युद्धनौका INS Nistar नौदलात दाखल; पाण्याखालच्या युद्ध क्षमतेतील गेम-चेंजर

0

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) द्वारे, विशाखापट्टणम येथे वितरित केलेली देशातील पहिली स्वदेशी डिझाइनची आणि स्वदेशी बनावटीची, ‘INS Nistar’ ही युद्धनौका (डायव्हिंग सपोर्ट व्हेसल-DS) भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

साधारणत: 75% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर झालेल्या या जहाजाने, भारताच्या सागरी तंत्रज्ञानातील स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले आहे. ‘Make in India’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत, Indian Register of Shipping (IRS) च्या मान्यताप्राप्त नियमांनुसार तयार करण्यात आलेली INS Nistar, ही नौदलाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे.

‘Nistar’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये

118 मीटर लांब आणि 9,350 टन वजनाची INS Nistar हे जहाज, अत्याधुनिक डायव्हिंग आणि बचाव तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

सुमारे 300 मीटर खोलीपर्यंत सॅच्युरेशन डायव्हिंगसाठी ते सक्षम आहे.

75 मीटर खोल पाण्यात मिशन पार पाडण्यासाठी साइड डायव्हिंग स्टेज वापरण्याची क्षमता आहे.

1,000 मीटरपर्यंत निरीक्षण व बचाव कार्यासाठी ROVs (Remotely Operated Vehicles) सोडू शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती 650 मीटर खोलवर अडकलेल्या पाणबुडीतील नौसैनिकांना वाचवण्यासाठी Deep Submergence Rescue Vehicle (DSRV) ने सुसज्ज आहे.

हे जहाज सलग 60 दिवस समुद्रात राहू शकते, एकावेळी 200 पेक्षा अधिक कर्मचारी वाहून नेऊ शकते तसेच हेलिकॉप्टर ऑपरेशन्समध्येही ते सक्षम भूमिका निभावू आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील खोल समुद्र मोहिमांसाठी ‘INS Nistar’ एक मजबूत व्यासपीठ ठरणार आहे.

याच वर्गातील ‘INS Nipun’ हे दुसरे जहाज, येत्या काळात पश्चिम नौदल दलात सामील होणार आहे.

‘गाझी’ ते ‘निस्तार’ – एका परंपरेचा पुनर्जन्म

‘निस्तार’ हा मूळ संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ ‘मोक्ष’, ‘बचाव’ किंवा ‘मुक्ती’ असा असा होतो. हे नाव 1971 च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या एका जहाजाच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.

त्या काळात, ‘निस्तार’ नावाच्या जुन्या डायव्हिंग टेंडर जहाजाने, PNS Ghazi या पाकिस्तानच्या अत्यंत घातक पाणबुडीचा शोध घेऊन तिचा नाश झाल्याचे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही अभूतपूर्व घटना विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर घडली होती.

आजची ‘INS निस्तार’ म्हणजे त्या परंपरेचा एक आधुनिक, शक्तिशाली आणि पूर्णतः स्वदेशी अवतार आहे. जिथे जुने निस्तार संरक्षणात्मक भूमिकेत महत्त्वाचे होते, तिथे हे नवे ‘INS निस्तार’ बचावासोबतच रणनीतिक दबाव निर्माण करणारे साधन ठरणार आहे.

प्रादेशिक तणावांच्या पार्श्वभूमीवर भारताची पाणबुडी क्षेत्रातील तयारी

भारतीय नौदल सध्या 17 डिझेल-इलेक्ट्रिक आणि 2 अणुबॉम्ब क्षमतेच्या पाणबुडींसह कार्यरत आहे, आणि लवकरच आणखी अणु-संचालित हल्लेखोर पाणबुडी (SSNs) सुद्धा नौदलात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, स्वतःची समर्पित सहाय्यक जहाजे असणे अत्यावश्यक झाले होते.

आतापर्यंत, पाणबुडी बचाव किंवा आपत्कालीन परिस्थितीत नौदलाला ONGC किंवा खासगी कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत होते.

आता, INS Nistar आणि लवकरच येणारी INS Nipun यांच्यामुळे भारताला स्वतःच्या तसेच सहयोगी देशांच्या पाणबुडी बचाव मोहिमांमध्ये आत्मनिर्भरता मिळणार आहे.

पाकिस्तान चीनच्या मदतीने 8 नवीन पाणबुडी खरेदी करत आहे, त्यापैकी अर्ध्या कराचीमध्ये तयार केल्या जात आहेत. याशिवाय, चीनचा भारतीय महासागरातील सागरी दबावही वाढत आहे.

अशावेळी, ‘INS निस्तारसारखी’ जहाजे भारताला युद्ध तसेच आपत्ती काळात तांत्रिक आणि रणनीतिक लवचिकता प्रदान करतात.

भविष्याकडे पाहताना…

खोल समुद्रातील डायव्हिंग आणि बचाव क्षमतांचे बळकटीकरण करुन, भारत सध्या पाणबुडी युद्धाच्या आधुनिक वास्तवासाठी सज्ज होत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleकॉपरवर 50% Tariff लादण्याची ट्रम्प यांची घोषणा; व्यापार युद्धात वाढ
Next articleTrump Criticizes Putin After Approving More Weapons For Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here