पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा, भारत चिनी नागरिकांना Tourist Visa देऊ करणार

0

चीनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी जाहीर केले, की भारत 24 जुलैपासून चीनच्या नागरिकांना Tourist Visa देण्यास पुन्हा एकदा सुरुवात करेल. हे पाच वर्षांतील पहिले असे पाऊल आहे, जिथे दोन्ही देश आपापसातील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिमालयाच्या वादग्रस्त सीमाप्रश्नावरुन, 2020 मध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्यानंतर भारताने चीनी गुंतवणुकींवर निर्बंध घातले, शेकडो लोकप्रिय चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आणि प्रवासी मार्ग देखील कमी केले.

त्याच दरम्यान, COVID-19 या महामारीमुळे चीनने भारतीय नागरिकांसह इतर परदेशी नागरिकांना, व्हिसा देणे थांबवले होते. मात्र 2022 मध्ये हे निर्बंध उठवून, त्यांनी केवळ विद्यार्थ्यी आणि व्यावसायिकांना व्हिसा देणे पुन्हा सुरू केले.

भारतीय नागरिकांसाठी मात्र, मार्च 2025 पर्यंत Tourist Visa प्रतिबंधित राहिले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी जेव्हा परस्पर थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली, तेव्हा हे निर्बंध शिथील केले गेले.

गेल्यावर्षी भारत-चीन संबध सुधारण्याच्या हेतूने, दोन्ही अनेक उच्चस्तरीय बैठकाही पार पडल्या. ऑक्टोबरमध्ये रशिया येथे, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली महत्वपूर्ण चर्चा, हे द्विपक्षीय संबंध हळूहळू सुधारत असल्याचे प्रतीक म्हणता येईल.

बुधवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी, Tourist Visa संदर्भातील या सकारात्मक निर्णयाचे कौतुक असल्याचे सांगितले.

“भारतासोबत संवाद आणि सल्लामसलत कायम ठेवण्यासाठी चीन तयार आहे आणि दोन्ही देशांमधील वैयक्तिक देवाणघेवाण अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे ते म्हणाले.

भारत आणि चीन यांच्यात सुमारे 3,800 किमी (2,400 मैल) लांबीची वादग्रस्त सीमा आहे, जी 1950 च्या दशकापासून चर्चेचा विषय ठरली आहे. 1962 मध्ये दोन्ही देशांमध्ये एक लघुकालीन पण हिंसक युद्धही झाले होते, त्यानंतर आजतागायत सीमावाद मिटवण्याच्या वाटाघाटी संथ गतीने सुरुच आहेत.

जुलैमध्ये, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, “दोन्ही देशांनी सीमावाद लवकरात लवकर मिटवायला हवा, सैन्य मागे घेत प्रतिबंधात्मक व्यापार उपाययोजना टाळायला हव्यात, जेणेकरून द्विपक्षीय संबंध सामान्य स्थितीत येऊ शकतील.”

टीम स्ट्र्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीच्या आधारे)

+ posts
Previous articleMaritime Security in Focus as Philippines President Marcos Jr. Heads to India
Next articleभारत आणि इस्रायल परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here