पुतिन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारासाठी एस. जयशंकर मॉस्कोला भेट देणार

0

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात, द्विपक्षीय चर्चांसाठी मॉस्कोला रवाना होत आहेत. 2020 मध्ये युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची डिसेंबरमध्ये होणारी ही पहिलीच भेट असल्याने, या भेटीबद्दल सध्या अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा, यांनी जयशंकर यांच्या भेटीला आणि त्यांचे समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबतच्या बैठकांना दुजोरा दिला आहे.

जयशंकर यांच्या भेटीदरम्यान, भारताकडून होणारी रशियन बनावटीच्या प्रमुख संरक्षण उपकरणांची खरेदी आणि संयुक्त उत्पादन कार्यक्रम या मुद्द्यांवर भर दिला जाईल. तसेच, पाश्चात्त्य देशांकडून बारीक लक्ष ठेवले जात असतानाही दिल्लीकडून सवलतीच्या दरात होत असलेली रशियन कच्च्या तेलाची खरेदी, हा देखील या चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा असेल, ज्यामध्ये दोन्ही देश दीर्घकालीन व्यापार व्यवस्था स्थिर करण्यास उत्सुक आहेत.

युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातील बदलती सुरक्षा परिस्थिती आणि SCO, BRICS परिषदांसह इतर बहुपक्षीय मंचांवरील समन्वय यांसारखे इतर विषयही चर्चेच्या अजेंड्यावर आहेत.

रशियाने चीनकडून या समूहाचे फिरते अध्यक्षपद स्विकारल्यामुळे, जयशंकर यांच्या दौऱ्यात ते SCO काउन्सिलच्या शासनप्रमुखांच्या सत्रातही भाग घेतील.

भारत या बैठकीत कनेक्टिव्हिटी, दहशतवादविरोधी सहकार्य आणि प्रादेशिक स्थिरतेवरील आपला दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार हे देखील या बैठकीत सहभागी होणार असले तरी, त्यांच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा भारतीय अधिकाऱ्यांना नाही.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleDRDO द्वारे नव्या मॅन-पोर्टेबल स्वयंचलित अंडरवॉटर वाहनांचे अनावरण
Next articleचीनचे अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here