.@DRDO_India successfully conducted developmental field trials of Indian Light Tank, Zorawar. The collaboration with Indian industry aids in the growth of domestic manufacturing ecosystem.
More: https://t.co/ZlygO3jSWS pic.twitter.com/f61bn37jq0
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) September 13, 2024
महत्त्वपूर्ण संरक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबन साध्य करण्याचे भारताचे असणारे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
हा हलका रणगाडा 2027 पर्यंत सैन्यात दाखल होण्यासाठी तयार असेल असे डीआरडीओने जाहीर केले आहे. मात्र संपूर्ण अधिग्रहण, उत्पादन आणि लष्करात तो दाखल होणे ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये वाळवंट आणि उच्च उंचीच्या भागांसह अति तीव्र उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूतील विविध चाचण्यांची मालिका पार पाडावी लागेल. झोराबर प्रकल्पाला डिसेंबर 2022 मध्ये, संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने प्राथमिक मंजुरी किंवा ‘आवश्यकतेची स्वीकृती’ दिली होती. त्यासाठी अंदाजे 17 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
भारतीय लष्कराने लडाखमध्ये रशियात बनलेले अनेक जड टी-72 आणि टी-90 रणगाडे तैनात केले आहेत. मात्र हे रणगाडे खडकाळ भूप्रदेशातील युद्धांसाठी योग्य नाहीत, कारण त्यांची निर्मिती सपाट प्रदेश आणि वाळवंटात वापरण्यासाठी करण्यात आली आहे. सीमेवरील तणाव सुरू झाल्यापासून, पुरेशा दारूगोळ्यासह, संरक्षण, पाळत ठेवणे आणि दळणवळण क्षमता असलेल्या हलक्या रणगाड्यांची गरज आहे. हलक्या रणगाड्यांची हवाई वाहतूक केली जाऊ शकते, हे रणगाडे डोंगराळ भागाप्रमाणेच वाळवंटात ही कार्य करण्यास सक्षम आहे, उंचावर असणाऱ्या लक्ष्यावर गोळीबार करू शकतात तसेच मर्यादित दारूगोळ्यासह उत्तम कामगिरी बजावू शकतात.
डॉ. रवी शंकर