भारत आणि श्रीलंका यांनी संरक्षण सहकार्यासाठी प्रथमच MoU (सामंजस्य करार) साइन केले
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार डिसानायक, यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर शनिवारी कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी संरक्षण सहकार्यासाठीच्या प्रथम MoU वर स्वाक्षरी केली.
कराराची माहिती देताना, भारतीय सरकारने एक निवेदन जारी करत म्हटले की, “संघराज्य भारत सरकार आणि श्रीलंका प्रजासत्ताक सरकार यांच्यातील संरक्षण सहकार्यासाठीचे MoU साईन झाले.”
या दोन शेजारी देशांनी, संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत, ‘त्रिंकोमाली’ला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी त्रिपक्षीय करारावरही स्वाक्षरी केली.
भारत आणि श्रीलंकेने यावेळी एकूण 7 MoUs साईन केले.
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धती
श्रीलंकेचे संरक्षण सचिव संपथ थुयाकोंथा यांनी, डेली मिरर वृत्तपत्राला सांगितले की, “प्रस्तावित MoU अंतर्गत केलेल्या कोणत्याही सहकार्य क्रियाकलeपांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींनुसार पूर्ण केले जाईल. तसेच हे करार श्रीलंका किंवा भारताच्या स्थानिक कायद्यांशी आणि राष्ट्रीय धोरणांशी कुठल्याप्रकारचा संघर्ष करत नाही.”
“श्रीलंका आणि भारत यांच्यात दशकांपासून सौहार्दपूर्ण संरक्षण संबंध आहेत, ज्यामध्ये संरक्षण संवाद, संयुक्त लष्करी आणि नौदल सराव, प्रशिक्षण आणि कार्यशाळांचा समावेश आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“दरवर्षी, भारत श्रीलंकेच्या सुमारे 750 लष्करी कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण प्रदान करतो. भारत-श्रीलंका संरक्षण भागीदारी ही श्रीलंकेसाठी एक अमूल्य संसाधन ठरली आहे आणि ती पुढेही ठरेल,” असे थुयाकोंथा वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हणाले.
संरक्षण संवादादरम्यान, दोन्ही पक्षांनी 2023 मध्ये ‘संरक्षण भागीदारी आणि सहभागांना’ अधिक प्रभावीपणे आणि संरचित पद्धतीने पुढे वाढवण्यासाठी आणि संरक्षण सहकार्यासाठी, औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यावर सहमती दर्शवली.
“यावेळी MoU चे सखोल पुनरावलोकन आणि तपासणी केली गेली. श्रीलंकेच्या राष्ट्रपती सचिवांनी, यावर्षी जानेवारीमध्ये परदेशी सरकारांसोबतच्या संवादांविषयी दिलेल्या परिपत्रकानुसार संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या मंजुरीची योग्य प्रकारे स्विकृती घेतली गेली,” असेही त्यांनी सांगितले.
“हे MoU पाच वर्षांसाठी प्रभावी राहतील आणि करार समाप्त करण्याचे अधिकार पक्षांकडे असतील, परंतु तीन महिन्यांची आगाऊ सूचना देऊन. याशिवाय परस्पर सहमतीने करार तीन वर्षांसाठी पुढे चालू देखील ठेवले जाऊ शकते, मात्र साधल्या गेलेल्या प्रगतीचे पुनरावलोकन करून आणि द्विपक्षीय इच्छेनुसार निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती थुयाकोंथा यांनी दिली.
मोदींचे औपचारिक स्वागत
मोदी, जे शुक्रवारी संध्याकाळी श्रीलंकेत पोहोचले, त्यांचे शनिवारी सकाळी कोलंबोमधील इंडिपेंडन्स स्क्वेअरवर औपचारिक स्वागत करण्यात आले.
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी मोदींचे इंडिपेंडन्स स्क्वेअरवर स्वागत केले.
शुक्रवारी संध्याकाळी बँडरनाईक इंटरनॅशनल एअरपोर्टवर श्रीलंकेच्या पाच प्रमुख मंत्र्यांसह, परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ यांनी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांनी X वर लिहीले की, “मी कोलंबोला पोहोचलो तेव्हा विमानतळावर माझे स्वागत करणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आणि मान्यवरांचे आभार. श्रीलंकेत आयोजित कार्यक्रमांची मी उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहे.”
BIMSTEC शिखर परिषद
मोदी हे पहिले परदेशी नेते आहेत, ज्यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती डिसानयके एक ‘राष्ट्राध्यक्ष’ म्हणून होस्ट करत आहेत.
मोदी श्रीलंका येथे, BIMSTEC शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर, श्रीलंकेत पोहोचले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)