नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, जुलै 2024 मध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांचा भारत दौरा होण्याची शक्यता आहे, तुर्कमेनिस्तानमधील संयुक्त राष्ट्र परिषदेनंतर.

आपल्या कार्यकाळातील ओली यांचा पहिला दौरा, नोव्हेंबर 2024 मध्ये चीन येथे झाला होता. त्यानंतर होणारा भारत दौरा काहीसा उशिरा ठरला असला, तरी द्विपक्षीय संवाद कायम सक्रिय राहिला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, ओली यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून घडलेल्या हिंसेचा निषेध केला होता. याचवर्षी दोन्ही नेते बँकॉकमधील BIMSTEC शिखर परिषदेच्या वेळी देखील भेटले होते.

दोन्ही देशांमधील 1700 किलोमीटरहून अधिक लांबीची सामायिक सीमा, तसेच सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि नेपाळने परस्पर उच्चस्तरीय दौरे नियमितपणे सुरू ठेवले आहेत. दोन्ही देशात 2014 पासून आतापर्यंत राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखांच्या स्तरावरील 17 अधिकृत दौरे झाले आहेत, जे परस्पर संबंधांचे महत्त्व दर्शवतात.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleAt Last, British F-35B Fighter Jet Takes Off from Kerala after Extended Stay
Next articleIndia’s First Army Apaches Arrive at Hindon, Marking Major Leap in Indo-US Defence Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here