भारतीय नौदलाचे भविष्य स्वदेशीकरण व सुरक्षा वाढीवर अवलंबून: नौदल प्रमुख

0

“जागतिक सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असलेल्या, भारतीय नौदल्याचे भविष्य, त्याच्या महासागरांशी खोलवर जोडलेले आहे आणि भारतीय नौदल स्वावलंबन, नवोन्मेष आणि तांत्रिक वर्चस्वाकडे दृढनिश्चयाने वाटचाल करत आहे,” असे वक्तव्य नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आयोजित, वार्षिक बिझनेस समिटमध्ये बोलताना अॅडमिरल त्रिपाठी यांनी, भारताच्या सागरी क्षमतेला बळकटी देण्यासाठीचा सखोल रोडमॅप सादर केला. देशाच्या सामरिक स्वायत्तता आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या व्यापक ध्येयांशी सुसंगत असा हा कृती आराखडा होता.

“भारत हे केवळ भौगोलिक रचनेमुळे किंवा इतिहासामुळेच नव्हे, तर भविष्यातील विकासाच्या दृष्टीनेही एक समुद्रप्रधान राष्ट्र आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी, भारताच्या अर्थव्यवस्थेत समुद्राची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली, “भारताच्या व्यापाराच्या 95% आणि आपल्या 88% ऊर्जेची निर्मिती समुद्रातून होते” असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “आपली भविष्यातील समृद्धी ही समुद्राद्वारे आणि समुद्रातून साध्य होईल.”

स्वदेशीकरण

अॅडमिरल त्रिपाठी यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू होता – भारतीय नौदलाचे दीर्घकालीन स्वदेशीकरण. “स्वदेशीकरण ही आमची कायमच प्राथमिकता राहिली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. “गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ आम्ही, विमानवाहू युद्धनौका आणि SSBN (न्यूक्लियर सबमरीन) यांच्यासह, पूर्णपणे आत्मनिर्भर बनण्याचे ध्येय बाळगले आहे.”

‘त्यांनी यावेळी नौदलाचे त्रिस्तंभीय स्तंभ धोरण मांडले- ज्यात स्वदेशीकरण, नवकल्पना आणि एकत्रीकरण यांचा मेळ असून, हेच समीकरण भविष्यात नौदल क्षमतेचा पाया ठरेल,’ असे त्यांनी सांगितले. त्यांनी भारतीय उद्योग क्षेत्राला या परिवर्तनात सहभाग घेण्याचे देखील आवाहन केले.

2021 मध्ये स्थापन झालेली, Naval Innovation and Indigenisation Organisation (NIIO) ही संस्था उद्योग आणि स्टार्टअप्ससोबत तंत्रज्ञान सह-विकास आणि जलद अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे.

त्रिपाठी म्हणाले की, “iDEX (Innovations for Defence Excellence) योजनेचा निधी मागील दोन वर्षांत त्रिपटीने वाढवण्यात आला आहे. ही योजना संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्णतेस चालना देत आहे.”

SAGAR ते MAHASAGAR – भारताचे सागरी धोरण

भारताच्या सागरी धोरणाचा संदर्भ देताना, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१५ मधील SAGAR (Security and Growth for All in the Region) या उपक्रमाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, ही संकल्पना आता MAHASAGAR या विस्तारित रूपात विकसित झाली आहे: Mutual and Holistic Advancement of Security and Growth Across Regions.

“ही संकल्पना भारताच्या वाढत्या सागरी हितसंबंधांचे प्रतिबिंब आहे आणि आपले भविष्य महासागरांतील संधी पुनर्प्राप्त करण्यात आहे, असा आमचा दृढ विश्वास आहे,” असे नौदलप्रमुख म्हणाले.

‘डिसरप्टिव्ह’ तंत्रज्ञान

नवीन तंत्रज्ञानामुळे भारतीय नौदलाची कार्यक्षमता कशी वाढू शकते, यावर भर देत ते म्हणाले की, “नव्या युगातील युद्ध हायब्रिड आणि उच्च-तंत्रज्ञानाचा प्रभाव असलेली आहेत, ज्याचे प्रमाण भविष्यात वाढत जाणार आहे. त्यामुळे भारतीय नौदल AI, क्वांटम संगणन, सायबर युद्ध, स्वायत्त प्रणाली यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानांची अंमलबजावणी करत आहे, जी पृष्ठभागावरील, पाण्याखालील, हवाई, अवकाश आणि सायबर क्षेत्रातील वॉरसाठी आवश्यक आहे.”

“तंत्रज्ञान, जे विचाराच्या वेगाने धावत आहे, तेच आपल्याला अत्याधुनिक क्षमतांनी सुसज्ज करते आणि आपले सागरी हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे,” असे त्यांनी नमूद केले.

नौदलाने यावेळी, तंत्रज्ञान रोडमॅप्स प्रसिद्ध केले आहेत जे उद्योग भागीदारांना दिशा देतात – यामध्ये प्रणोदन प्रणाली, एअरो इंजिन, हायपरसॉनिक तंत्रज्ञान, अचूक सेन्सर्स यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा नवा आयाम

“राष्ट्रीय सुरक्षा ही आता केवळ सीमांवर सुरू होत नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले. “ती आपल्याच्या संशोधन प्रयोगशाळा, कारखाने आणि सायबर फायरवॉल्समधूनही सुरू होते.”

ते पुढे म्हणाले की, “संघर्षाची व्याख्या बदलली आहे — शांतता आणि युद्ध यामधील सीमारेषा अस्पष्ट होत आहेत, तंत्रज्ञान आता सर्वांसाठी खुले झाले आहे आणि सायबर तसेच नॉन-कॉन्टॅक्ट युद्धाचे प्रमाण वाढत आहे.”

“या नव्या युगात, उद्योग क्षेत्राने स्वतःला केवळ पुरवठादार नव्हे तर युद्धातील भागीदार समजायला हवे, जे नवकल्पना राबवू शकतील, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतील आणि योग्यवेळी त्याचा वापर करू शकतील,” असे त्रिपाठी यावेळी म्हणाले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia And EU Launch Joint Naval Exercise Amid Rising Maritime Security
Next articleवाढत्या सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर India-EU चा संयुक्त नौदल सराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here