मनी लाँड्रिंग, डॉलर्सची तस्करी आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कोषागार अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर इराकची मध्यवर्ती बँक आणखी पाच स्थानिक बँकांवर अमेरिकन डॉलरच्या व्यवहारांवर बंदी घालणार असल्याचे दोन सूत्रांनी रविवारी सांगितले.
एका सूत्राने सांगितले की, गेल्या आठवड्यात दुबईमध्ये सेंट्रल बँक ऑफ इराक, अमेरिकन ट्रेझरी आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या वर्षी आठ बँकांना अमेरिकन डॉलरच्या व्यवहारांसाठी बँक ऑफ इराकने आधीच बंदी घातली आहे.
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी मित्रत्वाचे संबंध असलेला इराक – ज्याचा अमेरिकेत 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त साठा आहे – तेल महसूल आणि वित्तपुरवठ्यातील त्याचा प्रवेश रोखला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी वॉशिंग्टनच्या कृपेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
ट्रम्प यांचा ‘कमाल दबाव’
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्यात इराणच्या संदर्भात आपले “जास्तीत जास्त दबाव” धोरण पुन्हा अवलंबणार असल्याचे सांगितल्यामुळे ओपेकचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक संकटात सापडू शकतो.
इराण आपला शेजारी आणि मित्र देश इराककडे एक आर्थिक ‘मदतगार’ म्हणून पाहतो. याशिवाय शक्तिशाली शिया सैन्यदल आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून तेथे लक्षणीय लष्करी, राजकीय आणि आर्थिक प्रभाव पाडतो. त्याला निर्यातीद्वारे इराकमधून ठोस चलन देखील मिळते आणि त्याच्या बँकिंग प्रणालीद्वारे अमेरिकेचे निर्बंध टाळता येतील.
इराण आणि त्याच्या प्रतिनिधींसाठी वर्षाला किमान $1 अब्ज उत्पन्न देणारे अत्याधुनिक इंधन तेल तस्करीचे जाळे, 2022 मध्ये पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी पदभार स्वीकारल्यापासून इराकमध्ये भरभराटीला आले आल्याची बातमी डिसेंबरमध्ये रॉयटर्सने उघडकीला आणली होती.
अमेरिकी डॉलरचे व्यवहार नाहीत
डॉलर्सच्या व्यवहारांवर बंदी घातलेल्या बँकांना काम सुरू ठेवण्याची आणि इतर चलनांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
मात्र या निर्णयामुळे बँकांच्या डॉलरमध्ये व्यवहार करण्याच्या क्षमतेवर निर्बंध येतील. ज्यामुळे इराकच्या बाहेर चालवल्या जाणाऱ्या बहुतेक कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शक्तिशाली, इराण-समर्थित पक्ष आणि इराकच्या अत्यंत अनौपचारिक अर्थव्यवस्थेत स्वारस्य असलेल्या सशस्त्र गटांच्या पाठिंब्याने सध्याचे इराकी सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे इथल्या आर्थिक क्षेत्राला दीर्घकाळापासून मनी लॉन्ड्रिंग हॉट स्पॉट म्हणून पाहिले जात होते.
इराण आणि त्याच्या सहयोगी देशांच्या अमेरिकन डॉलर्समध्ये व्यवहार करण्याच्या क्षमतेवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने आर्थिक सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान सुदानी यांच्या सहकार्याचे पाश्चात्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले होते, परंतु ट्रम्प प्रशासन दबाव आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
अल-मशरेक अल-अरबी इस्लामिक बँक, युनायटेड बँक फॉर इन्व्हेस्टमेंट, अल सनम इस्लामिक बँक, मिस्क इस्लामिक बँक आणि अमीन इराक फॉर इस्लामिक इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स या पाच बँकांंना डॉलरमध्ये व्यवहार करायला बंदी घालण्यात आली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इराकने या निर्णयाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. कोषागारानेही प्रतिसाद देण्यास अद्याप होकार दिलेला नाही.
या कारवाईत तीन पेमेंट सर्व्हिसेस कंपन्यांचाही समावेश आहे – अमल, अल-सकी पेमेंट आणि अक्सा पेमेंट.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)