लॉकहीड मार्टिनची 11वी ‘इंडिया सप्लायर्स परिषद’, आत्मनिर्भरतेवर केंद्रित

0

लॉकहीड मार्टिन’ या जागतिक एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील नामांकित कंपनीने, आपली 11वी ‘इंडिया सप्लायर्स परिषद’, 3 नोव्हेंबर 2025 रोजी, बेंगळुरू येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. या वार्षिक कार्यक्रमाचा उद्देश, भारतीय उद्योगांना लॉकहीड मार्टिनच्या जागतिक पुरवठा साखळीशी जोडून, परस्पर सहकार्य मजबूत करणे आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताचे ‘आत्मनिर्भरतेचे’ उद्दिष्ट पुढे नेणे हा आहे.

‘परिवर्तनासाठी सहकार्य’ (Collaborate to Transform) अशी, यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. यामध्ये लॉकहीड मार्टिनच्या पुरवठा साखळी, व्यवसाय विकास आणि औद्योगिक विकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकत्र येणार असून, कंपनीचे मुख्य पुरवठा साखळी अधिकारी भारताच्या संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चेचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा आहे.

कंपनीच्या सांगण्यानुसार, ही परिषद लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्ससह, विविध भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय भागीदारांशी जोडण्यासाठी, एक रणनीतिक व्यासपीठ म्हणून काम करेल. यामुळे स्वदेशी नाविन्यतेला प्रोत्साहन मिळेल आणि भारताच्या संरक्षण निर्यात क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळेल.

लॉकहीड मार्टिनचे इंडिया कंट्री हेड मायकेल फर्नांडिस म्हणाले की, “आजवर आमच्या या पुरवठादार परिषदांनी, अनेक भारतीय कंपन्यांना जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे आणि जागतिक स्तरावर नाविन्यता आणण्यासाठी मार्ग नवीन मार्ग केले आहेत. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला बळ देण्यासाठी आणि आमच्या भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

2025 च्या परिषदेची ठळक वैशिष्ट्ये

या आगामी कार्यक्रमामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

  • आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे समर्थन करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे भाषण
  • जागतिक सोर्सिंग, उत्कृष्ट उत्पादनआणि भारतातील धोरणात्मक सुसंगतता या विषयावर लॉकहीड मार्टिनच्या मुख्य पुरवठा साखळी अधिकाऱ्यांचे भाषण
  • उत्कृष्ट भारतीय पुरवठादारांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान
  • लॉकहीड मार्टिनच्या विविध व्यवसाय विभागांचे सादरीकरण
  • भारतीय पुरवठादार आणि लॉकहीड मार्टिनच्या पुरवठा साखळी आणि व्यवसाय विकास संघांमध्ये वैयक्तिक बैठका
  • भारतीय कंपन्यांद्वारे त्यांच्या क्षमता आणि नाविन्यतेचे प्रदर्शन

गेल्यावर्षी झालेल्या परिषदेच्या 10व्या फेरीत, मोठ्या उद्योगांपासून ते MSMEs आणि स्टार्टअप्ससह सुमारे 50 भारतीय कंपन्या आणि जीई एरोस्पेस, हनीवेल, प्रॅट अँड व्हिटनी, मार्टिन-बेकर, नॉर्थ्रॉप ग्रुमन यांसारखे जागतिक भागीदार सहभागी झाले होते. या कार्यक्रमात 120हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते आणि 70 बिझनेस-टू-बिझनेस बैठका (B2B meetings) आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे सहकार्याच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या.

भारतासोबत तीन दशकांहून अधिक काळाची भागीदारी करत आणि 70 वर्षांपेक्षा जास्त काळ संबंध जपत, लॉकहीड मार्टिन देशांतर्गत संरक्षण व्यवस्थेच्या वृद्धीला हातभार लावत आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleकॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या, बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
Next articleSolar Aerospace Dismisses Claims of Joint Loitering Munition Production with Alpha Defence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here