पिनाका रॉकेट प्रणालीच्या अपग्रेडेशनसाठी भारतीय लष्कराचा महत्त्वपूर्ण करार

0

भारतीय लष्कराने आपल्या सेवेतील स्वदेशी ‘पिनाका’ मल्टि-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टीम (MBRLS)‘ ची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी, लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि टाटा ॲडव्हांस्ड सिस्टम्स (TASL) या दिग्गज संरक्षण कंपन्यांची नियुक्ती केली आहे. हा निर्णय तोफखाना मालमत्तेचे लाइफसायकल मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल सज्जतेवर नव्याने लक्ष केंद्रित करत असल्याचे अधोरेखित करतो.

अवघ्या काही दिवसांच्या अंतरानेअंतिम झालेले हे मोठे आणि महत्वपूर्ण करार, कालबाह्य तंत्रज्ञानाचे व्यवस्थापित करण्यासाठी, त्यांचा सेवा काळ वाढवण्यासाठी आणि प्रमुख युद्ध प्रणालींची उपलब्धता सुधारण्यासाठी मूळ उपकरण उत्पादकांचा (OEMs) वापर करण्याच्या लष्कराच्या धोरणाला अधोरेखित करतात.

L&T आणि लष्कराचा संयुक्त उपक्रम

L&T ने, भारतीय लष्कराच्या ताफ्यात सध्या तैनात असलेल्या पिनाका प्रणालींची देखरेख, अपग्रेडेशन आणि ऑब्सेलेसन्स मॅनेजमेंट (कालबाह्य घटकांचे व्यवस्थापन) करण्यासाठी कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME) कडून ऑर्डर मिळवली आहे.

एका एक्स्चेंज फायलिंगमध्ये L&T ने म्हटले आहे की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट जुने घटक बदलणे, क्रिटिकल सब-सिस्टिम्स अपग्रेड करणे आणि आर्मी बेस वर्कशॉप्सना (ABWs) तांत्रिक सहाय्य देऊन पिनाका रेजिमेंटची दीर्घकालीन कार्यात्मक उपलब्धता आणि आधुनिकीकरण वाढवणे हे आहे.

EME कॉर्प्सचे 510 आर्मी बेस वर्कशॉप (ABW), त्यांच्या अंतर्गत कौशल्याचा वापर करून प्रमुख इलेक्ट्रॉनिक आणि सिस्टिम घटकांची दुरुस्ती आणि अपग्रेडेशन करतील. या उपक्रमाचा भाग म्हणून L&T महत्त्वपूर्ण सुटे भाग पुरवेल आणि सब-सिस्टिम्सच्या आधुनिकीकरणास मदत करेल, ज्यामुळे पारंपरिक देखभाल पद्धतीऐवजी संरचित, लाइफसायकल-आधारित देखभाल चौकट स्विकारणे सुलभ होईल.

सुरुवातीच्या टप्प्यात, एल अँड टी आणि 510 ABW संयुक्तपणे पिनाका लाँचर आणि बॅटरी कमांड पोस्टच्या प्रायोगिक तत्त्वावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करतील. या पायलट प्रकल्पानंतर, उर्वरित यंत्रणांची दुरुस्ती 510 ABW द्वारे केली जाईल, तर एल अँड टी सुटे भाग, तांत्रिक सहाय्य आणि गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याचे काम सुरू ठेवेल.

कंपनीने म्हटले आहे की, हे मॉडेल सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या अनुषंगाने इतर संरक्षण प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारच्या लाइफसायकल मॅनेजमेंट आणि अपग्रेड प्रोग्रामसाठी एक आदर्श म्हणून काम करेल, अशी अपेक्षा आहे.

टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टम्सची भागीदारी

एल अँड टी सोबत हा करार होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, भारतीय लष्कराने पहिल्या पिढीच्या ‘पिनाका’ मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम आणि बॅटरी कमांड पोस्टच्या ओव्हरहॉल-कम-अपग्रेडेशनमध्ये 510 ABW ला मदत करण्यासाठी टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टम्सला पुरवठा आदेश सुपूर्द केला होता.

टाटा आणि लष्कराच्या सहकार्यांतर्गत, TASL आणि 510 ABW सुरुवातीला निवडक पिनाका MLRS आणि BCP च्या प्रायोगिक तत्त्वावरील दुरुस्तीचे काम हाती घेतील. कंपनीने सांगितले की, हे काम पूर्ण झाल्यावर उर्वरित यंत्रणांचे 510 ABW द्वारे नूतनीकरण केले जाईल, तर टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टम्स महत्त्वपूर्ण सुटे भाग, गुणवत्ता हमी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.

टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टम्सने, पिनाका MLRS डिझाइन आणि विकसित करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत (DRDO) भागीदारी केली होती. ही प्रणाली सर्व हवामानांत उपयुक्त, अप्रत्यक्ष-फायर देणारी तोफखाना प्रणाली असून ती महत्त्वपूर्ण लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यास सक्षम आहे.

कंपनीने मोठ्या संख्येने पिनाका लाँचर वितरित केले आहेत, जे सध्या भारतीय लष्कराकडे तैनात असून लष्कराच्या जमीन युद्ध प्रणालीचा ताफा मजबूत करत आहेत.

8×8 उच्च गतिशीलतेच्या वाहनावर बसवलेल्या पिनाका MLRS मध्ये, स्वयंचलित ‘शूट-अँड-स्कूट’ क्षमता, ऑल-इलेक्ट्रिक सर्व्हो-ड्राइव्ह सिस्टम आणि इनर्शियल नेव्हिगेशन-आधारित डिजिटल कंट्रोल आणि पोझिशनिंग सिस्टम आहे. यामुळे जलद तैनात करणे, उच्च टिकाऊपणा आणि नेट-सेंट्रिक ऑपरेशन्स शक्य होतात. हे लाँचर पिनाका Mk-I रॉकेट डागू शकते आणि किरकोळ बदलांसह मार्गदर्शित (guided) रॉकेट डागण्यासही सक्षम आहे.

टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टम्स 1989 पासून पिनाका कार्यक्रमाशी जोडलेली आहे. 2006 मध्ये दुसऱ्या पिनाका रेजिमेंटसाठी कंपनीने ऐतिहासिक करार केला होता, त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा ऑर्डर्स मिळाल्या आणि 2020 च्या करारानुसार अतिरिक्त सहा रेजिमेंटपैकी दोन रेजिमेंट कंपनीला देण्यात आल्या होत्या.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndian Army Engages L&T, Tata to Upgrade In-Service Pinaka Rocket Systems
Next articleरशिया आणि भारतावर 500% आयात शुल्क लादणारे विधेयक मंजुरीच्या दिशेने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here