फिलीपिन्स अध्यक्षांच्या आगामी भारत दौऱ्यात सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित

0
फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर हे मलेशियामध्ये होणाऱ्या आसियान शिखर परिषदेपूर्वी 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत-फिलिपिन्स संबंधांमध्ये एका नवीन वळणाचे संकेत देणारी ही भेट नवी दिल्ली आणि मनिला यांच्यातील वाढत्या धोरणात्मक अभिसरणावर, विशेषतः संरक्षण, नौदल आणि सागरी सुरक्षा सहकार्यावर, भर देणारी असेल.

दक्षिण चीन समुद्रात वाढलेल्या तणावाच्या वेळी, दोन्ही राष्ट्रे लष्करी सहकार्य वाढवण्याचा आणि प्रादेशिक सुरक्षा चौकटी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, हा दौरा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासोबत संरक्षण, वित्त, कायदा, न्याय आणि व्यापार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एक उच्च-स्तरीय मंत्रिमंडळ असेल, जे द्विपक्षीय अजेंडाचे व्यापक स्वरूप अधोरेखित करेल.

सामरिकदृष्ट्या पहिला द्विपक्षीय नौदल सराव

अधिकृत बैठकीपूर्वी, भारत आणि फिलीपिन्स 3-4 ऑगस्ट रोजी Maritime Cooperative Activity  (एमसीए) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पहिल्या द्विपक्षीय नौदल सरावाचे आयोजन करणार आहे. हा संयुक्त सराव पश्चिम फिलीपिन्स समुद्रातील पाण्यात, स्कारबोरो शोलजवळ, मनिला आणि बीजिंग यांच्यात वादग्रस्त असलेल्या सागरी ठिकाणी होईल.

हे स्थान प्रतीकात्मक आहे. 2016 च्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाने UNCLOS अंतर्गत या प्रदेशात चीनच्या व्यापक सागरी दाव्यांना अवैध ठरवले असले तरी, बीजिंगने आपले नियंत्रण कायम ठेवले आहे, ज्यामुळे त्याचे फिलीपिन्ससोबत वारंवार वाद निर्माण होतात. या सरावाकडे भारताच्या नेव्हिगेशन स्वातंत्र्याला पाठिंबा आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिकच्या प्रतिबद्धतेचे संकेत म्हणून पाहिले जाते.

भारतीय नौदलाकडून गुप्तचर विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश असलेले पथक फिलिपाईन्स नौदल पथकासोबत युद्धकाळातील आणि देखरेखीच्या प्रमुख सरावांमध्ये सहभागी होतील. यामध्ये शत्रू हवाई संरक्षणाचे दमन (SEAD) आणि शत्रू हवाई संरक्षणाचा नाश (DEAD) युद्धनौका यांचा समावेश असू शकतो. मात्र याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

चार भारतीय युद्धनौका फिलीपिन्समध्ये बंदरात प्रवेश करणार

या महिन्याच्या अखेरीस भारतीय नौदलाची चार जहाजे फिलीपिन्समध्ये बंदरात प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे. त्यापैकी पहिले जहाज 30 जुलै रोजी अत्याधुनिक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज INS संध्याकसह असेल. ही तैनाती सागरी क्षेत्र जागरूकता आणि हायड्रोग्राफिक मॅपिंगमध्ये सुरू असलेल्या सहकार्याला समर्थन देईल.

भारतीय नौदल जहाजांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी तुकडी आहे जी फिलीपिन्सला गेली आहे. मागील संवाद PASSEX (पासिंग सराव) पर्यंत मर्यादित होते, परंतु अधिकाऱ्यांनी संयुक्त ऑपरेशनल तयारी आणि आपत्ती प्रतिसाद सहकार्याकडे वळण्याचे संकेत दिले आहेत.

ब्रह्मोस, आकाश आणि संरक्षण व्यापाराचा विस्तार

भारत आणि फिलीपिन्स संरक्षण व्यापारातही नवीन संधी शोधत आहेत. 2022 च्या सुरुवातीला फिलीपिन्सने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणारा पहिला आग्नेय आशियाई देश बनून बातम्यांमध्ये स्थान मिळवले, हा करार आता अंमलबजावणीच्या टप्प्यात असून एकंदर 375 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचा आहे. ही प्रणाली फिलीपिन्सच्या पश्चिम किनारपट्टीवर तैनात केली जाईल, ज्यामुळे वादग्रस्त सागरी प्रदेशातील परदेशी घुसखोरींविरुद्ध प्रतिबंध वाढेल.

संरक्षण सूत्रांनुसार, दुसऱ्या मोठ्या खरेदीसाठी चर्चा सुरू आहे – भारताची आकाश लघु-श्रेणीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, ज्याची किंमत 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. दोन्ही बाजू फिलीपिन्स तटरक्षक दलासाठी ALH (अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर) सागरी रिकॉनिसन्स प्रकारांबद्दल देखील चर्चा करत आहेत, हा एक संभाव्य करार असून तो 2021 पासून प्रलंबित आहे.

धोरणात्मक भागीदारीकडे लक्ष

राष्ट्रपती मार्कोस 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे. या भेटीत सागरी सुरक्षा, संरक्षण खरेदी, आर्थिक सहभाग आणि प्रादेशिक सहकार्य या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राजनैतिक सूत्रांच्या मते, या भेटीचा शेवट द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत घेऊन जाण्यात होऊ शकतो.

भेटीच्या उत्तरार्धात राष्ट्रपती मार्कोस 7 आणि 8 ऑगस्ट रोजी भारतीय व्यावसायिक  आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी, स्टार्टअप्स, स्वच्छ ऊर्जा, फिनटेक आणि डिजिटल इनोव्हेशनमधील संबंधांना पुढे नेण्यासाठी बंगळुरूला जातील.

प्रादेशिक स्थिरतेबद्दल वाटणारी समान चिंता

भारत आणि फिलीपिन्स त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनात वाढत्या प्रमाणात एकरूप होत आहेत, विशेषतः चीनच्या आक्रमक पवित्र्यामुळे इंडो-पॅसिफिक भाग अस्थिर होत आहे. दोन्ही देशांना म्हणजे लडाख सीमेवर भारताला आणि पश्चिम फिलीपिन्स समुद्रात फिलीपिन्सला चीनकडून सीमा आणि सागरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे, विशेषतः स्कारबोरो आणि सेकंड थॉमस शोल्सभोवती.

2020 च्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनशी शांतता साधण्याचा प्रयत्न करताना भारत अजूनही सावध आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अलिकडच्या बीजिंग भेटीदरम्यान, भारताने पुन्हा एकदा सांगितले की विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी सीमेवर शांतता असणे आवश्यक आहे.

पुढे काय?

21 व्या शतकातील परिभाषित भू-राजकीय रंगमंच म्हणून इंडो-पॅसिफिक उदयास येत असताना, भारत-फिलिपिन्स संबंध मर्यादित संरक्षण भागीदारीपासून व्यापक धोरणात्मक सहकार्यापर्यंत, खोलवर बदलत आहेत.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभारत आणि इस्रायल परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणार
Next articleतणावाच्या पार्श्वभूमीर भारतीय वायुसेनेचा पाकिस्तान सीमेजवळ सराव सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here