सीरियातील हामा येथे रविवारी रात्री उशिरा इस्रायलने अनेक हल्ले केले. सीरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात किमान 14 नागरिक ठार झाले आहेत. एका मोठ्या लष्करी संशोधन केंद्राला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात गुंतलेल्या इराणी लष्करी तज्ञांचे एक पथक येथे होते असे सांगितले जात आहे.
इस्रायली नागरिक आणि सैनिकांवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायलने इराण समर्थित मिलिशिया लक्ष्यांवर आपले हल्ले वाढवले आहेत. यामध्ये सीरियात केले जाणारे हल्ले, सीरियन लष्कराच्या हवाई संरक्षण आणि काही सीरियन सैन्याला लक्ष्य करणे यांचा समावेश आहे.
सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने एका स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिस्याफ शहराच्या परिसरात रविवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले.
दोन स्थानिक गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्याफजवळ असलेल्या रासायनिक शस्त्रे उत्पादनासाठीच्या प्रमुख लष्करी संशोधन केंद्रावर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात गुंतलेल्या इराणी लष्करी तज्ज्ञांचे एक पथक येथे होते असे सांगितले जाते.
सीरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी असेही वृत्त दिले की या हल्ल्यांमुळे दोन आग लागल्या, ज्या विझवण्याचे काम अग्निशामक कर्मचारी करत होते.
इस्रायलकडून यासंदर्भात त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सामान्यतः सीरियातील हल्ल्यांच्या विशिष्ट अहवालांवर इस्रायल कोणतेही भाष्य करत नाही.
गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून सीरियावर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात संशयित इस्रायली लढाऊ विमानांनी एप्रिलमध्ये इराणच्या दूतावासावर बॉम्बहल्ला केला. इराणने सांगितले की या हल्ल्यात तीन वरिष्ठ कमांडरांसह सात लष्करी सल्लागार ठार झाले.
सीरियातील 13 वर्षांच्या गृहयुद्धादरम्यान, इस्रायलने नियमितपणे देशात हवाई हल्ले केले आहेत – मुख्यतः इराणशी संबंधित स्थळांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे.
वाढत्या प्रादेशिक तणावाच्या दरम्यान, इराणच्या अधिकाऱ्यांनी जुलैमध्ये तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हनियेह याच्या हत्येनंतर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असे जाहीर केले होते. त्यानंतर रविवारी हा हल्ला करण्यात आला.
सीरियामध्ये इराणचे लष्कर उपस्थित आहे. या हत्येप्रकरणी इस्रायलला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, हत्या होऊन आता 40 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरी इराणकडून कोणताही हल्ला झालेला नाही.
हिजबुल्लानेही 25 ऑगस्ट रोजी इस्रायलवर केलेला हल्ला हा त्या संघटनेचा होता. बैरूतमधील इस्रायली हवाई हल्ल्यात त्याच्या एका वरिष्ठ सेनापतीच्या हत्येच्या प्रत्युत्तरादाखल केलेला तो हल्ला होता. या हल्ल्यात अनेक नागरिकही मारले गेले.
तेव्हापासून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील सीमेपलीकडील शत्रुत्व जवळपास दररोज बघायला मिळत आहे. गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ ते उत्तर इस्रायलमधील लष्करी ठिकाणांना आणि सीरियातील गोलान टेकड्यांना लक्ष्य करीत असल्याचे हिजबुल्लाचे म्हणणे आहे.
गाझामधील युद्ध संपेपर्यंत आपली लष्करी कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन लेबनॉनच्या गटाने दिले आहे. मात्र, इस्रायली अधिकाऱ्यांनी गरज भासल्यास युद्ध करून हिजबुल्लाहला देशाच्या सीमेपार दूर ढकलून देण्याचे आश्वासन दिले आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)