भारताच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणी तयारीने जगाचे लक्ष वेधले

0
क्षेपणास्त्र
प्रातिनिधिक छायाचित्र  
भारत बंगालच्या उपसागरावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत आहे, ज्यासाठी आता 3 हजार 550 किलोमीटरचा नो-फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे. ही चाचणी 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत चाचणी क्षेत्राच्या घोषित पल्ल्यात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जागतिक संरक्षण विश्लेषकांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे.

भारत सरकारने एअरमेनला नोटीस (NOTAM) आणि सागरी सुरक्षा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये पूर्व समुद्रकिनारी असलेल्या विस्तृत भागात “धोक्याचे क्षेत्र” दर्शविले गेले आहे. क्षेपणास्त्राच्या प्रकाराची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसली तरी, ते अग्नी मालिकेचा भाग असल्याचा अंदाज मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जात आहे. हा भारताचा अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समूह आहे.

72 तासांमध्ये तीन वेळा टेस्ट रेंज वाढवली

6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या भारताच्या नवीन NOTAM मध्ये सुरुवातीला 1 हजार 480 किलोमीटरची टेस्ट रेंजचा उल्लेख होता. दुसऱ्या दिवशी ती सुधारित करून 2 हजार 520 किलोमीटर करण्यात आली, नंतर 24 तासांत पुन्हा 3 हजार 550 किलोमीटर करण्यात आली. रेंजमधील अशा बदलांमुळे तज्ज्ञांच्या मते आगामी प्रक्षेपणात सुरुवातीला अपेक्षेपेक्षा अधिक विस्तारित पोहोच असलेले क्षेपणास्त्र असू शकते.

अग्नी क्षेपणास्त्र मालिकेत 700 ते 5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त श्रेणी असलेल्या प्रणालींचा समावेश आहे. भारताने अलिकडेच 25 सप्टेंबर रोजी अग्नी-प्राइमची चाचणी केली, जी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाद्वारे (DRDO) विकसित केलेली आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे (SFC) चालवली जाणारी 2 हजार किलोमीटरची रेंज असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

चीन आणि अमेरिकेच्या पाळत ठेवणाऱ्या जहाजांची उपस्थिती

भारत या चाचणीची तयारी करत असताना, हाती आलेल्या वृत्तानुसार चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांची पाळत ठेवणारी जहाजे हिंद महासागरातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. क्षेपणास्त्र ट्रॅकिंग क्षमतेसाठी ओळखले जाणारे चिनी जहाज युआन वांग 5 मलेशियातील पोर्ट क्लांग येथून निघाले असून ते हिंद महासागराकडे जात असल्याचे मानले जाते. दरम्यान, अमेरिकेचे जहाज ओशन टायटन देखील भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अशा तैनातींचा वापर अनेकदा क्षेपणास्त्र मार्ग आणि प्रणालीच्या कामगिरीबाबतची इत्यंभूत माहिती गोळा करण्यासाठी केला जातो आणि प्रमुख प्रादेशिक शक्तींकडून शस्त्रास्त्र चाचणी दरम्यान असे वर्तन हे सामान्य असते.

धोरणात्मक संदर्भ काय आहे

चाचणी करायच्या क्षेपणास्त्र प्रणालीबद्दल कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नसली तरी, अलिकडच्या काळात रेंजमध्ये करण्यात आलेला विस्तार आणि मॉनिटरिंग जहाजांची हिंद महासागरातील उपस्थिती हे उच्च-श्रेणी प्लॅटफॉर्मच्या चाचणीकडे निर्देश करणारे आहेत. भारत विश्वासार्ह किमान प्रतिबंधक धोरण राखत असला तरी, अशा घडामोडी अनेकदा सुरक्षा नियोजन आणि प्रादेशिक प्रतिबंधक धोरणाशी संबंधित व्यापक उद्दिष्टे प्रतिबिंबित करतात.

संरक्षण वर्तुळातील निरीक्षक येत्या काळात टेस्ट विंडोवर बारकाईने लक्ष ठेवणार हे नक्की.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारत-चीन मधील ‘बाराहोती’ संदर्भातील वाद लवकरच सुटणार का?
Next articleOver Half of Defence Modernisation Budget for FY2025-26 Utilised by September

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here