फ्रेंच शिपयार्डमधील प्रमुख कंपनी असलेल्या नेव्हल ग्रुपने मंगळवारी जाहीर केले की इंडोनेशियन नौदलाकडून दोन स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या खरेदीसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, कराराची नेमकी किंमत किती हे उघड करण्यात आलेले नाही. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने मोठा करार रद्द केल्यानंतर डच सरकारने नेव्हल ग्रुपला पाणबुडीचा करार दिल्यानंतर हा करार झाला आहे, ज्यामुळे कंपनीला आणखी चालना मिळाली आहे.
आशिया-पॅसिफिक प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने अलिकडच्या वर्षांत फ्रेंच संरक्षण कंपन्यांबरोबर अनेक करार केले आहेत. 2021 मधील ताज्या कराराचा एक भाग म्हणून इंडोनेशियाने 8.1अब्ज डॉलर्स किंमतीच्या 42 राफेल लढाऊ विमानांची मागणी केली आहे. नेव्हल ग्रुपने जाहीर केले आहे की ते इंडोनेशियातील पीटी पीएएल शिपयार्डमध्ये 18 टॉरपीडो आणि क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकणारे डिझेल-इलेक्ट्रिक स्कॉर्पिन्स तयार करतील. यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान नेव्हल ग्रुपद्वारे पुरविले जाईल, तर इंडोनेशिकडून पाणबुड्यांचे व्यवस्थापन, संचालन आणि देखभाल केली जाईल.
नेव्हल ग्रुपने जाहीर केले की या करारामुळे हजारो दीर्घकालीन, उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होतील. “इंडोनेशिया आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक युतीच्या या नवीन अध्यायाचा भाग होणे ही नेव्हल ग्रुपसाठी खूप मोठी सन्मानची गोष्ट आहे,” असज फ्रेंच फर्मचे मुख्य कार्यकारी, पियरे एरिक पॉमलेट म्हणाले. ते म्हणाले की. या जहाजांमुळे देशाचे सागरी सार्वभौमत्व बळकट होईल आणि इंडोनेशियाच्या नौदलाला समुद्रात प्रादेशिक श्रेष्ठता प्राप्त करण्यात मदत होईल. पॉमेलेट पुढे म्हणाले, “पाणबुड्यांव्यतिरिक्त, PT PAL सोबतची आमची धोरणात्मक भागीदारी इंडोनेशियन संरक्षण उद्योगाकडून देशातील नौदलाला भविष्यात घडू शकणाऱ्या युद्धाची सक्रिय तयारी करण्यासाठी देखील मदत करेल”.
नेव्हल ग्रुपकडन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन 72 मीटर पाणबुड्या, ज्या 300 मीटरपर्यंत खोलवर डुबकी मारू शकतात आणि 12 दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात, त्या इंडोनेशियामध्ये तयार केल्या जातील. त्यामध्ये 31 नाविकांच्या चमूची वाहतूक करता येऊ शकेल.
नेव्हल ग्रुपने भारताला सहा, ब्राझीलला चार, चिलीला दोन आणि मलेशियाला दोन स्कॉर्पीन पाणबुड्या विकल्या आहेत.
पीटी पीएएलचे अध्यक्ष संचालक, काहारुद्दीन जेनोद यांनी नेव्हल ग्रुपच्या निवेदनात म्हटले आहे की, या पाणबुडी कराराने “संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या स्थानिक अभियंत्यांच्या क्षमतेवर इंडोनेशियन सरकारकडून उच्च बांधिलकी आणि विश्वास दर्शविला आहे.” ते पुढे म्हणाले, “भविष्यात इंडोनेशिया पाणबुडी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवू शकेल अशी अपेक्षा आहे.”
रवी शंकर