इस्रोची अंतराळातील 100वी मोहीम यशस्वी, रचला इतिहास

0
isro, space, gslv

नेव्हिगेशनसाठी अंतराळात स्वतःच्या उपग्रह संरचनेचा अभिमान बाळगणाऱ्या मोजक्या देशांमध्ये अता भारताचा समावेश झाला आहे. बुधवारी भारताने स्वदेशी बनावटीच्या रॉकेटद्वारे नवीन दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले, ज्यामुळे त्याची स्वतंत्र उपग्रह स्थिती प्रणाली मजबूत झाली.

एनव्हीएस – 02 उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय वेळेनुसार सकाळी 6.23 वाजता (0053 जी. एम. टी.) जीएसएलव्ही-एफ15 रॉकेटवरून प्रक्षेपित करण्यात आला. इस्रोची ही 100 वी अंतराळ मोहीम होती. यामुळे नौवहन प्रणालीसह दिशादर्शक विस्तारात भारताच्या प्रयत्नांमधील हे नवीन पाऊल ठरले आहे.

भारत आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये स्थाननिर्धारण सेवा पुरवण्यासाठी तयार करण्यात आलेला नॅव्हिक हा अमेरिकेच्या  Global Positioning System (GPS), चीनची बेइडू, युरोपियन गॅलिलिओ आणि रशियाची ग्लोनास यांना भारताने दिलेले तोडीस तोड उत्तर आहे.

संरक्षण कार्यांपासून ते स्मार्टफोन नेव्हिगेशन आणि आर्थिक व्यवहारांपर्यंत सर्वकाही सक्षम करणाऱ्या उपग्रह जाळ्यांचा विस्तार करण्यासाठी देशांमधील शर्यतींबरोबरच, अंतराळातील स्पर्धा तीव्र होत असताना, हे इस्त्रोचे 100 वे यशस्वी प्रक्षेपण आहे.

भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले, “या विक्रमी कामगिरीच्या ऐतिहासिक क्षणी अंतराळ विभागाशी संबंधित असणे हा एक अभिमानाचा विषय आहे.”

उद्योग क्षेत्रातील आकडेवारीनुसार, 2024 मध्ये, अमेरिका 145 अंतराळ प्रक्षेपणांसह आघाडीवर आहे, ज्या मुख्यत्वे स्पेसएक्सद्वारे चालवल्या गेल्य. तर चीनने 68 प्रक्षेपणे केली. भारत – जो या सगळ्यात ऐतिहासिकदृष्ट्या एक लहान खेळाडू आहे –  मार्च 2025 पर्यंत आणखी 30 मोहिमांचे नियोजन करत, आपल्या प्रक्षेपणाची गती वाढवत आहे. निःसंशयपणे, ही एक मोठी कामगिरी आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleU.S. To Transfer Patriot Missiles From Israel To Ukraine
Next articleKim Calls For Strengthening Nuclear Forces Of North Korea

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here