किनारी सुरक्षा वाढवण्यासाठी ICG ला मिळाले ‘अटल’ जलद गस्ती जहाज

0

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) काल गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे ‘अटल’ चे अनावरण करून आपल्या ताफ्यात आणखी एक स्वदेशी बनावटीचे जलद गस्त जहाज (FPV) समाविष्ट केले आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या आठ जहाजांच्या मालिकेतील हे सहावे FPV आहे, ज्यामुळे संरक्षण जहाजबांधणीमध्ये आत्मनिर्भरतेसाठी भारताच्या प्रयत्नांना बळकटी मिळते.

 

किनारपट्टी सुरक्षा, तस्करीविरोधी मोहिमा आणि सागरी बचाव मोहिमांमध्ये ICG ची क्षमता बळकट करण्यासाठी, भारताच्या 11 हजार 098.81 किमी लांबीच्या किनारपट्टीचे आणि विशेष आर्थिक क्षेत्राचे (EEZ) संरक्षण करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी ‘अटल’ ची रचना करण्यात आली आहे.

‘अटल’ ची प्रमुख वैशिष्ट्ये

60 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीसह बांधलेले ‘अटल’ जहाज, GSLचे अपवादात्मक अंतर्गत रचना कौशल्य आणि प्रगत जहाज बांधणी क्षमता दर्शवते. 52 मीटर लांब आणि 320 टन विस्थापन, असणारे हे जहाज मत्स्यपालन संरक्षण, समुद्री चाच्यांविरोधी गस्त, बेट प्रदेश पाळत ठेवणे तसेच शोध आणि बचाव कार्य यासह विविध भूमिका पार पाडण्यासाठी अतियश योग्य आहे. लक्षणीय बाब म्हणजे, नियंत्रित करण्यायोग्य पिच प्रोपेलर (CPP) असलेले हे भारतातील पहिले जलद गस्त जहाज (FPV) आहे, जे प्रणोदन कार्यक्षमता आणि कुशलता लक्षणीयरीत्या वाढवते. याव्यतिरिक्त, हा प्रकल्प एमएसएमई आणि स्थानिक उद्योगांना पाठिंबा देऊन, समाजात रोजगाराच्या संधींना चालना देऊन प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देतो.

GSLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय म्हणालेः “ICGS साठी तयार करण्यात आलेले अटल हा GSLच्या संघासाठी आणखी एक अभिमानाचा टप्पा आहे. जागतिक आव्हाने असूनही, स्वदेशी नवोन्मेषावर आमचे लक्ष स्थिर आहे. हे जहाज सागरी संरक्षणात भारताची वाढती स्वावलंबन प्रतिबिंबित करते.”

भारतीय तटरक्षक दलः सागरी दक्षता वाढत आहे

1977 मध्ये त्याच्या स्थापनेपासून, ICGS ने फक्त सात प्लॅटफॉर्मपासून सुरूवात करून 151 जहाजे आणि 76 विमानांसह एक भक्कम सागरी दल म्हणून प्रगती केली आहे. 2030 पर्यंत 200 जहाजे आणि 100 विमानांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून जागतिक स्तरावर तटरक्षक दलातील आघाडीच्या सेवांमध्ये ते स्थान मिळवतील.

‘वयम रक्षक’ (आम्ही संरक्षण करतो) या त्याच्या बोधवाक्यानुसार कार्यरत असलेल्या ICG ने स्थापनेपासून 11 हजार 730 लोकांचे प्राण वाचवले आहेत, ज्यात गेल्या वर्षीच्या 169 जणांचा समावेश आहे. त्याच्या सतत सतर्क राहण्याच्या कार्यात भारतीय शोध आणि बचाव क्षेत्रात दररोज तैनात केलेल्या पृष्ठभागावरील प्लॅटफॉर्म आणि विमानांचा समावेश आहे.

ऑपरेशनल फूटप्रिंट

भारतीय तटरक्षक दल (ICG) केवळ नियमित गस्त घालण्यातच उत्कृष्ट ठरत नाही तर कायद्याची अंमलबजावणी तसेच मानवतावादी प्रयत्नांचा देखील त्यांचा एक विशिष्ट इतिहास आहे. विशेष म्हणजे, ICG ने अंदमान समुद्रात 6 हजार 016 किलो अंमली पदार्थांच्या विक्रमी जप्तीसह 52 हजार 560 कोटी रुपयांचे प्रतिबंधित साहित्य अडवले आहे. आपत्ती प्रतिसादाच्या बाबतीत, ICG ने गुजरातमधील असना चक्रीवादळादरम्यान आणि वायनाडमध्ये पूर मदत पुरवण्यात, रात्रीच्या वेळी गुंतागुंतीच्या वैद्यकीय निर्वासनांची अचूकपणे अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातील तेल गळती प्रतिसादासाठी नियुक्त प्राधिकरण म्हणून, ICG नियमित प्रदूषण प्रतिसाद सराव आयोजित करते, ज्यामुळे पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाची तयारी वाढते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleNavy Chief Visits Japan to Bolster Indo-Pacific Maritime Ties
Next articleइंडो-पॅसिफिक सागरी संबंध दृढ करण्यासाठी नौदल प्रमुख जपान दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here