हवाईदलप्रमुखांची ‘युरोफायटर’मधून ‘सॉर्टी’

0
Indian Air Force-Germany:

जर्मनीच्या दौऱ्यात द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर चर्चा

दि. ०८ जुन: भारताचे हवाईदलप्रमुख एअर चिफमार्शल व्ही. आर. चौधरी यांनी जर्मन हवाईदलाच्या ‘युरोफायटर टायफून’ या लढाऊ विमानातून शुक्रवारी आकाशभरारी घेतली. जर्मन हवाईदलप्रमुख लेफ्टनंट जनरल इंगो गेर्हर्त्झ यांच्या निमंत्रणावरून एअर चिफमार्शल चौधरी जर्मनीच्या दौऱ्यावर आले आहेत. या भेटीत त्यांनी जर्मन हवाईदलप्रमुखांशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबतही चर्चा केली, अशी माहिती हवाईदलाकडून ‘एक्स’ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हवाईदलप्रमुख चौधरी यांनी आपल्या जर्मनीच्या दौऱ्यात आयएलए-२०२४ या एरोस्पेस इंडस्ट्री विषयक प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन युरोपमध्ये दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात एरोस्पेस इंडस्ट्री विषयक नवीन उत्पादने, नव्या कल्पना आदी बाबींचा समावेश असतो. जगभरातील एरोस्पेस इंडस्ट्री विषयक तज्ज्ञ या प्रदर्शनाला भेट देत असतात. एअर चिफमार्शल चौधरी यांच्या जर्मन दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांना जर्मनीच्या हवाईदलाच्या मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘युरोफायटर टायफून’ या लढाऊ विमानातून आकाशभरारी घेतली, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि जर्मन हवाईदलाचा संयुक्त सराव ‘तरंगशक्ती-२०२४’चे  भारतात आयोजन करण्यात आले आहे. या सरावासाठी जर्मनीच्या हवाईदलाचे (लुफ्तवाफ) स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही हवाईदलाने म्हटले आहे.

विनय चाटी


Spread the love
Previous articleभारतीय नौदलाच्या मदतीला आता ‘इंद्रा’
Next articleचिनी लढाऊ विमानांचा डच युद्धनौकेला आक्रमक घेराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here