नुकतीच शस्त्रक्रिया झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू कट्टरपंथी सदस्यांकडून पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांमुळे त्यांच्या सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्पाच्या मागे एकत्र येण्याचे आवाहन करण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत.
अति उजव्या विचारांचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री इटामार गवीर आणि अति-रुढीवादी पक्षांनी कायद्याच्या विरोधात मतदान करू शकतात किंवा मतदानापासून दूर राहू शकतात असा इशारा दिल्यामुळे, राज्याच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने कायदा मंजूर व्हावा यासाठी प्रोस्टेट शस्त्रक्रियेतून बरे झालेले नेतान्याहू डॉक्टरांनी मनाई केलेली असूनही नेसेटमध्ये उपस्थित राहिले.
कर वाढ आणि खर्चातील लक्षणीय कपात यांचे मिश्रण असणारे युद्धकाळातील कठोर पॅकेज म्हणून ओळखले जाणारे हे विधेयक अल्पमताने मंजूर झाले असले तरी त्याला झालेला विरोध हा इस्रायलच्या इतिहासातील अति उजव्या नेतान्याहू यांच्या आघाडीतील सतत वाढणाऱ्या अंतर्गत कलहाचे आणखी एक लक्षण ठरले.
मागील महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मतदानात, इस्रायलच्या महाधिवक्त्याला काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या आघाडीतील पक्षांनी बंडखोरी करूनही इस्रायली खासदारांनी अर्थसंकल्पीय विधेयकाला अल्पमताने मंजुरी दिली.
नेतान्याहू यांनी मंगळवारी सांगितले की, “मंत्री बेन-गवीर यांच्यासह आघाडीच्या सर्व सदस्यांनी युतीला धक्का पोहोचेल असे वर्तन आणि उजव्या विचारसरणीच्या सरकारचे अस्तित्व धोक्यात आणणे थांबवावे अशी माझी अपेक्षा आहे.”
गवीर यांनी त्यांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली असलेल्या इस्रायली पोलिसांसाठी अधिक निधीची मागणी केली आहे आणि अति-रुढीवादी पक्षांनी त्यांंच्या समुदायातील काही सदस्यांना सैन्यात भरती होण्यास भाग पाडणाऱ्या कायद्याला विरोध दर्शविला आहे.
हा अर्थसंकल्प नंतर नेसेट फायनान्स आणि इतर समित्यांकडे जातो, जिथे त्यात अजून काही बदल होऊ शकतात. किमान जानेवारीपर्यंत ते पूर्णपणे मंजूर होण्याची चिन्हे नाहीत. 31 मार्चपर्यंत इस्रायलच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात नेतान्याहू सरकार अपयशी ठरल्यास नवीन निवडणुका होतील.
नेतान्याहू यांनी सप्टेंबरमध्ये विरोधी खासदार गिडियोन सार आणि न्यू होप पक्षातील त्यांचे चार सदस्य आणून, त्यांना सत्ताधारी आघाडीतील इतर सदस्यांवर कमी अवलंबून राहण्यास सक्षम करून, नेसेटमध्ये 64-56 आघाडी असलेल्या त्यांच्या आघाडीला बळकट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात सार यांची परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी हमास अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर गाझा आणि इतर आघाड्यांवर सुरू झालेल्या युद्धामुळे इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
अर्थव्यवस्थेत शून्य वाढ झाली आहे परंतु पुरवठ्याच्या समस्यांमुळे महागाई वाढली आहे आणि इस्रायलच्या लोकांचे जीवनमान अधिक आव्हानात्मक बनले आहे.
(1 अमेरिकन डॉलर = 3.6402 शेकेल)
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)