इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर शोधण्यासाठी असमर्थ असल्याची अमेरिकेची कबुली

0
इराणच्या
19 मे 2024 रोजी इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील वर्झाकान येथे इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर बचाव वाहनांचा ताफा (अझिन हगीघी/मोज न्यूज एजन्सी/डब्ल्यू. ए. एन. ए. (पश्चिम आशिया न्यूज एजन्सी) व्हाया रॉयटर्स)

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी इराणने अमेरिकेची मदत मागितली होती.

मात्र  इराणच्या या विनंतीवर अमेरिका मदत करण्यास असमर्थ असल्याची कबुली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत दिली.

अझरबैजानच्या सीमेजवळील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळले.

“मुख्यत्वे लॉजिस्टिकशी संबंधित कारणांमुळे, आम्ही ती मदत देऊ शकलो नाही”, असे मिलर म्हणाले.

इराणने अमेरिकानिर्मित बेल 212 हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

रविवारी कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष सोमवारी पहाटे सापडले. इराणी अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष रायसी, परराष्ट्रमंत्री हुसेन अमिराबदोल्लाहियान आणि इतर सहा प्रवासी विमानात असल्याची बातमी खरी असल्याचे मान्य केले.

या दुर्घटनेमागे अमेरिकेचा हात नसल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. “या अपघातामागे नेमके काय कारण असेल याचा मी अंदाज लावू शकत नाही.”

ऑस्टिन म्हणाले की, या अपघाताचा मध्य पूर्वेतील सुरक्षिततेवर कोणताही तात्काळ परिणाम होणार नाही.

“मला या क्षणी कोणताही व्यापक, प्रादेशिक सुरक्षिततेवर होणारा परिणाम दिसत नाही.”

इराणच्या संविधानानुसार, 50 दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्ष पदासाठी नव्याने निवडणूक होणे आवश्यक आहे.

इराणने सोमवारी कट्टरपंथी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासाठी पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला. परंतु इस्लामिक प्रजासत्ताकाच्या 45 वर्षांच्या इतिहासात इतर वरिष्ठ व्यक्तींच्या मृत्यूनंतर अशाप्रकारे सार्वजनिक शोक व्यक्त झालेला दिसत नाही.

रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांच्या मृत्यूनंतर प्रार्थना करण्यासाठी सरकारी निष्ठावंतांनी मशिदी आणि चौकात गर्दी केली. मात्र त्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामकाजावर फार मोठा परिणाम झालेला दिसून आला नाही. तिथली बहुतांश दुकाने उघडी होती आणि अधिकाऱ्यांनीही सामान्य जीवनात व्यत्यय आणण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत.

नैतिकतेचे नियम पाळले नसल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या तरुण इराणी कुर्दिश महिलेच्या मृत्यूनंतर  2022-2023 मध्ये इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. त्यात शेकडो इराणींचा मृत्यू झाला.

अश्विन अहमद
(रॉयटर्स)


Spread the love
Previous article‘अग्निवीर हे नवोन्मेषक व सार्वभौमत्वाचे रक्षणकर्ते’
Next articleSolomon Islands Tells Australia It Will Review Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here