इस्रायली गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला इराणमध्ये फाशी

0

इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आणि इराण विरोधी गटांशी संबंध असल्याचा आरोप ठेवत, संबंधित व्यक्तीला शनिवारी इराणमध्ये फाशी देण्यात आली. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे न्यायपालिकेच्या ‘मिझान’ या वृत्तसंस्थेने सांगितले.

इस्रायलसोबत दशकांपासून सुरू असलेल्या छुप्या युद्धात अडकलेल्या इराणने, इस्रायली गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आणि त्यांच्या देशांतर्गत कारवायांमध्ये त्यांना मदत केल्याचा आरोप करत, आतापर्यंत अनेक लोकांना फाशी दिली आहे.

ओस्लो येथील ‘इराण ह्युमन राइट्स’ या गटाने ‘X’ द्वारे जाहीर केले की, “अघिल केशावर्झ या आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या 27 विद्यार्थ्याला, इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्याविषयीचा कबुलीजबाब त्या विद्यार्थ्याचा छळ करून त्याच्याकडून नोंदवून घेण्यात आला होता.”

जूनमध्ये, इराण-इस्रायलमधील संघर्षाचे रुपांतर एका गंभीर युद्धात झाले, जेव्हा इस्रायलने इराणमधील विविध लक्ष्यांवर हल्ले केले. या मोहिमांमध्ये मोसादच्या कमांडोंना देशाच्या अगदी आतपर्यंत तैनात करण्यात आले होते.

यावर्षी, इस्रायलसाठी हेरगिरी केल्याबद्दल दोषी ठरवलेल्या इराणी नागरिकांच्या फाशीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अलीकडच्या महिन्यांत अनेक मृत्युदंडाच्या शिक्षा अंमलात आणण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर 2025 मध्ये, इराणने 2022 मधील महसा अमिनीच्या मृत्यूनंतर उसळलेल्या अशांततेदरम्यान, एका सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला फाशी दिली. हिजाब कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून इराणच्या ‘मॉरॅलिटी पोलीस’ कोठडीत असताना अमिनीचा मृत्यू झाला होता. अमिनीचा मृत्यू इराणमधील महिलांच्या हक्कांवरील व्यापक हल्ल्यांवर प्रकाश टाकतो.

‘डीडब्ल्यू’च्या (DW) वृत्तानुसार, महिला हक्क कार्यकर्त्या महदीह गोलरोऊ यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही अशा व्यवस्थेचा सामना करत आहोत, ज्यांच्या विचारधारेत अगदी खोलवर स्त्रीद्वेष भिनला आहे.”

गोलरोऊ 2019 पासून परदेशात राहत असून, महिलांचे हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या मोहिमांमुळे, त्यांना इराणमध्ये अनेकदा अटक करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य शिरोवस्त्र घालण्यास नकार देणाऱ्या महिलांनी इराणी समाजातील महिलांच्या प्रतिमेवर मोठा प्रभाव पाडला आहे.

गोलरोऊ म्हणाल्या की, “त्यांचा संघर्ष आणि नागरी प्रतिकार अद्याप संपलेला नाही, कारण ही व्यवस्था महिलांच्या हक्कांना पायदळी तुडवण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असते, उदाहरणार्थ हुंडा कायद्यातील सुधारणा.”

इराणी संसदेने हुंडा कायद्यातील बदल स्विकारले असून, खासदारांनी त्याचे वर्णन “तातडीने आवश्यक बदल” असे केले आहे.

हे बदल, लग्नापूर्वी पुरुष आपल्या वधूला देत असलेल्या रकमेत (जी सहसा सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात असते) कपात करतात. पूर्वी ही रक्कम 100 सोन्याची नाणी इतकी होती, जी आता केवळ 14 नाण्यांवर आणली गेली आहे, ज्यामुळे घटस्फोटाच्यावेळी महिलांकडे असलेला आर्थिक स्वातंत्र्याचा एकमेव स्त्रोत कमकुवत झाला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीचवरील हल्ला हे ‘इस्लामी दहशतवाद्यांचे कृत्य’
Next articleBeijing Tracks India’s Military Modernisation as PLA Bets on Multi-Domain Warfare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here