म्यानमारमधून थायलंडला पळून गेलेले 500 भारतीय लवकरच मायदेशी येणार

0
म्यानमारच्या सैन्याने अलीकडेच लक्ष्य केलेल्या ऑनलाइन घोटाळा केंद्रांच्या परिसरातून पळून जाऊन थायलंडमध्ये प्रवेश केल्यानंतर थाई अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या आपल्या सुमारे 500 नागरिकांना परत आणण्याची भारत तयारी करत आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दुजोरा दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, बँकॉकमधील भारतीय दूतावास थाई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, जेणेकरून ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांची ओळख पटवून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते सुरक्षितपणे परत येऊ शकतील.

“थायलंडच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या भारतीय नागरिकांची आम्हाला माहिती आहे. ते मागील काही दिवसांमध्ये म्यानमारमधून थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. थायलंडमधील आमचे मिशन थायलंडच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या राष्ट्रीयतेची पडताळणी करण्यासाठी आणि थायलंडमध्ये आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी काम करत आहे,” असे जयस्वाल म्हणाले.

म्यानमारच्या सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या अनेक ऑनलाइन केंद्रांवर घोटाळे सुरू असल्याचे समजताच म्यानमारच्या लष्कराने छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. केके पार्क नावाच्या केंद्रासह अनेक केंद्रांवर परदेशी कामगारांना सायबर गुन्हे आणि फसव्या ऑनलाइन घटनांमध्ये भाग घेण्यासाठी जबरदस्ती करणे किंवा दिशाभूल केल्याचा या केंद्रांवर आरोप आहे. छापे टाकल्यानंतर, शेकडो कामगार – ज्यात भारतीय नागरिकांचाही समावेश होता – अटक किंवा पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी मोई नदी ओलांडून थायलंडच्या टाक प्रांतात पळून गेले.

थायलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्ती दोन डझनहून अधिक देशांमधून आले होते, त्यापैकी अनेकांनी बनावट नोकरीच्या ऑफरद्वारे तस्करी किंवा फसवणूक केल्याचा दावा केला आहे.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी पुष्टी केली की जवळजवळ 500 भारतीय नागरिक सध्या म्यानमारजवळील सीमावर्ती शहर माई सोटमध्ये आहेत. त्यांनी असेही सांगितले की थाई अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत विमान पाठवण्याची योजना आखत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पडताळणी प्रक्रिया, कायदेशीर औपचारिकता आणि ताब्यात घेतलेल्यांची सुरक्षित मायदेशी पाठवणी करणे याला प्राधान्य दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी तस्करीचे बळी ठरलेल्या नागरिकांना मदत करणे आणि त्यांना पुन्हा आपापल्या देशात एकत्रितपणे परत पाठविण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे.

या सगळ्या परिस्थितीवरून असे दिसून आले आहे की आग्नेय आशियातील काही भाग ऑनलाइन घोटाळ्यांचे केंद्र बनले आहेत, विशेषतः 2021 मध्ये म्यानमार लष्करी ताब्यात गेल्यानंतर, ज्यामुळे प्रशासन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात कुचकामी ठरले आहे. नोकरीच्या खोट्या आश्वासनांखाली परदेशी लोकांना आमिष दाखवणाऱ्या भरती नेटवर्क्सचा शोध घेण्यासाठी भारत, थायलंड आणि म्यानमारसह प्रादेशिक सरकार एकमेकांना सहकार्य करत आहेत.

एकदा मायदेशी पलतल्यानंतर, आणलेल्या भारतीयांना त्यांचे अनुभव दस्तऐवजीकरण करण्यासाठी आणि तस्करी तसेच फसवणुकीच्या नेटवर्क्सच्या तपासांना पाठिंबा देण्यासाठी समुपदेशन केले जाईल, त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleअवामी लीगला निवडणुकीतून वगळल्यानंतर, हसीना यांचा बहिष्काराचा इशारा
Next articleपाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याची तालिबानला संपवण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here