भारतीय त्रि-सेवा महिला नाविक 4 हजार मैलांचा प्रवास करणार

0
भारतीय

नारी शक्ती (महिला शक्ती) आणि आंतर-सेवा मैत्रीचे ऐतिहासिक दर्शन घडवण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सर्व महिला कर्मचारी हिंद महासागरातून 4 हजार सागरी मैल ओलांडून आव्हानात्मक नौकानयन मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. 55 दिवसांच्या भारताच्या त्रि-सेवेतील फक्त महिला कर्मचाऱ्यांची पहिल्या नौकानयन मोहीम ‘समुद्र प्रदक्षिणा’ला 7 एप्रिल रोजी मुंबईतील भारतीय नौदल जलशक्ती प्रशिक्षण केंद्रातून (आयएनडब्ल्यूटीसी) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम असून, भारतीय सशस्त्र दलांमध्ये लिंग समानता आणि परिचालन उत्कृष्टता वाढवण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले हे एक धाडसी पाऊल आहे. अकरा महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेला हा संघ गणवेशातील भारतीय महिलांच्या धैर्य, चिकाटी आणि अदम्य भावनेचा पुरावा आहे.

आर्मी ॲडव्हेंचर नोडल सेंटर फॉर ब्लू वॉटर सेलिंग (एएएनसीबीडब्ल्यूएस) येथे अनुभवी खलाशांच्या कठोर मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण झालेल्या या महिला अधिकाऱ्यांनी एक वर्षाहून अधिक काळ खडतर तयारी केली आहे. नवशिक्यांपासून ते अनुभवी नाविकांपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासामध्ये नौकानयनाची मूलभूत तत्त्वे, हवामानाचा अंदाज, आपत्कालीन हाताळणी आणि लांब पल्ल्याच्या मोहिमेचे नियोजन यांचा समावेश होता.


या दलात भारतीय लष्कराच्या सहा, भारतीय नौदलाच्या एका आणि भारतीय हवाई दलाच्या चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे, जे खऱ्या अर्थाने त्रि-सेवा एकात्मतेचे प्रतीक आहेत. या मोहिमेसाठीचे त्यांचे जहाजाचा-इंडियन आर्मी सेलिंग व्हेसल (आयएएसव्ही) ट्रायवेनी- सागर प्रवास काहीसा अंदाज न लावता येणारा आणि हवामान घटकांविरुद्ध त्यांच्या सहनशक्तीची आणि कौशल्याची चाचणी घेणारा असेल.

ही मोहीम सागरी मोहिमेपेक्षा अधिक आहे-ती सशक्तीकरण, लवचिकता आणि गणवेशातील महिलांच्या अमर्याद क्षमतेची चुणूक दाखवणारी आहे. या महिला अधिकारी नौदलाच्या साहसाचा एक नवीन मार्ग तयार करण्याची तयारी करत असताना, त्या त्यांच्याबरोबर राष्ट्राच्या आशा आणि भावी पिढ्यांना सक्षम करण्यासाठी प्रेरणा देऊन जाणार आहेत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleइंद्र 2025: भारत-रशिया नौदलाच्या धोरणात्मक भागीदारीला बळकटी
Next articleFuture of US-Pakistan Ties Under Trump

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here