दि. १० मे: व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांची नौदलाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्हाइस ॲडमिरल भल्ला ‘कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर’ या विषयातील तज्ज्ञ मानले जातात. नौदलाच्या संज्ञापन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्धशाखेत त्यांना १९८९मध्ये कमिशन मिळाले होते. आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यात विविध युद्धनौका आणि नौदलाच्या किनारपट्टीवरील आस्थापनांचा समावेश आहे.
व्हाइस ॲडमिरल भल्ला यांनी ‘कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर’ या विषयातील विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नौदलाच्या विविध युद्धानौकांचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडली आहे. त्यात ‘आयएनएस निशांक,’ ‘आयएनएस तारागिरी,’ ‘आयएनएस बियास,’ यांचा समावेश आहे. तसेच, नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. या पदावर असताना त्यांनी २०२२मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती ताफा निरीक्षण समारोहाचे (प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्हू) व ‘मिलन-२२’ या बहुपक्षीय नौदल सरावाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे. त्याचबरोबर नौदलाच्या कार्मिक विभागाचे सहप्रमुख, नौदल अकादमीचे प्रशिक्षण प्रमुख आणि परदेशात राजनैतिक जबाबदाऱ्याही त्यांनी पार पडल्या आहे. नौदलाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते नौदलाच्या पश्चिम विभागाचे उपप्रमुख म्हणून काम पाहत होते.
व्हाइस ॲडमिरल भल्ला हे ‘रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज,’ लंडन, ‘नेव्हल वॉर कॉलेज, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन,चे माजी विद्यार्थी असुने, त्यांनी संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयात एमफिल, लंडन येथील किंग्ज कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. नौदलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
विनय चाटी