भारताच्या ‘PSLV’ अर्थात ‘Polar Satellite Launch Vehicle’ च्या ‘PSLV- C59’ या वाहनाने 05 डिसेंबर 2024 रोजी, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) च्या व्यावसायिक मोहिमेअंतर्गत ‘Proba-3’ या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
Proba-3 हे युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) चे इन-ऑर्बिट प्रात्यक्षिक (IOD) अंतराळयान आहे. ज्याचे उद्दिष्ट अचूक फॉर्मेशन फ्लाइंगचे प्रदर्शन करणे हे असून, यामध्ये २ अंतराळवीरांचा समावेश आहे. ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने) ने गुरुवारी PSLV-XL या त्यांच्या विश्वसनीय अंतराळ उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या मदतीने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. रिपोर्टनुसार, Proba-3 चे प्रक्षेपण हे बुधवारी नियोजित केले गेले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे, गुरुवारी ‘फर्स्ट लॉन्च पॅड (FLP), सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC-SHAR), श्रीहरिकोटा’ येथून त्याचे यशस्वी प्रक्षेपण पार पडले.
Interstellar news च्या रिपोर्टनुसार, Proba-3 हे अंतराळयान सूर्याच्या जटिल गतिशीलतेविषयी सखोल महिती मिळवण्यासाठी आणि त्याबाबत अभ्यासपूर्ण संकलन करण्याच्या हेतूने, ESA च्या सोलर ऑर्बिटरमध्ये सामील झाले आहे. ‘सौर वाऱ्याचा वेग, सूर्याच्या अन्य हलचालींचा वेग, अवकाशातील हवामानाची गतिविधी आणि त्याचे पृथ्वीवरील हवामान बदलांवर होणारे परिणाम’ याचा पुरेसा अभ्यास अद्याप झालेला नसून, या सगळ्याविषयची सखोल माहिती संकलित करणे व त्याचे नेमके रहस्य उलगडणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे,’ Proba-3 चे सिस्टीम इंजिनीअर ‘एस्थर बस्टिडा पेर्टेगाझ’ यांनी सांगितले आहे.
Proba-3 हे उपकरण साधारण ५४५ किलोग्रॅम वजनाचे असून, एका उपग्रहाप्रमाणे पृथ्वीच्या वर अंदाजे 600 किमी अंतरावर असलेल्या उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत ते फिरेल. यामुळे प्रत्येक कक्षेतील सूर्याच्या हालचालींचे सलग ६ तासांसाठी निरीक्षण करता येईल. हा कालावधी एका शतकात फक्त ६० वेळा घडणाऱ्या नैसर्गिक सूर्यग्रहणांच्या मर्यादित कालावधीपेक्षा जास्त आहे.
ISRO च्या व्यावसायिक शाखा रुंदवणार
Proba-3 चे प्रक्षेपण हे ‘PSLV’ (Polar Satellite Launch Vehicle) चे ६१ वे यशस्वी उड्डाण असून, यामुळे भविष्यात इस्रोच्या व्यावसायिक शाखा रुंदावायला बळ मिळाले आहे. च्या यशस्वी मोहिमेनंतर, ISRO ने ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये’ एक विश्वासार्ह भागीदार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. ESA ला, एरियान 6 च्या प्रोग्रामच्ये विलंबामुळे तसेच रशियन सोयुझ रॉकेटचा प्रवेश खंडित करणाच्या निर्णयामुळे वाढलेल्या तणावामुळे, स्वतःच्या प्रक्षेपण क्षमतेत अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी Proba 3 च्या प्रक्षेपणासाठी विश्वासार्ह आणि कार्यकुशल अशा ISRO ची निवड केली.
Proba 3 च्या यशस्वी कामगिरीमुळे, ISRO आणि ESA यांच्यामधील भागीदारी आता दीर्घकाळासाठी दृढ झाली आहे. याआधी इस्रोने 2001 मध्ये Proba-1 च्या लॉंचिगमध्येही सहभाग दर्शवला होता. त्यानंतर आता ३ वर्षांनी Proba-3 च्या यशामुळे ISRO च्या विश्वासार्ह भूमिकेची पुष्टी झाली आहे. इस्रोने International Space Achievements मध्ये आपले नाव नोंदवले आहे.
ISRO ने यापूर्वी, ‘चांद्रयान-3’ चे यशस्वी लँडिंग आणि ‘आदित्य-L1 सौर वेधशाळा’ यासारखे दोन महत्वाचे माईल स्टोन पार केले होते. त्यातच आता Proba 3 च्या यशस्वी लाँचिंगची भर पडली आहे. हे मिशन ISRO च्या आतंराष्ट्रीय पातळीवरील अचिव्टमेंट्सना अधोरेखित करते. याशिवाय इस्रो Space World नवनवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आगे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची गगनयान मोहिम तसेच चंद्र, मंगळ व शुक्र या तिनही ग्रहांच्या अभ्यासासाठी शोध मोहिम आखण्याची योजना अशा अनेक उक्रमांद्वारे ISRO अंतराळविश्वातील आपल्या व्यावसायिक कक्षा तर रुंदावत आहेच पण भारत देशाचे अंतराळ विश्वातील स्थान अधिक मजबूत करत आहेत. संपूर्ण जगासमोर भारताची एक सक्षम प्रतिमा तयार करत आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
अनुवाद – वेद बर्वे