भारताचा नवा ग्राहक: महिलांची आघाडी ते नव्या मध्यमवर्गाचा उदय, तज्ज्ञांचे मत

0
ग्राहक

भारताने 22 सप्टेंबर रोजी, जीएसटी 2.0 (GST 2.0) जाहीर केला. ज्यामध्ये अन्य वस्तू आणि सेवांसोबत, सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आणि सेवा, तसेच एंट्री-लेव्हल कार्ससारख्या अनेक महत्त्वाकांक्षी वस्तूंच्या दरांमध्ये मोठी कपात करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे, त्यानंतर पहिल्या आठवड्यातच सदर उत्पादनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. आता प्रश्न असा उद्भवतो की, ही वाढ केवळ जीएसटीतील बदलांमुळे आलेली तात्पुरती तेजी आहे की, भारतीय ग्राहक अर्थव्यवस्थेतील नव्या बदलांचे सूचक संकेत आहेत? 

याचे उत्तर द्यायचे झाल्यास, ‘हे आहे, भारतीय ग्राहकांचे सढळ हस्ते अर्थात मोकळेपणाने खर्च करण्याचे नवे पर्व!’

जर आपण लक्षपूर्वकपणे पाहिले, तर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळात भारतीय ग्राहकांमध्ये, त्यांच्या खर्चाच्या पद्धतीमध्ये हळूहळू बदल झालेला आढळून आला आहे. उदाहरणार्थ, आता सर्वसामान्य भारतीय महिला देखील, स्वतंत्रपणे खर्च करणाऱ्या ग्राहकांच्या यादीत अग्रस्थानी आल्याचे चित्र आहे. याशिवाय, वाढत्या इच्छा-आकांक्षा असलेला एक नवा मध्यम वर्गही आता उदयास येत आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत सुमारे 50 कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेच्यावर आले असून, ते बाजाराचे भागधारक बनले आहेत.

याच विषयाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी, ‘कॅपिटल कॅल्क्युलस’च्या या भागात, StratNewsGlobal.Tech ने IPSOS च्या मधुरिमा भाटिया यांच्याशी चर्चा केली. भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील या आकर्षक बदलावर, नव्या ग्राहक वर्गाच्या उदयावर प्रकाश टाकणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश होता. IPSOS ही एक नावाजलेली जागतिक बाजार संशोधन कंपनी आहे, जिचे भारतात मोठे योगदान आहे. 

जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत:

– अनिल पद्मनाभन

+ posts
Previous articleसंरक्षणमंत्र्यांचे भुजमध्ये शस्त्रपूजन, क्रीकच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला खडसावले
Next articleगाझा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता सील, इस्रायलचा अंतिम निर्वासन इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here