गाझा पट्ट्यातील लक्ष्यांवर इस्रायली सैन्याचे हल्ले सुरूच

0
गाझा
इस्रायली सैनिकांनी दक्षिण इस्रायलमधील गाझाच्या सीमेजवळ पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासवर तोफगोळ्यांचा मारा सुरूच ठेवला आहे  (रॉयटर्स)

एन्क्लेव्हच्या उत्तरेकडील आपल्या हवाई दल आणि लष्करने डझनभर दहशतवाद्यांना ठार केले असून इतर अनेकांना पकडले असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले. मध्य गाझा पट्टीमधील नुसिरात बाजार परिसरातील नागरी आपत्कालीन केंद्रावर हवाई हल्ला झाला, ज्यात अहमद अल-लोह, एक व्हिडिओ पत्रकार आणि इतर पाच लोक ठार झाल्याच्या बातमीला वैद्यकीय आणि तिथे असलेल्या पत्रकारांनी दुजोरा दिला.इस्रायली सैन्याने सांगितले की, हल्ल्यात हमास आणि गाझाच्या सिव्हिल डिफेन्सच्या नुसिरात कार्यालयात कार्यरत असलेल्या इस्लामिक जिहाद अतिरेक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यांनी अल-लोह हा इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाचा सदस्य असल्याचे सांगितले असले तरी त्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही.

टीव्ही नेटवर्कने इस्रायलच्या या आरोपावर त्वरित भाष्य केले नसले तरी गाझा युद्धात ठार झालेले कतारच्या मालकीच्या नेटवर्कचे काही पत्रकार दहशतवादी गटांचे सदस्य असल्याच्या इस्रायलच्या पूर्वीच्या दाव्यांचा निषेध केला आहे.

हमासच्या माध्यमांनी सांगितले की, नुसेरात येथील नागरी आपत्कालीन सेवेचे प्रमुख नेदल अबू हेजायर हे देखील हल्ल्यात मारले गेले.

नागरी आपत्कालीन सेवेत असलेल्या झाकी इमादेलदीन यांनी रुग्णालयातील पत्रकारांना सांगितले की, “लोकांची सेवा करण्यासाठी चोवीस तास उपस्थित असलेल्या गटावर नुसेरात छावणीतील नागरी आपत्कालीन मुख्यालयात हल्ला करण्यात आला.”

गाझा शहराच्या पश्चिमेस मदत पुरवणाऱ्या ट्रकचे संरक्षण करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या हमासशी संबंधित पुरुषांच्या गटावर आणखी एक हवाई हल्ला करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते यात अनेक जण जखमी झाले आहेत परंतु अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.

गाझा शहरातील घरांवर इस्रायलने केलेल्या तीन हवाई हल्ल्यांमध्ये किमान 11 लोक ठार झाले, बीट लाहिया, बीट हानून आणि जबालिया छावणी या शहरांमध्ये घरांवर बॉम्बफेक करण्यात आली किंवा ती पेटवून देण्यात आली. या घटनेत नऊजण ठार झाले तर रफाहमध्ये दोघेजण ठार झाल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि रहिवाशांनी सांगितले.

गाझा शहरातील तीन घरे हल्ल्यांची योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांची असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले. अचूक शस्त्रास्त्रांचा वापर आणि हवाई पाळत ठेवण्यासह नागरिकांचा धोका कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

लष्कराने बीट लाहियामध्ये जप्त केलेली शस्त्रे, स्फोटके आणि डझनभर हातबॉम्ब असलेले छायाचित्र जारी केले.

दक्षिण गाझाच्या खान युनूस येथे, निर्वासित कुटुंबांच्या निवाऱ्यांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 20 लोक ठार झाले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीट हानूनमधील रहिवाशांनी सांगितले की इस्रायली सैन्याने खलिल अवेदा शाळेत आश्रय घेतलेल्या कुटुंबांवर हल्ला करण्यापूर्वी शाळेला वेढा घातला आणि त्यांना गाझा शहराच्या दिशेने जाण्याचे आदेश दिले.

या छाप्यात अनेक नागरिक मारले गेले किंवा जखमी झाले, तर लष्कराने अनेक पुरुषांना ताब्यात घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांच्या हवाई आणि लष्करी दलांनी डझनभर दहशतवाद्यांवर हल्ला केला आणि बीट हानूनमध्ये इतरांना पकडले.

हमास आपल्या सैन्याच्या जीवितहानीची कोणतीही माहिती प्रसारित करत नाही आणि पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालय मृतांची संख्या देताना त्यात लढवय्ये आणि नागरिक असा फरक करत नाही. गाझाचे अतिरेकी नियमितपणे नागरी वस्त्यांमध्ये घुसतात आणि तिथल्या नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करतात असा दावा इस्रायलने केला आहे.

 

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here