‘माझगाव डॉकयार्ड’चा २५० वा वर्धापनदिन साजरा

0
Mazagon Dockyard
माझगाव डॉकयार्डमधील संग्रहित छायाचित्र.

संरक्षण सचिवांच्या हस्ते विविध योजनांची सुरुवात

दि. १४ मे: भारताच्या नौदल तसेच व्यावसायिक जहाजबांधणीत मोलाचे योगदान देत असलेल्या मुंबई येथील ‘माझगाव डॉकयार्ड’चा २५०वा वर्धापनदिन संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडला. या वेळी अरमाने यांच्या हस्ते विविध प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली. त्यात मुंबई बंदर प्राधिकरणाकडून घेतलेल्या जमिनीचा हस्तांतर सोहळा, देशांतर्गत निर्मित हलकी व छोट्या पाणबुडीचा प्रारूपाचे उद्घाटन, सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आशा बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर माझगाव डॉकयार्डच्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष नाण्याचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.

माझगाव डॉकयार्ड हा भारताच्या शिरपेचातील एक चमकणारा हिरा असल्याचे संरक्षण सचिव अरमाने या वेळी  म्हणाले. भारताच्या सैनिकी तसेच व्यापारी जहाजबांधणीच्या क्षेत्रात माझगाव डॉकयार्डने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच देशाचे संरक्षण आणि अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून याच्याकडे पहिले जाते, असेही ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या बहुतांश युद्धनौका माझगाव डॉकयार्डने बांधल्या आहेत, इतकेच नव्हे तर परकी नौदलच्या नौकाही बांधून दिल्या आहेत. देशातील सर्वांत मोठे डॉकयार्ड म्हणून ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘हिद-प्रशांत क्षेत्रात भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन देण्याची व तो अधिक सक्षम करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. देशाच्या विकासात खासगी क्षेत्राचे योगदान पाहता त्यांनाही जहाजबांधणी उद्योगात येण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. संरक्षण उत्पादांच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज असून, माझगाव डॉकयार्डने आपली क्षमता आता पुरेपूर ओळखली आहे, असे अरमाने यांनी नमूद केले.

Mazagon Dockyardमुंबई बंदर प्राधिकरणाकडून घेतलेल्या जमिनीच्या विकासाच्या कामाचे उद्घाटनही अरमाने यांच्या हस्ते या वेळी आकरण्यात आले. या जमिनीवर नवे जहाज बांधण्याची व दुरुस्ती आणि देखभालीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या मुले एकाच वेळी अनेक प्रकल्पांचे काम माझगाव डॉकयार्डला हाती घेता येणार आहे.

छोटी पाणबुडी

माझगाव डॉकयार्डने छोटी पाणबुडी निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला असून, त्याचे उद्घाटनही अरमाने यांनी केले. आरोवाना असे या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले असून, त्याचे आरेखन आणि कवच निर्मिती प्रक्रिया माझगाव डॉकयार्डने पूर्ण केली आहे. माझगाव डॉकयार्ड येथे १९८४ पासून पाणबुडीचे उत्पादन करण्यात येते. मात्र, त्यातील बऱ्याच पाणबुड्या परदेशी आरेखन केलेल्या होत्या. ही छोटी पाणबुडी एक काल्पन म्हणून प्रथम मांडण्यात आली होती. त्याचबरोबर सध्या येथे पारंपरिक पाणबुडीच्या आरेखन आणि विकसनाचे काम सुरु असून ते २०२८ पर्यंत पूर्णत्त्वास जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सौरउर्जेवरील हायब्रीड तंत्रज्ञानाच्या सहायाने चालणाऱ्या बोटीचे उद्घाटनही अरमाने यांनी केले. या बोटीचा कमाल वेग तशी ११ समुद्री मैल असून, त्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानविषयक भागीदाराची मदत झाली आहे. डीझेल बोटीच्या एकदशांश इतक्या कमी खर्चात ती चालते आणि देखभालीसाठी खर्चही कमी येतो. माझगाव डॉकयार्ड हे एक छोटी गोदी म्हणून १७७४मध्ये बांधण्यात आले. १९३४मध्ये त्याचे कंपनीत रुपांतर झाले आणि १९६०पासून माझगाव डॉकयार्ड भारत सरकारच्या अखत्यारीत आहे.

विनय चाटी

(पीआयबी ‘इनपुट्स’सह)

+ posts
Previous articleUK Will Build Six Warships For Royal Marines
Next articlePakistan Unveils Plan To Sell Most State-Owned Firms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here