म्यानमारमधील प्रादेशिक लष्करी मुख्यालयावर बंडखोरांचा कब्जा, जुंटाला धक्का

0
म्यानमारमधील
प्रातिनिधिक फोटो

म्यानमारमधील बंडखोरांच्या एका गटाने गुरुवारी दावा केला की त्यांनी चीनच्या सीमेवरील प्रमुख प्रादेशिक लष्करी मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. वाढती बंडखोरी दडपण्यासाठी धडपडणाऱ्या सत्ताधारी जुंटाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा पराभव असू शकतो. म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने (एमएनडीएए) सरकारी सैन्याविरुद्ध 23 दिवसांच्या लढाईनंतर, चीनच्या सीमेपासून सुमारे 120 किमी (75 मैल) अंतरावर असलेल्या उत्तर शान राज्यातील लाशिओ हे मोक्याचे शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

“आमच्या सैन्याने निर्णायक विजय मिळवला आहे आणि आता उर्वरित शत्रू सैन्याला आम्ही पिटाळून लावत आहोत. शहराला आता पूर्णपणे मुक्त घोषित करण्यात आले आहे,” असे सोशल मीडियावर आपले मुखपत्र शेअर करत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यामध्ये जनतेला शांत राहण्याचे आणि शहराच्या प्रशासनाचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

रॉयटर्स स्वतंत्रपणे गटाच्या या दाव्याची पडताळणी करू शकलेले नाही. शिवाय म्यानमारमधील जुंट्याच्या प्रवक्त्याने देखील प्रतिक्रियेसाठी केलेल्या फोनकॉलला प्रतिसाद दिला नाही.

एमएनडीएए अनेक वांशिक अल्पसंख्याक बंडखोर गटांपैकी एक आहे जे सैन्याला त्यांच्या प्रदेशापासून दूर ठेवण्यासाठी लढा देत आहेत. सशस्त्र प्रतिकार चळवळीशी सैल युती करून या गटाने जुंटा राजवटीला कमकुवत करण्यासाठी देशव्यापी मोहीम चालवली आहे.

या संघर्षाचे रुपांतर आता गृहयुद्धात झाले आहे, जे म्यानमारच्या सुसज्ज लष्करासाठी त्याच्या संयुक्त पाच दशकांच्या राजवटीतील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार या संघर्षामुळे 26 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

एक दशकाच्या तात्पुरत्या लोकशाहीनंतर 2021 मध्ये सत्ता परत ताब्यात घेतलेल्या लष्कराने 53 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात अनेक आघाड्यांवर लढा देऊन, अपंग अर्थव्यवस्थेचे सुनियोजन आणि व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेत अडथळा आणला आहे.

जुंटाने आपल्या विरोधकांचे वर्णन देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे “दहशतवादी” असे केले आहे.

एमएनडीएएने अलीकडेच चीनने मध्यस्थी करून केलेल्या युद्धविरामाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर नव्याने आपले आक्रमण सुरू केले आहे. चीनला त्याच्या सीमेवरील लढाई आणि व्यापारावरील त्याच्या परिणामाची चिंता आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सर्व बाजूंनी शत्रुत्व थांबवण्याचे, संवाद साधण्याचे तसेच चिनी व्यवसाय आणि नागरिकांना कोणतीही हानी पोहोचणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

“आम्ही शांततेसाठी प्रोत्साहन देत राहू आणि चर्चेसाठी प्रयत्न करत राहू,” असे प्रवक्ते माओ निंग यांनी एका नियमित ब्रीफिंगमध्ये सांगितले.

ऑनलाईन वृत्तवाहिनी म्यानमार नाऊने एमएनडीएएच्या बाजूने लढणाऱ्या आणखी एका सशस्त्र गटाच्या कमांडरचा हवाला देत लाशिओ येथील प्रादेशिक कमांड मुख्यालय ताब्यात घेतल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

म्यानमारच्या विशेष सल्लागार परिषदेने या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या विश्लेषणानुसार, म्यानमारच्या 86 टक्के आणि लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश भाग व्यापलेल्या टाऊनशिप्सवरील अधिकार गमावल्यामुळे, जुंटाचे म्यानमारवर कोणतेही प्रभावी नियंत्रण उरलेले नाही.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)


+ posts
Previous articleArmy Contingent Departs For Multinational Military Exercise To Mongolia
Next articleड्रॅगनच्या मगरमिठीतून श्रीलंकेची सुटका भारत करू शकले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here