2024 मध्ये जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ: WHO अहवाल

0
WHO

मलेरियामुळे 2024 या संपूर्ण वर्षात, सुमारे 6,10,000 लोक मरण पावले, ज्यामध्ये बहुसंख्य उप-सहारा आफ्रिकेतील लहान मुलांचा समावेश होता, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी सादर केला. यासोबतच वाढता औषध प्रतिरोधकता, हवामान बदल आणि निधी कपातीचे धोक्यांविषयीही त्यांनी इशारा दिला.

WHO च्या वार्षिक मलेरिया अहवालानुसार, मृतांचा आकडा 2023 मधील मृत्यूंच्या संख्येपेक्षा वाढला असून, ही वाढ अंदाजे 273 दशलक्षावरुन, 282 दशलक्षापर्यंत पोहचली आहे.

2000 सालाच्या सुरुवातीला उपाययोजनांमध्ये मोठी प्रगती झाल्यानंतर, गेल्या दशकात मलेरियाविरुद्धची लढाई जवळपास स्थगित झाली आहे. 47 देशांना मलेरिया-मुक्त म्हणून प्रमाणित करण्यात आले असतानाही, 2024 मध्ये इतर देशांतील प्रकरणांमध्ये वाढ दिसून येते, विशेषतः इथिओपिया, मादागास्कर आणि येमेनमध्ये.

आजार पुन्हा बळावण्याचा धोका

“मलेरिया हा प्रतिबंध करता येण्याजोगा आणि बरा करता येण्याजोगा असूनही, खूप लोक अजूनही या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत,” असे WHO च्या जागतिक मलेरिया कार्यक्रमाचे संचालक डॅनियल नगामीजे मदांडी म्हणाले.

त्यांनी सांगितले की, “मलेरियाच्या औषधांबाबत वाढणारी प्रतिकारशक्ती आणि काही मच्छरदाण्यांवर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांविरुद्धची वाढती प्रतिकारशक्ती, हवामान बदल आणि संघर्ष, हे सर्व घटक पसरत असलेल्या या रोगाविरुद्धच्या लढाईस मोठे आव्हान ठरत आहेत.

मलेरियाची प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या वाढीमागे, अंशत: लोकसंख्या वाढ हेही एक कारण आहे. परंतु, WHO च्या म्हणण्यानुसार, लोकसंख्या वाढ विचारात घेतल्यानंतरही मलेरियाच्या प्रकरणांचे प्रमाण वाढले आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘केस इन्सिडन्स’ म्हणतात. 2015 ते 2024 या काळात, जोखमीखाली असलेल्या दर 1,00,000 लोकांमध्ये मलेरियाच्या प्रकरणांचे प्रमाण 59 वरून 64 झाले आहे, म्हणजेच हे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, मृत्यूचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, परंतु हा फरक फार मोठा नाही. जोखमीखाली असलेल्या दर 1,00,000 लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 14.9 वरून 13.8 पर्यंत खाली आले आहे. याचा अर्थ असा की, एकूण प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, पण उपचारांमुळे मृत्यूचा धोका किंचित कमी झाला आहे.

WHO ने म्हटले आहे की, निधीची उपलब्धता देखील आवश्यकतेपेक्षा सातत्याने कमी आहे. 2024 मध्ये, देणगीदार आणि प्रभावित देश दोघांकडून मलेरिया नियंत्रणासाठी केलेली एकूण गुंतवणूक 3.9 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली, जी ९ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असलेल्या टार्गेटच्या तुलनेत खूपच कमी आहे.

ही एकूण रक्कम, आणि मागील वर्षातील प्रकरणे तसेच मृत्यूंचा डेटा, यामध्ये या वर्षातील यावर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय मदत कपातीचा समावेश अद्यापच करण्यात आलेला नाही, जी अमेरिकेत जानेवारीपासून सुरू झाली आणि ज्याचा परिणाम यावर्षीच्या मलेरियाविरोधी लढाईवर झाला आहे.

“मलेरियावरील उपाययोजनांसाठी मिळणारा अपुरा निधी, स्पष्ट संकेत देतो की: हा आजार मोठ्या प्रमाणात आणि अनियंत्रितरित्या पुन्हा बळावण्याचा धोका संभावतो,” असे नगामीजे म्हणाले.

ते म्हणाले की, “नवीन सुधारित उपाययोजना; ज्यात उपचार, निदान आणि मलेरिया लसींचा समावेश आहे, त्यांच्या मदतीने लाखो लोकांचा जीव वाचला आहे, परंतु त्यांचा व्यापक परिणाम होण्यासाठी जोखमीखाली असलेल्या अधिकाधिक लोकांपर्यंत या सुविधा पोहोचणे आवश्यक आहे, जी जबाबदारी प्रभावित देशांमधील सरकारची तसेच आंतरराष्ट्रीय देणगीदारांची आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDefence Ties Anchor India–Russia Amid Shifts
Next articleभूराजकीय अनिश्चितता असूनही, भारत-रशिया संरक्षण संबंध मजबूत: संरक्षणमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here