बलजीत या २५ टनी ‘बोलार्ड पूल टग’चे नौदलाकडे हस्तांतर

0
Make in India-Indian Navy:

नौदल गोदीत कार्यक्रम,आत्मनिर्भर भारत धोरणांतर्गत बांधणी  

दि. ३१ मे: केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या सहायाने बांधण्यात आलेला बलजीत हा दुसरा २५ टनी ‘बोलार्ड पूल टग’ गुरुवारी नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आला. नौदलाच्या मुंबई येथील गोदीत (नेव्हल डॉकयार्ड) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिअर ॲडमिरल संदीप मेहता उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अंतर्गत नौदलासाठी २५ टनी ‘बोलार्ड पूल टग’ बांधण्यासाठी नौदल आणि ठाणे येथील शॉफ्ट शिपयार्ड या सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातील कंपनीने परस्पर सहयोगाचा करार केला होता. त्या करारानुसार हा टग बांधण्यात आला आहे. नौदल आणि भारताच्या जहाजबांधणी प्रबंधकांच्या नियम आणि निकषानुसार याची बांधणी करण्यात आली आहे. या टगमुळे भारतीय नौदलाच्या जहाजे आणि पाणबुड्यांना पाण्याची कमी खोली असलेल्या भागातही हालचाल करणे आणि गोदीत येणे व बाहेर जाणे शक्य होणार आहे. हा टग गोदीत असलेल्या जहाजाला लागलेली आग विझविण्यासही सक्षम आहे. त्याचबरोबर या टगच्या मदतीने मर्यादित स्वरूपातील शोध आणि बचावकार्यही राबविता येऊ शकते.

भारतीय नौदल सध्या फेरबदल आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याचबरोबर हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात भारतीय नौदलाचा वावर आणि दबदबाही वाढत आहे. या क्षेत्रातील एक सर्वंकष सुरक्षा पुरवठादार म्हणून भारतीय नौदलाकडे पहिले जाते. त्यामुळे भारतीय नौदलाची जबाबदारीही वाढली आहे. परिणामी ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या धोरणानुसार देशांतर्गत तंत्रज्ञानाने निर्मित जहाजे, पाणबुड्या आणि इतर सामग्री नौदलात समाविष्ट करून घेण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या मुळे नौदलाचे परदेशी तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्रीवरील अवलंबित्व घटण्यास मदत होणार आहे. या टगबरोबरच देशांतर्गत निर्मित सहाव्या ‘अम्युनेशन कम टॉरपॅडो कम मिसाईल बार्ज’चेही (एसीटीसीएम-एलएसएएम-२०) नौदलाकडे हस्तांतर करण्यात आले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुर्यादिप्त प्रोजेक्ट्स या ठाण्यातील कंपनीने या बार्जची निर्मिती केली आहे. नौदलाच्या ११ ‘एसीटीसीएम-एलएसएएम-२०’ बार्ज उत्पादनाच्या प्रकल्पातील हा सहावा बार्ज आहे. नौदलाच्या मुमाबी येथील डॉकयार्डवर झालेल्या कार्यक्रमात हा बार्ज नौदलाकडे सोपविण्यात आला. कमोडोर नादेल्ला रामन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी होते. हा बार्ज नौदल आर्मामेंट डेपो कारंजाकडे सोपविण्यात आला आहे.  या दोन्ही बाबी सरकारच्या स्वदेशी, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणाचे हे बार्ज फलित असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

विनय चाटी

(पीआयबी ‘इनपुट्स’सह)

 


Spread the love
Previous articleयुक्रेन संदर्भातील स्विस शांतता परिषदेला चीनची अनुपस्थिती
Next articleअमेरिकेच्या आयसेनहॉवर या विमानवाहू नौकेवर क्षेपणास्त्र हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here