NASA च्या अंतराळ कार्यक्रमांंमध्ये चिनी अधिकाऱ्यांवर बंदी: अहवाल

0

NASAने, वैध अमेरिकन व्हिसा असलेल्या चिनी नागरिकांना त्यांच्या सुविधा आणि प्रणालींमध्ये प्रवेश नाकारला आहे, अशी माहिती ‘द एपोक टाइम्स’ (The Epoch Times) अहवालातून समोर आली आहे.

आतापर्यंत NASA मध्ये, कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या किंवा संशोधनात योगदान देणाऱ्या चिनी नागरिकांना, 5 सप्टेंबर रोजी कळवण्यात आले की, NASA च्या प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि सुविधा वापरण्याचा त्यांचा अधिकार रद्द करण्यात आला आहे.

NASA च्या प्रेस सेक्रेटरी- बेथनी स्टीव्हन्स यांनी या निर्णयाची पुष्टी केली. त्यांनी वृत्तपत्राला सांगितले की, “आपल्या कामाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी NASA ने, चीनी नागरिकांसंबंधी अंतर्गत कारवाई केली आहे. यात आमच्या सुविधा, साहित्य आणि नेटवर्कमध्ये त्यांना असलेला प्रत्यक्ष आणि सायबरसुरक्षा प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे.”

हा निर्णय अशा काळात घेण्यात आला आहे, जेव्हा अनेक प्रकरणांमध्ये चिनी नागरिक बीजिंगसाठी गुप्तहेरगिरी करत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, चिनी अंतराळवीरांना आधीपासूनच International Space Station (ISS) ला भेट देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे, कारण अमेरिकेने NASA ला चीनसोबत डेटा शेअर करण्यास मनाई केली होता.

याशिवाय, अमेरिकेतून कर्करोगाचे संशोधन चीनमध्ये नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही एका चीनी डॉक्टरवर करण्यात आला होता.

गेल्या महिन्यात, Yunhai Li (35) चिनी वैद्यकीय संशोधकावर, अमेरिकेतील निधीवर आधारित कॅन्सर संशोधनाशी संबंधित व्यापार गुपितांची चोरी केल्याचा आणि ते चीनमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला

रिपोर्ट्सनुसार, 9 जुलै रोजील ली चीनला जाण्याचा प्रयत्न करत असताना, U.S. कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर अडवले.

या घटनेवर बोलताना, हॅरिस काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयाने ‘X’ वर लिहिले की: “एम.डी. अँडरसन कर्करोग संशोधन संस्थेतील (MD Anderson cancer research) माजी संशोधक युन्हाई ली (Yunhai Li) यांच्यावर ‘ट्रेड सीक्रेट्सची चोरी’ (तिसऱ्या श्रेणीचा गुन्हा) आणि ‘सरकारी दस्तऐवजांमध्ये फेरफार’ (वर्ग अ गैरवर्तन) यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.”

पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार, “Trade secrets च्या चोरीसाठी 2 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास व $10,000 पर्यंत दंड होऊ शकतो.”

“सरकारी दस्तऐवजात फेरफार केल्यास 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व $4,000 दंड होऊ शकतो.”

हॅरिस काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सीन टीअर (Sean Teare) यांनी Fox26 Houston ला सांगितले की: “तो चीनला जाण्यासाठी विमानात चढत असतानाच आम्ही त्याला अडवले.”

ते पुढे म्हणाले की, “ती बौद्धिक संपदा (intellectual property) आमच्याकडेच राहते, जेणेकरून आम्ही लोकांचे प्राण वाचवू शकू.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleOTA Chennai: Shaping Warriors, Scholars & Leaders
Next articleबांगलादेशात अवामी लिगनंतर ‘जमात’चा वाढता प्रभाव, भारताची कोंडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here