भारतीय वाहन निर्मात्यांकडून 2025 मध्ये आणखी इव्ही बाजारात येणार

0
इव्ही
26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतातील चेन्नई येथे नव्याने लॉन्च झालेल्या Mahindra XEV 9e या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या आतील भागाचे चित्रीकरण करताना एक व्यक्ती (रॉयटर्स/नंदन मंडायम/फाईल फोटो)

इव्हीच्या मागणीत जागतिक स्तरावर मंदी असूनही खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय वाहन उत्पादकांनी यावर्षी सुमारे डझनभर नवीन इलेक्ट्रिक कार मॉडेल्स लॉन्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यात दीर्घ श्रेणी आणि वेगवान चार्जिंग असलेले प्रीमियम विभागातील अनेक मॉडेल्स समाविष्ट आहेत.

शुक्रवारी नवी दिल्लीत सुरू होणाऱ्या पाच दिवसीय ऑटो शोमध्ये भारतीय वाहन उत्पादक मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा तसेच जागतिक प्रतिस्पर्धी बीवायडी, टोयोटा आणि ह्युंदाईसह नवीन व्हिएतनामी उत्पादक विनफास्ट या कंपन्यांच्या मॉडेल्ससह इव्ही मध्यवर्ती मॉडेल्स असतील.

भारताच्या इव्हींच्या बाजारपेठेतील आघाडीचे उत्पादक टाटा मोटर्स आणि चीनच्या एसएआयसी मोटरच्या मालकीची जेएसडब्ल्यू -एमजीमोटर, जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कार बाजारात आपली उत्पादने शो केस करणार आहेत.  2027 पासून सुरू होणाऱ्या कडक emission normsमुळे (उत्सर्जन निकषांमुळे) इव्ही कारकडे वाहन खरेदीदार वळत आहेत.

भारतातील इव्हीची वाढती बाजारपेठ

भारताची इव्हीची बाजारपेठ लहान आहे, ज्यात 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 43 लाख गाड्यांपैकी इलेक्ट्रीक मॉडेल्सचा वाटा सुमारे 25 टक्के आहे, कारण जास्त किंमती आणि नादुरुस्त चार्जिंग नेटवर्क यामुळे खरेदीदारांची संख्या मर्यादित आहे.

2030 पर्यंत हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची सरकारची इच्छा आहे.

संशोधन संस्था रोमोशनच्या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर, इलेक्ट्रिक कारच्या विक्रीची वाढ एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 2024 मध्ये 13 टक्क्यांपर्यंत मंदावली खरी पण पहिल्यांदाच विक्रीने 1 कोटी युनिट्सचा टप्पा ओलांडला.

भारतातील इव्हीच्या विक्रीतील वाढ मंदावलेली असताना, एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 2024 मध्ये ती 20 टक्क्यांनी वाढून सुमारे 1लाख युनिट्सवर पोहोचली, त्याच कालावधीत त्याने एकूण कार बाजारातील 5 टक्के वाढीला मागे टाकले.

वाहन उद्योगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लांब पल्ल्याचे आणि कमी वेळेत चार्जिंग होणाऱ्या नवीन मॉडेलची मागणी वाढू शकते. अभ्यासकांनी यावर्षी भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री दुप्पट होईल असा अंदाज वर्तवला आहे.

भारतातील पहिल्या इव्ही  बाजारात आणणाऱ्या बाजारपेठेतील आघाडीच्या टाटा मोटर्सच्या पेट्रोल कार्स ज्या इव्हीमध्ये रूपांतरित झाल्या त्या एकदा चार्ज केल्यावर 300 किलोमीटर (186 मैल) पर्यंत चालवता येतात. मात्र अनेकांना inter-city प्रवासासाठी हे अपुरे वाटले.

नवीन इव्ही अधिक अंतर कापू शकतात

बहुतेक नवीन मॉडेल्सची रचना सुरुवातीपासूनच किमान 400 किमीच्या श्रेणीतील इव्ही म्हणून केली जाते. महिंद्रासारखे काही वाहननिर्माते 600 किमीपेक्षा जास्त आणि 20 ते 80 टक्के  जलद चार्जिंग 20 मिनिटांच्या आत होऊ शकेल असे मॉडेल देऊ करत आहेत.

महिंद्राच्या या वर्षीच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 22 हजार ते 35 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतात एका कारची सरासरी किंमत सुमारे 12 हजार डॉलर आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या मॉडेल्सपेक्षा महाग मॉडेल्स वेगाने वाढत आहेत.

दक्षिण भारतात कार कारखाना उभारणारा इव्ही निर्माता विनफास्ट आपली मिनी-एसयूव्ही व्हीएफ 3, थ्री रो एमपीव्ही, व्हीएफ9 आणि इतर कार्स या प्रदर्शनात मांडणार आहे.

“भारतातील वाढता मध्यमवर्ग, इव्ही खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मजबूत सरकारी प्रोत्साहन यामुळे ते विनफास्टच्या जागतिक विस्तारासाठी एक नैसर्गिक केंद्रबिंदू बनत आहे,” असे कार उत्पादकाने म्हटले आहे.

दक्षिण कोरियाची ह्युंदाई आपल्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्हीची भारतात निर्माण झालेली इलेक्ट्रीक एडिशन या प्रदर्शनात मांडणार आहे. प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी ही गाडी मदत करेल अशी त्यांना आशा आहे, तर बीवायडी त्यांची सीलियन 7 इलेक्ट्रीक एसयूव्ही यावेळी प्रदर्शित करणार आहेत.

मारुतीचे इव्हीमध्ये पदार्पण

विक्रीनुसार भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती आपली पहिली इव्ही, ई विटारा एसयूव्ही प्रदर्शित करणार आहे, जी या वर्षाच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होईल. मारुती सुझुकी मोटर आणि टोयोटा यांनी संयुक्तपणे ही कार विकसित केली आहे.

काही कार उत्पादक इव्हीसोबत प्लग-इन हायब्रिड कार, फ्लेक्स-इंधन मॉडेल, हायड्रोजन इंधन सेल वाहने आणि गॅस-आधारित कार यासारखे इतर स्वच्छ इंधन तंत्रज्ञानदेखील प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

टोयोटाच्या इंडिया युनिटमधील कॉर्पोरेट व्यवहार आणि प्रशासनाचे देश प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, “जर तुमच्याकडे सर्व विद्युतीकृत वाहनांना प्रमाणबद्ध पद्धतीने प्रोत्साहन दिले गेले असेल तर  इलेक्ट्रिक टेकऑफचा मार्ग खरोखरच अधिक वेगवान आणि चांगल्या प्रकारे काम करतो.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here