ज्युलियन असांजे याची तुरूंगातून सुटका, ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग मोकळा?

0
ज्युलियन
ज्युलियन असांजे (फाईल फोटो)

विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा ब्रिटिश तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. खरे तर, त्यांनी अमेरिकेबरोबर केलेल्या करारानंतर त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. आता त्यांना त्यांच्या मायदेशी ऑस्ट्रेलियात परतण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

वृत्तातील दाव्यानुसार असांजे यांनी लष्करी रहस्ये उघड करण्याच्या आरोपात दोषी असल्याचे अमेरिकेच्या न्यायालयात कबूल करण्यास सहमती दर्शविली आहे. त्या बदल्यात आपली सुटका व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती. न्यायालयात आपला गुन्हा कबूल करताच अनेक वर्षे सुरू असणाऱ्या या कायदेशीर कारवाईवर अखेर पडदा पडला आहे. जवळजवळ 14 वर्षे जुन्या हेरगिरीच्या प्रकरणात अमेरिकेच्या न्याय विभागाशी याचिका करार केल्यानंतर विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांची लंडनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. अफगाणिस्तान आणि इराकमधील चुकीच्या कृत्यांसह अनेक वर्गीकृत संरक्षण दस्तऐवजांच्या प्रकाशनाभोवती हे प्रकरण केंद्रित आहे.

या आठवड्यात बुधवारी ज्युलियन असांजे मारियाना बेटांवरील अमेरिकन फेडरल न्यायालयात हजर होणे अपेक्षित आहे. त्यावेळी बेकायदेशीरपणे वर्गीकृत राष्ट्रीय संरक्षण माहिती मिळवण्यासाठी दोषी असल्याचे त्यांनी कबूल करावे आणि त्या बदल्यात त्यांना मुक्त करण्याची परवानगी द्यावी यासाठी न्याय विभागाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अमेरिकेबरोबरच्या याचिकेच्या करारानंतर, ज्युलियन असांज यांना बेलमार्श तुरुंगातून –  जिथे त्यांनी पाच वर्षे घालवली-  लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर नेण्यात आले. 52 वर्षीय असांज नंतर विमानात चढताना आणि अज्ञात गंतव्यस्थानाकडे जाताना दिसले. सुटकेनंतर, ज्युलियन असांज त्यांच्या मातृभूमीला म्हणजे ऑस्ट्रेलियाला परत जाण्यास मुक्त आहेत.

एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केलेल्या निवेदनात विकिलीक्सने म्हटले आहे की ज्युलियन असांज तुरुंगातून सुटल्यानंतर ब्रिटनहून निघाले आणि विमानात चढले, मात्र त्यांचे विमान कुठे गेले हे उघड झालेले नाही. विकिलीक्सने म्हटले आहे की ते “या कठीण प्रसंगी आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या, आमच्यासाठी लढलेल्या आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढाईत पूर्णपणे वचनबद्ध असलेल्या सर्वांचे” आभारी आहोत.

“ज्युलियन असांज आता मुक्त आहे. 1हजार 901 दिवस राहिल्यानंतर 24 जून रोजी सकाळी ते बेलमार्श तुरुंगातून बाहेर पडले. त्यांना लंडनमधील उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि दुपारी स्टॅन्स्टेड विमानतळावर त्यांची सुटका करण्यात आली, तिथे ते विमानात चढले आणि ब्रिटनला रवाना झाले,” असे विकिलीक्सने म्हटले आहे.
त्यात म्हटले आहे की, “सरकारी कामकाजातील लोकांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरून विकिलीक्सने सरकारी भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या अभूतपूर्व कथा प्रकाशित केल्या. संपादक म्हणून ज्युलियनला या तत्त्वांसाठी आणि लोकांच्या जाणून घेण्याच्या अधिकारासाठी कठोर किंमत मोजली.”

2010 मध्ये गुप्त कागदपत्रे प्रकाशित केल्यानंतर, ज्युलियन असांजेवर विनयभंगाचा आरोप होईपर्यंत अनेकांनी त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वकील म्हणून घोषित केले होते.

ज्युलियन असांजला गुप्त कागदपत्रे देण्यासाठी मदत करणाऱ्या अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विश्लेषक चेल्सी मॅनिंग हिला 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी नंतर 2017 मध्ये तिची शिक्षा कमी केली आणि सुमारे सात वर्षांच्या तुरुंगवासानंतर तिची सुटका झाली.

आराधना जोशी

(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleलष्करी शिक्षणासाठी भारत – बांगलादेश यांच्यात करार
Next articleUkraine And Moldova: Symbolic Start Of EU Membership Talks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here