Myanmar: थायलंड सीमेवर Scam कंपाउंडमधून, 100 भारतीयांची सुटका

0
Myanmar:

Myanmar मधील यांगून येथून भारतीय दूतावासाने, ज्याला ‘Scsm कंपाउंड्स’ म्हटले जाते, त्या ठिकाणी काम करणाऱ्या आणखी 6 भारतीय नागरिकांची सुटका केली आहे. या ठिकाणी सायबर क्षेत्र आणि नोकरीच्या फसवणूकी संबंधीचे स्कॅम चालतात. या वर्षात भारतीय दूतावासाने जुलैपासून आतापार्यंत तब्बल 100 भारतीयांची या ठिकाणाहून सुटका केली आहे.

आलीकडच्या महितीने परिपूर्ण अशा डिजीटल जगात, भारतातील अनेकांना या जगातील धोक्यांविषयी पुरेशी माहिती नाहीये. भारत सरकारने म्यानमारमधून आजवर 497 भारतीय नागरिकांना ज्यांच्यापैकी बहुतेकजण ऑनलाइन जॉब स्कॅमचे बळी आहेत.

याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले की, “विशेषतः आग्नेय आशियामध्ये फसव्या नोकऱ्यांची जाहिरात सर्वाधिक प्रमाणात केली जाते. हे एक प्रकारचे ऑनलाइन घोटाळेच आहेत. दुसऱ्या देशात नोकरी देण्याचे ऑनलाईन आमिष दाखवून, लोकांना त्या देशांमध्ये नेले जाते आणि त्यांना अवैध ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाते. आम्ही आजवर कंबोडियातून अशा स्कॅम्सना बळी पडलेल्या तब्बल १ हजार १६७ आणि म्यानमारमधून ४९७ भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करुन, त्यांना मायदेशी परत आणले आहे.’’

 

या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांचे सिंडिकेट, हे थायलंडच्या सीमेवर असलेल्या म्यानमारच्या म्यावाड्डी भागात सर्वाधिक सक्रिय असून, यामुळे यांगूनमधील भारतीय दूतावासाने या वर्षी जुलैमध्ये सावधगिरीचे निवेदन जारी केल्याचे, एका अहवालात स्पष्ट केले आहे.

“या देशातील संबंधित भारतीय दूतावासांशी सल्लामसलत केल्याशिवाय, अशा कोणत्याही नोकरीच्या ऑफर न स्विकरण्याबद्दल तरुणांना सतर्क करण्याच्या आमच्या पॉलिसीवर आम्ही अधिक भर देऊ,” असंही जयशंकर यावेळी म्हणाले.

दरम्यान अहवलानुसार, कंबोडिया आणि म्यानमारमधील अशाच प्रकारचे एक रॅकेट गेल्या काही वर्षांपासून तरुणांना टार्गेट करत आहे. भारतीय दूतावासाने याची पुष्टी केली आहे की, म्यानमारच्या म्यावाड्डी शहराच्या दक्षिणेकडील ‘फा लू क्षेत्र’ (Pha Lu) हे एक असे ठिकाण आहे, जिथे अनेक भारतीय नागरिकांची आजवर तस्करी झाली होती. यामध्येही मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातील काही लोकांचाही समावेश होता.

अहवालात म्हटल्यानुसार, सोशल मीडिया आणि अन्य स्त्रोतांद्वारे जाहिरात केल्या जाणाऱ्या नोकरीच्या अशा विविध ऑफर्स स्विकारण्याबाबत भारत सरकारने तरुणांना सावध केले आहे. सर्वात आधी ऑफर देणाऱ्या कंपन्यांची ओळखपत्रे भारतीय दूतावासाद्वारे पडताळण्याची शिफारस केली आहे आणि त्यानंतरच्या पुढील कारवाईसाठी सहाय्यासाठी यंगूनमध्ये संपर्क कक्ष सुरु केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला BBC वृत्तसंस्थेने, कंबोडियामध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या एका ‘Job Scam’ वर प्रकाश टाकला होता. ज्यामध्ये भारतीय नागरिकांना कंबोडियात बोलवून त्यांना बेकायदेशीर ‘Cyber Scam’ करण्यासाठी भाग पाडले गेले जात होते. UN (United Nations) च्या एका अहवालात म्हटल्याप्राणे, ऑगस्ट 2023 मध्ये म्यानमार येथे 1 लाख 20 हाजारांहून अधिक लोकांना तर कंबोडियामध्येही अंदाजे 1 लाख लोकांना Cyber Fraud च्या योजनांमध्ये काम करायला भाग पाडण्यात आले होते.

याठिकाणी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात होते आणि नंतर त्यांना मनी लाँड्रिंग (Money laundering) आणि क्रिप्टो फसवणूक (Cripto Scam) तसेच तथाकथित प्रेम घोटाळ्यांपर्यंत (Love Scam) विविध बेकायदेशीर कामांमध्ये ढकलले जात होते.

म्यानमारमधील गृहयुद्धामुळे तेथील सरकारला ‘Scsm कंपाउंड’ भागात, उघडपणे आपले कायदे लागू करणे अशक्य झाले आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, या स्कॅम्सना बळी पडणारे लोक त्यांच्या जमिन व्यवहाराच्या किंवा नोकरीच्या चिंतेत असल्यामुळे, स्कॅमर कंपन्यांकडून आलेल्या असाइनमेंट ऑफर्सचा स्विकार करण्यापूर्वी त्यांची योगरित्या पडतळाणी करत नाहीत आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांची फसवणूक होते. जेव्हा ते नोकरीच्या ठिकाणी पोहोचतात तेव्हाच त्यांना समजते की त्यांची फसवणूक झाली आहे, परंतु दुर्देवाने त्याविरोधात काही हालचाली करण्यासाठी खूप उशीर झालेला असतो.

ऐश्वर्या परीख | अनुवाद- वेद बर्वे

 


Spread the love
Previous articleIndo-pacific प्रदेशातील US तळांना, चिनी क्षेपणास्त्रांचा धोका
Next articleनौदल प्रमुखांची ‘स्टॅटर्जीक चर्चेसाठी’ इंडोनेशियाला महत्वपूर्ण भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here