जयशंकर आणि यी यांच्यात चर्चा; सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा चीन दौरा अपेक्षित

0

भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तियानजिनमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली.

SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने भारत चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपसात चर्चा केली, ज्यामध्ये उभय देशांच्या उर्वरित सीमाविषयक समस्या सोडवणे, धोरणात्मक संवाद वाढवणे आणि सुधारित द्विपक्षीय संबंधांसाठी मार्ग मोकळा करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले.

सीमावादावर द्विपक्षीय चर्चा आणि गती

जयशंकर यांनी नमूद केले की ऑक्टोबर 2024 मध्ये कझान येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील भेटीपासून, विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) काही घर्षण बिंदूंच्या (friction points) संदर्भातील वादाचे निराकरण झाल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये “हळूहळू प्रगती” दिसून आली आहे,

“सीमेशी संबंधित इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करणे आता आपल्याला बंधनकारक आहे, ज्यामध्ये तणाव कमी करणे ही गोष्ट समाविष्ट आहे,” असे जयशंकर म्हणाले, LAC वर शांतता राखणे हा “परस्पर धोरणात्मक विश्वासाचा मूलभूत आधार आहे.”

चर्चेत व्यापार निर्बंध, सीमापार सहकार्य आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढवण्याच्या प्रयत्नांचाही समावेश होता, विशेषतः पाच वर्षांच्या स्थगितीनंतर अलिकडेच कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

जुलैमध्ये यी भारत दौऱ्यावर येण्याची अपेक्षा

यी या महिन्याच्या अखेरीस सीमावादाच्या मुद्द्यावर विशेष प्रतिनिधी (SR) यंत्रणेअंतर्गत चर्चेच्या नवीन फेरीसाठी भारतात येण्याची शक्यता असल्याचे राजनैतिक सूत्रांनी सांगितले. यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दोघेही दीर्घकाळ चाललेल्या सीमा चर्चेत SR म्हणून भूमिका पार पाडत असून, चर्चेच्या आतापर्यंत 23 फेऱ्या झाल्या आहेत.

चीनबरोबर सक्रिय संबंध सुधारण्यासाठी भारताचे प्रयत्न

पूर्वी सांगितल्याप्रमाणे, पूर्व लडाखमधील 2020 च्या लष्करी चकमकीमुळे उच्च स्तरावर  मोठ्या प्रमाणात तणाव  निर्माण झाल्यानंतर, जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, दोन्ही देशांनी डेमचोक आणि देपसांग येथे मंत्रिस्तरीय देवाणघेवाण आणि परस्पर विघटन करारांद्वारे संबंध स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे.

जूनमध्ये, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी किंगदाओ येथे SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चीनला भेट दिली, जिथे त्यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी उभय देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याचे आवाहन केले. 2020 च्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या अविश्वासाच्या नात्यावर तोडगा काढण्यासाठी ‘प्रत्यक्ष कृती’ करण्याची गरज अधोरेखित केली.

SCO आणि प्रादेशिक सुरक्षेवर भर

चीनच्या अध्यक्षतेखाली तियानजिन येथे होणाऱ्या SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत प्रादेशिक सहकार्य, दहशतवादाचा सामना आणि सुरक्षा मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. भारताने दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या गरजेचा पुनरुच्चार केला आणि SCO चौकटीत बहुपक्षीय प्रयत्न बळकट करण्याचे आवाहन केले.

मोदी सप्टेंबरमध्ये ज्या SCO शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्याकडे भारत आणि चीन यांच्यात सध्या सुरू असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक बदलांदरम्यान राजनैतिक संबंध वाढवण्याची एक महत्त्वाची संधी म्हणून पाहिले जात आहे.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleJaishankar Holds Talks with Wang Yi in Tianjin; PM Modi’s Expected China Visit in September
Next articleNew IAF Chief To Preside Over A Force At The Cusp Of Major Changes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here