एसीसीकडून नव्या नियुक्त्यांची घोषणा, आर. के. सिंग नवे संरक्षण सचिव तर संजीव कुमार डीडीपी सचिव

0
राजेश कुमार सिंग यांची नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती (एजन्सी फोटो)

नुकत्याच झालेल्या नवीन कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांच्या नियुक्तीनंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) विविध मंत्रालयांमधील सचिव स्तरावरील 18 नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. या नियुक्त्यांपैकी केरळ कॅडरच्या 1989च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार सिंग हे संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील.
याशिवाय 1993 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आणि सध्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) अध्यक्ष संजीव कुमार यांची संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद बऱ्याच काळापासून रिक्त आहे. सध्याचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि त्यांचे पूर्वाधिकारी अजय कुमार यांच्याकडे संरक्षण उत्पादनाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव म्हणून काम करणारे सिंग सुरुवातीला संरक्षण मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहतील. विद्यमान सचिव गिरीधर अरमाने यांचा कार्यकाळ यावर्षी 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर सिंग संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. सेवानिवृत्ती वयानंतरही सिंग यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संरक्षण सचिव म्हणून सिंग यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यरत असतील.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले मोठे फेरबदल आहेत. अनेक मंत्रालयांमधील अधिकारी पुढच्या काही काळात निवृत्त होणार आहेत, परिणामी नवीन कृषी, खर्च, बँकिंग, कॉर्पोरेट व्यवहार आणि आरोग्य  या विभागातील सचिवांच्यादेखील नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleMajor Bureaucratic Rejig: R K Singh, New Defence Secretary, Sanjeev Kumar, DDP Secretary
Next articleUkraine Attacks Russia: Kremlin Accuses West Of Helping

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here