“गेल्या अनेक आठवड्यांपासून भारतीय आणि चिनी राजनैतिक अधिकारी तसेच लष्करी वाटाघाटी करणारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. या चर्चेचा परिणाम म्हणून, सीमावर्ती भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याच्या व्यवस्थेबाबत एक करार झाला आहे, ज्यामुळे 2020 मध्ये या भागात उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण आणि निरसन झाले आहे असे मला तुम्हाला सांगायचे आहे,” असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकारांना सांगितले.
ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाव्य द्विपक्षीय बैठकीबद्दल विचारले असता, मिस्री म्हणाले, “अलीकडच्या काही आठवड्यांत भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील चर्चा सुरू आहेत. आम्ही अजूनही कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय संबंधांसाठी वेळ आणि तपशील यांबाबत समन्वय साधत आहोत.”
सीमेवरील तणावाचे निराकरण करण्यासाठी भारत-चीनमधील चर्चेतील प्रगतीबाबत ‘सावधगिरीने आशावादी’ असल्याचे सांगताना, दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा , असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.
टीम भारतशक्ती