ट्विटर भागभांडवलाचा एसईसी खटला टेक्सासमध्ये हलवण्यात मस्क अपयशी

0
खटला
एलोन मस्क 22 मार्च 2022 रोजी जर्मनीतील ग्रुएनहाइड येथे इलेक्ट्रिक कारसाठीच्या नवीन टेस्ला गिगाफॅक्टरीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. (रॉयटर्स/फाईल फोटोच्या माध्यमातून पॅट्रिक प्लूल/पूल) 
एसईसी खटला वॉशिंग्टन डीसीवरून टेक्सासला हलवण्याची एलोन मस्क यांची विनंती फेडरल न्यायाधीशांनी फेटाळून लावली. मस्क यांनी असा युक्तिवाद केला की ते त्यांच्या वाढत्या ट्विटर भागभांडवलाच्या विलंबित प्रकटीकरणाच्या आरोपांमुळे राजधानीत स्वतःचा बचाव करण्यात खूप व्यस्त होते.

अमेरिकन जिल्हा न्यायाधीश स्पार्कल सुकनानन यांनी गुरुवारी सांगितले की त्या “मस्क यांची विनंती गांभीर्याने घेतली,” परंतु जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे “बऱ्यापैकी साधनसंपत्ती” आहे आणि ते त्यांचा किमान 40 टक्के वेळ टेक्सासबाहेर घालवतात.

“खरंच,” त्यांनी लिहिले, ज्यावेळी ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे मंत्री होते त्यावेळी  “मस्क यांच्या संक्षिप्त माहितीवरून असे दिसून येते की त्यांनी या वर्षी येथे बराच वेळ घालवला आहे.”

‘वाजवी तत्परता’

सूकनानन यांनी असेही म्हटले आहे की टेक्सासच्या न्यायाधीशांकडे त्यांच्या न्यायालयापेक्षा जास्त खटले आहेत आणि त्या “वाजवी तत्परतेने” पुढे जाऊ शकतात.

खटला हलविण्याचा प्रयत्न करताना, मस्क म्हणाले की ते “ विश्वास ठेवता येणार नाही इतके व्यस्त” आहेत जे आठवड्यात 80 पेक्षा जास्त तास काम करतात. अनेकदा कार्यालयात किंवा कारखान्यात झोपतात. त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये खटला चालवल्याने “मोठा ताण” येईल.

मस्क यांच्या वकिलांनी टिप्पणीसाठी केलेल्या विनंत्यांना त्वरित प्रतिसाद दिला नाही. सरकारी शटडाऊनचा हवाला देत एसईसीच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी मस्क यांची संपत्ती पहिल्यांदाच 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.

खटला रद्द करण्याची मागणी

एसईसीने जानेवारीमध्ये मस्क यांच्यावर खटला दाखल केला होता. याचिकेत असे म्हटले होते की 2022 च्या सुरुवातीला ट्विटरवरील त्यांचा सुरुवातीचा 5 टक्के हिस्सा उघड करण्यास 11 दिवस विलंब केल्याने त्यांना कृत्रिमरित्या कमी किमतीत 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त शेअर्स खरेदी करता आले.

मस्क यांनी दिवाणी दंड भरावा आणि संशयास्पद गुंतवणूकदारांच्या खर्चावर त्यांनी वाचवलेले 150 दशलक्ष डॉलर्स द्यावेत अशी त्यांची इच्छा आहे. मस्क हा खटला रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटरचे सर्व हक्क 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून एक्स ठेवले.

मस्क ऑस्टिनमध्ये राहतात आणि त्यांच्या कंपन्या टेस्ला, स्पेसएक्स आणि बोरिंग टनेल यांचे व्यवसाय टेक्सासमध्ये आहेत.

एसईसीचा खटला मॅनहॅटनला हलवण्याचा मस्क यांचा पर्यायी प्रस्ताव सुकनानन यांनी नाकारला. या ठिकाणी ट्विटरच्या माजी शेअरहोल्डर्सनी त्यांच्यावर खटला दाखल केला आहे.

या खटल्याचा क्रमांक 25- 25-00105 असून एसईसी विरुद्ध मस्क यूएस जिल्हा न्यायालय, कोलंबिया जिल्ह्यात तो दाखल करण्यात आला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleशटडाऊन दरम्यान ‘डेमोक्रॅटिक एजन्सी’मधील कपातीवर ट्रम्प यांचे लक्ष
Next articleव्हिएतनाममध्ये बुआलोई वादळाचे थैमान; 36 नागरिक दगावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here