मालदीवचे परराष्ट्रमंत्री म्हणतात भारत नेहमीच आमचा जवळचा सहकारी

0
मालदीवचे

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालदीवचे परराष्ट्रमंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेल्या विशेष मुलाखतीचा हा सारांश

शपथविधी सोहळ्याच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रपतींना सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे, असे मंत्री म्हणाले. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष “भारताशी असणारे आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी (भारतीय) पंतप्रधानांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशाची धुरा सांभाळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॉ. मुइझ्झू यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आम्हाला विश्वास आहे की हा दौरा मालदीव-भारत संबंधांसाठी सकारात्मक दिशा दाखवणारा ठरेल.”

मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांची विशेष मुलाखत

या मुलाखतीच्या निमित्ताने भारत आणि मालदीवमध्ये भूतकाळातील ताणले गेलेले संबंध आणि दोन्ही देशांमध्ये सुरू होऊ शकणाऱ्या नवीन संबंधांबद्दल मंत्र्यांना विचारले. याबाबत मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, “मालदीव भारताला आपला सर्वात जवळचा शेजारी आणि विकास भागीदार मानतो. म्हणूनच मालदीव भारतासोबतच्या भागीदारीला महत्त्व देतो.” “उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राष्ट्राध्यक्षांचा नवी दिल्ली दौरा या संबंधांचे महत्त्व अधोरेखित करतो. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राष्ट्राध्यक्ष नवी दिल्लीला येत आहेत, हे आपल्या संबंधांना आपण किती महत्त्व देतो हेच दर्शवणारे आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

मालदीव-भारत संबंध

सर्व बाबींचा विचार करता, भारताशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांनी भर दिला. मे महिन्यात झालेल्या एका यशस्वी दौऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यात दोन्ही बाजूंनी सहकार्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला होता. संबंध मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्यावर आम्हाला विश्वास आहे,” असे सांगत त्यांनी मालदीवचा सर्वात जवळचा मित्र आणि विकास भागीदार म्हणून भारताच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

याशिवाय मालदीव-भारत संबंधांचा अधिक विस्तार करण्याच्या महत्त्वावर मंत्र्यांनी भर दिला. मे 2024 च्या यशस्वी दौऱ्याबद्दल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, “दोन्ही देश परस्पर विकासाच्या दृष्टीने त्यांच्या भागीदारीत वाढ करण्यासाठी वचनबद्ध आहेत. हे संबंध यानंतरच्या काळात सातत्याने बहरत जातील अशी आशा आहे. राष्ट्राध्यक्षांच्या भेटीमुळे मालदीव-भारत संबंध आणखी दृढ होतील,” अशी अपेक्षा असल्याचे मंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “एक प्रमुख सहकारी आणि भागीदार म्हणून भारताचा कायमस्वरूपी पाठिंबा मान्य केला जातो आणि त्याचे कौतुक केले जाते,” असे त्यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले.

शपथविधी सोहोळ्यात सागर उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे उपस्थित राहणार आहेत. यापैकी सेशेल्स, मॉरिशस, मालदीव हे भारताच्या सागर उपक्रमातील भागीदार देश आहेत.

अमिताभ पी. रेवी


Spread the love
Previous articleनौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर ‘पायलट’ दाखल होणार
Next articleModernisation Of Indian Artillery Picks Up Pace

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here