‘विकसित भारताला लवचिक परराष्ट्र धोरणाची आवश्यकता’- जयशंकर

0
विकसित भारत
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, विकसित भारताला लवचिक परराष्ट्र धोरणाची आवश्यकता आहे.

“भारत आणि चीनने २००५ मध्ये एकमेकांचे रणनीतिक भागीदार होण्यास सहमती दर्शवली होती, चीन हा एक असा देश आहे ज्याने आपल्या हजारो किलोमीटर भूभागावर व्यावहारिक ताबा मिळवला आहे. याच धर्तीवर २००८ मध्ये दोन्ही देशांत व्यापार व्यवस्थेवर आणि विस्तारावर चर्चाही झाली होती,” अशी माहिती परराष्ट्र मंत्री- डॉ. एस. जयशंकर यांनी दिली. रविवारी दिल्लीत झालेल्या ‘India’s World’ या ‘foreign affairs magazine’ च्या लाँचिंग प्रसंगी ते बोलत होते.

‘’भविष्यातील ‘विकसित भारत’ हे आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून, भारताच्या परराष्ट्र धोरणात अधिक लवचिकता आणि चपळता आणावी लागेल’’, असे जयशंकर यावेळी म्हणाले

“विकसीत भारताचे परराष्ट्र धोरण हे महत्त्वाकांक्षी असले पाहिजे. भविष्यात आपण क्षितीजापलीकडे जाणाऱ्या अशा व्यापक योजना आखण्याची गरज आहे. तसेच आपल्याला जास्तीत जास्त मित्रराष्ट्रांना यामध्ये स्थान देण्याची गरज आहे ज्यामुळे भारताची स्थिती अधिक मजबूत होईल,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत हा जागतिक अनिश्चिततेच्या काळात उदयाला येत आहे. त्यामुळे आज कार्यरत असलेल्या आपल्या सरकारने भविष्यात उद्भवू शकतील अशा कठीण आव्हानांसाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे’, असा इशाराही त्यांनी यानेळी दिला. याकरता बचाव, संपर्क आणि संवाद क्षेत्रांचा फायदा करुन घेण्याचा सल्लाही जयशंकर यांनी यावेळी दिला.

“आजकाल तंत्रज्ञान, भांडवल आणि गुंतवणुकीसारख्या सर्वच क्षेत्रात, आर्थिक मुत्सद्देगिरीवर खूप ताण आहे. त्यामुळे भारताने त्याच्या उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या वाढीवर आणि क्षमता विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे’’, असं Supply chain साखळीच्या री-रुटिंग विषयी बोलताना जयशंकर म्हणाले.

मात्र दुसरीकडे ‘भारताची एकूण उत्पादन क्षमता ही आधिपेक्षा आता अधिक खूप सुधारित आणि सक्षम झाली आहे’, असा उल्लेखही त्यांनी केली. ‘आजचे डिजिटल युग हे पूर्वीच्या उत्पादन विश्वापेक्षा खूप वेगळे आहे, डिजिटल मालमत्ता डेटा उत्सर्जक आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘भारताने परदेशी बाजारात उतरत असताना जागतिक कार्यक्षेत्रातील विस्ताराची नोंद घेतली आहे. परदेशी बाजारात आज अंदाजे किमान 18 दशलक्ष भारतीय नागरिक आहे. भविष्यात हा आकडा लक्षणीय पद्धतीने वाढणार आहे आणि त्या दृष्टीनेच सध्या भारत अनेक देशांसोबत स्थलांतर आणि गतिशीलता करारांवर स्वाक्षरी करत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

 

कार्यक्रमादरम्यान बोलताना जयशंकर म्हणाले की, “पाश्चिमात्य देशांत आलेल्या आर्थिक निर्वासितांपेक्षा तिथले भारतीय हे वेगळे आहेत. त्यांच्या कलागुणांना पाश्चिमात्य देशांमध्ये बाजारपेठ मिळत आहे ना, याची खात्री करणे आवश्यक आहे.’’ जयशंकर यांनी भारताच्या काही प्रमुख परराष्ट्र धोरणांकडे आणि त्याविषयीच्या समस्यांवरही यावेळी प्रकाश टाकला. ज्यांचे स्वातंत्र्यानंतर अद्याप निराकरण झालेले नाही.

जयशंकर यांनी यावेळी नमूद केले की, भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणावर टीका कारणारे, त्यातील त्रुटी काढणारे अनेक लोक आहेत. कारण बहुधा ते परराष्ट्र धोरणाच्या नेहरूवादी मॉडेलपासून दूर गेलेले नाहीत. मात्र आजच्या काळातील आव्हाने, आजची बदलेली परिस्थीती याचा सगळ्याचा सारासार विचार करता आणि ‘विकसीत भारताचे’ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवता, भारताला अधिक लवचिक परराष्ट्र धोरणाची आवश्यकता आहे.


सूर्या गंगाधरन | अनुवाद- वेद बर्वे

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here