अमेरिकेच्या विमान दुर्घटनेतील मृतांविषयी, पतंप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

0
विमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या भीषण विमान दुर्घटनेतील जीविताहानीबद्दल आपले दु:ख व्यक्त केले.  अमेरिकन एअरलाइन्सचे एक विमान आणि आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर यांच्यात शुक्रवारी मोठी टक्कर झाली. अमेरिकेतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक अशी या अपघाताची नोंद झाली आहे.

या दुर्घटनेतील मृतांविषयी शोक व्यक्त करत, पंतप्रधान मोदींनी X द्वारे एका पोस्टमध्ये म्हटले की: “वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दु:ख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही अमेरिकेच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत.” मोदी यांनीअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग करत ही पोस्ट जारी केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात 64 प्रवासी होते. प्रशिक्षण मोहिमेवर असलेल्या युएस आर्मीच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरला या विमानाची जोरदार धडक बसली, ज्यामध्ये 3 सैनिक उपस्थित होते.

बचाव पथकांनी आतापर्यंत एकूण 28 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

दरम्यान, अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर- जे ब्लॅक बॉक्स म्हणून ओळखले जाते, ते परत मिळवण्यात यश आल्याचे, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने CNN या वृत्तवाहिनीला सांगितले.

ट्रम्प यांचा Diversity Programme वर आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष- डोनाल्ड ट्रम्प यांनी, वॉशिंग्टन डीसीमधील विमान अपघातावर प्रतिक्रिया देतेवेळी, हवाई सुरक्षा मानकांशी तडजोड केल्याबद्दल बराक ओबामा आणि जो बायडन यांच्या प्रशासनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या ‘विविधता धोरणांना’ दोष दिला.

“ओबामा, बायडन आणि डेमोक्रॅट्सनी या डायव्हर्सिटी धोरणांध्ये सुरक्षिततेपेक्षा, धोरणांच्या पूर्ततेला अधिक महत्व दिले आहे”, असा आरोप करत, ”मी मात्र कायम सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देतो”, असा दावा ट्रम्प यांनी केला.

दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना, उड्डाण करणे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले. “आमच्याकडे जगातील सर्वात सुरक्षित विमान प्रवास आहे आणि आम्ही तो कायम राहील याची काळजी घेऊ,” असेही ते म्हणाले.

दरम्यान या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या नोकरभरतीच्या पद्धतीवर जोरदार टीका होत आहेत. काही समिक्षकांनी असा युक्तिवाद केला आहे की, या प्रक्रियेतील विविधता, समानता आणि समावेश (DEI) कार्यक्रम भेदभावपूर्ण असू शकतो.

तथापि, या उपक्रमांच्या समर्थनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे ऐतिहासिक आणि चालू भेदभावाचा मुकाबला करण्यासाठी असून, अशा गटांवरील भेदभाव कमी करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यात जातीय अल्पसंख्याक समाविष्ट आहेत.

(IBNS च्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleअमेरिकेतील विमान दुर्घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट
Next articleNATO Scrambles For Drones That Can Survive The Arctic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here