भारतीय नौदल प्रमुख- (CNS) ‘ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी’ (Adm DK Tripathi) यांनी आज स्टॅटर्जी चर्चेसाठी इंडोनेशियाला भेट दिली. दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ॲडमिरल त्रिपाठी यांनी आजपासून इंडोनेशियाच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली आहे.
ही भेट India आणि Indonesia यांच्यातील विकसित होत असलेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीशी सुसंगत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: इंडो-पॅसिफिक (Indo-pacific) प्रदेशातील दोन्ही देशांचा नौदल सहयोग आणि सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर देण्याबाबत या दौऱ्यादरम्यान चर्चा केली जाणार आहे.
या विशेष भेटीदरम्यान, ॲडमिरल त्रिपाठी हे इंडोनेशियाचे (निवृत्त संरक्षण मंत्री- ‘लेफ्टनंट जनरल स्जाफ्री सजामसोएद्दीन’ यांच्यासह अन्य प्रमुख इंडोनेशिया सरकार आणि संरक्षण नेत्यांशी उच्चस्तरीय चर्चा करणार आहेत. ज्यामध्ये जनरल अगुस सुबियान्तो, इंडोनेशियन सशस्त्र दलांचे कमांडर तसेच ॲडमिरल मुहम्मद अली आणि इंडोनेशियन नौदलाचा चीफ ऑफ स्टाफ या सर्वांचा समावेश आहे.
या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रांतील ऑपरेशनल सहयोग, संयुक्त प्रशिक्षण उपक्रम आणि क्षमता-निर्मिती उपाययोजनांद्वारे द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाईल.
Strengthening Maritime Ties
Adm Dinesh K Tripathi, #CNS, on a four day official visit to Indonesia from 15 to 18 Dec 24.
The visit aims to consolidate existing bilateral defence relations between #India & #Indonesia, with a focus on enhancing #NavalCooperation.
🇮🇳-🇮🇩… pic.twitter.com/8KpEWW9KuP— SpokespersonNavy (@indiannavy) December 14, 2024
ही भेट भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील मजबूत सागरी भागीदारीवर प्रकाश टाकते. दोन्ही देशातील संरक्षण संबंध बळकट करणे आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील स्थिरतेसाठी सामायिक दृष्टीकोनावर चर्चा करण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमध्ये संयुक्त नौदल सराव, बंदर भेटी आणि समन्वित प्रशिक्षण कार्यक्रमांसह दोन्ही देशांच्या नौदलांचे दीर्घकालीन सहकार्याबाबत याआधीही अनेक भेटी आणि बैठका झाल्या आहेत.
ॲडमिरल त्रिपाठी यांचा हा दौरा म्हणजे, 43वी भारत-इंडोनेशिया समन्वय भेट (IND-INDO CORPAT) असून, 10 ते 18 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (IMBL) हा दौरा सुरू राहील. दोन्ही देशांच्या सैन्यांमधील ऑपरेशनल समन्वयाला ही भेट विशेष अधोरेखित करणारी असल्याचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ॲडमिरल त्रिपाठी यांच्या या इंडोनेशिया दौऱ्यामुळे, द्विपक्षीय संबंधांना बळ मिळेल आणि सागरी सुरक्षा, नेव्हिगेशन स्वातंत्र्य आणि इंडो-पॅसिफिकमधील प्रादेशिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या वचनबद्धतेची पुष्टी होईल,असे तज्ज्ञ अभ्यासक सांगतात.
रवी शंकर | टीम भारतशक्ती
अनुवाद- वेद बर्वे