संरक्षण नवउपक्रमांत समन्वय, पुनरुज्जीवन, खाजगी गुंतवणुकीसाठी उद्योग क्षेत्राचे आवाहन

0
संरक्षण

नवोन्मेष हा युद्धभूमीतील नवीन फायदा म्हणून वेगाने उदयास येत असून संरक्षण तंत्रज्ञानात आघाडी घेण्याची भारताची क्षमता पुढील दशकांमध्ये त्याचे धोरणात्मक स्थान निश्चित करू शकते. तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ अनघ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या इंडिया डिफेन्स कॉन्क्लेव्हच्या 10 व्या आवृत्तीत “इनोव्हेशन: शेपिंग इंडियाज डिफेन्स एज” या विषयावरील विचारप्रवर्तक चर्चेतून हा मध्यवर्ती संदेश दिला गेला. त्यांनी इन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्सचे (आय-टेक आरएफआयडी) एमडी आणि सीईओ अशिम अशोक पाटील,  राफे एमफिब्राचे सीईओ विवेक मिश्रा आणि द ग्रेट टेक गेमचे लेखक अनिरुद्ध सुरी यांच्याशी संवाद साधला.

 

सिंग यांनी नमूद केले की आज नवोपक्रम हा केवळ धोरणात्मक चर्चा नाही तर “भारताच्या औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा केंद्रबिंदू” आहे, जो वाढत्या स्पर्धात्मक तांत्रिक परिदृश्यात देश आपली संरक्षण क्षमता कशी तयार करतो, वाढवतो आणि टिकवून ठेवतो हे ठरवतो.

राफे एमफिबरचे विवेक मिश्रा यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे वर्णन करताना, भारताच्या सुरक्षा दलांसाठी प्रगत प्रणाली विकसित करण्याच्या जवळजवळ एक दशकाच्या अनुभवांवर भाष्य केले. “आम्ही भारतात परतलो तेव्हा आम्हाला आमच्या सैन्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत ऊर्जा आणि संरक्षण प्रणाली तयार करायच्या होत्या,” असे मिश्रा म्हणाले. “आमच्या लवकरच लक्षात आले की नवोपक्रमासाठी केवळ कल्पनांची गरज नाही तर मानवी भांडवल, आर्थिक भांडवल आणि वापरकर्त्यांशी सातत्याने संवाद आवश्यक आहे.”

मिश्रा म्हणाले की 2016 पासून भारताचे नवोपक्रम वातावरण नाट्यमयरित्या सुधारले असले तरी, निधी आणि संशोधन गुंतवणुकीतील आव्हाने कायम आहेत. “सरकारने आपली भूमिका बजावली आहे, आता खाजगी भांडवलदारांनी मोठी उडी मारण्याची वेळ आली आहे. संरक्षण नवोपक्रम केवळ सार्वजनिक निधीवर अवलंबून राहू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट घराण्यांकडून अधिक गुंतवणूक केली जावी असे आवाहनही त्यांनी केले.

भांडवल आणि संदर्भ यातील अंतर कमी करणे

अनिरुद्ध सुरी यांनी निदर्शनास आणून दिले की भारतातील स्टार्ट-अप इकोसिस्टम फिनटेक आणि मोबिलिटी सारख्या क्षेत्रात भरभराट आली आहे, परंतु गुंतवणूकदार आणि सशस्त्र दलांमधील “कोंबडी आधी की अंडे आधी समस्ये” मुळे संरक्षण तंत्रज्ञान मागे पडले आहे.

“खाजगी भांडवली वर्गाला अद्याप भारताच्या संरक्षण गरजा पूर्णपणे समजलेल्या नाहीत,” असे सुरी म्हणाले. “यामध्ये एक सांस्कृतिक आणि माहितीपूर्ण अंतर आहे, मुंबई किंवा बेंगळुरूमध्ये बसलेले गुंतवणूकदार नेहमीच भारताच्या लष्करी आव्हानांचा ऑपरेशनल संदर्भ समजून घेत नाहीत. जर आपल्याला सखोल-तंत्रज्ञान आणि संरक्षण नवोपक्रमात गंभीरपणे भांडवल प्रवाहित करायचे असेल तर ही समज अधिक खोलवर वाढवावी लागेल.”

ते पुढे म्हणाले की, संरक्षण तंत्रज्ञान उद्योजकांना अनेकदा फक्त  सरकार हा एकच ग्राहक आहे या समजुतीशी संघर्ष करावा लागतो, कारण अनेक बाजारपेठा असलेल्या व्यावसायिक क्षेत्रांपेक्षा ते वेगळे असतात. “जागतिक स्तरावर, पॅलांटीर किंवा अँडुरिल सारख्या कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना सुरुवात केली परंतु नंतर त्यात विविधता आली. भारतातील संरक्षण स्टार्ट-अप्सना लष्करी आणि नागरी अनुप्रयोगांसाठी उपयुक्त अशा दुहेरी-वापर तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

डीप टेकला डीप टॅलेंटची आवश्यकता आहे

अशीम अशोक पाटील, ज्यांची कंपनी आय-टेक आरएफआयडी उत्पादन आणि सुरक्षित ओळख तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात काम करत आहे, त्यांनी नवोपक्रम टिकवून ठेवण्यासाठी प्रतिभा आणि प्रशिक्षणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

“भारताची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली तरुण पिढी, परंतु आपल्याला ती डीप टेककडे वळवण्याची आवश्यकता आहे,” असे पाटील म्हणाले. “संरक्षण प्रणालींसाठी मटेरियल सायन्स, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर इंटिग्रेशन समजून घेणाऱ्या अभियंत्यांची कमतरता आहे. ते फक्त कोडिंगबद्दल नाही, तर ते उभारणीबद्दल आहे.”

त्यांनी नमूद केले की कंपन्या अनेकदा भरती झालेल्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात अनेक महिने घालवतात आणि संरक्षण अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रतिभा तयार करण्यासाठी मजबूत शैक्षणिक-उद्योग संबंधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रत्येक अभियंताने मोठे क्षेपणास्त्रच बांधण्याची आवश्यकता नाही. अगदी लहान उपप्रणाली विकसित करणे देखील अचूकतेने केले तर त्याचाही मोठा परिणाम होऊ शकतो,” असे ते म्हणाले.

वापरकर्ता-केंद्रित नवोपक्रम आणि परिसंस्था बांधणी

चर्चासत्रात सहभागींनी हे मान्य केले की वापरकर्त्याने नवोपक्रमाच्या केंद्रस्थानी राहिले पाहिजे. मिश्रा यांनी जोर देऊन सांगितले की, अनेक तंत्रज्ञानांची व्याप्ती वाढवण्यात ते अपयशी ठरतात कारण ते वेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात. “आपण एक उत्कृष्ट ड्रोन किंवा एआय सिस्टम डिझाइन करू शकतो, परंतु जोपर्यंत त्याची चाचणी घेतली जात नाही आणि सैनिकांसह क्षेत्रात विकसित होत नाही तोपर्यंत ते कधीही खरोखर उपयुक्त ठरणार नाही,” असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या बदलापेक्षा भारत पुढे राहण्यासाठी सेवा आणि उद्योग यांच्यातील अभिप्राय चक्र (संवादचक्र)  “दहापटी”ने वाढले पाहिजे, असे सुचवत त्यांनी नवोन्मेषक आणि सशस्त्र दलांमध्ये अधिक दृढ संवाद साधण्याचे आवाहन केले.

एकमेकांना जोडणारे

सुरी यांनी एक धाडसी मत मांडले, अधिक तंत्रज्ञान तज्ज्ञांना थेट सशस्त्र दलात समाविष्ट करणे आणि माजी सैनिकांना संरक्षण उद्योजकतेत रूपांतरित करण्यास प्रोत्साहित करणे. “अमेरिकेतील संरक्षण परिसंस्था भरभराटीला येते कारण तिथे अभियंते, सैनिक आणि उद्योजक एकमेकांवर अवलंबून राहून काम करतात,” असे त्यांनी नमूद केले. “भारताने तशाच प्रकारच्या पद्धतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. माजी सैनिकांना युद्धभूमी समजते; तंत्रज्ञांना नवोपक्रम समजतात. एकत्रितपणे, ते भविष्य घडवू शकतात.”

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia’s CDS on Theaterisation: “90% of Planning Complete, Future Wars Demand Integration and Innovation”
Next articleदेशाला तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण परिवर्तनाची आवश्यकता: लष्करप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here