आयसिसचा झेंडा फडकवणाऱ्या अमेरिकी लष्कराच्या एका अनुभवी सैनिकाने उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांना धडक देत नवीन वर्षाच्या दिवशी न्यू ऑर्लिन्सच्या फ्रेंच क्वार्टर या गजबजलेल्या भागात आपला पिकअप ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला. तपास अधिकाऱ्यांच्या मते हा एक समन्वित हल्ला असावा.
एकेकाळी अफगाणिस्तानात सेवा बजावलेला टेक्सासचा 42 वर्षीय अमेरिकी नागरिक शमसूद-दीन जब्बार म्हणून ओळखला जाणारा ट्रक चालक धडक दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला.
या हल्ल्यात संशयिताकडून झालेल्या गोळीबारात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 30 जण जखमी झाले. ‘कॅनल ॲण्ड बॉर्नबॉन स्ट्रीट’ येथे पहाटे 3.15 च्या सुमारास (0915 जी. एम. टी.) ही घटना घडली. हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून संगीत आणि बारसाठी ते ओळखले जाते. नववर्ष स्वागतासाठी तिथे मोठी गर्दी जमली होती.
पोलीस आणि राजकीय नेत्यांनी संशयिताच्या साथीदारांनाही पकडण्याचे आश्वासन दिले आहे.
एफबीआने सांगितले की, न्यू ऑर्लिअन्समधील ट्रकमध्ये पोलिसांना शस्त्रास्त्रे आणि किमान एक बॉम्ब (explosive device) , तर फ्रेंच क्वार्टरमध्ये दोन बॉम्ब (explosive devices) सापडले असून ते सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहेत.
दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्यामुळे, अधिकाऱ्यांनी दरवर्षी नवीन वर्षाच्या दिवशी न्यू ऑर्लिअन्समध्ये खेळला जाणारा महाविद्यालयीन स्तरीय फुटबॉलचा सामना ‘शुगर बाऊल’ गुरुवार दुपारपर्यंत पुढे ढकलला आहे. नोट्रे डेम आणि जॉर्जिया यांच्यात हा सामना रंगणार होता. पोलिसांनी संभाव्य स्फोटक उपकरणांचा शोध घेण्यासाठी परिसराची व्यापक प्रमाणात तपासणी सुरू केली असून आणखी काही धागेदोरे मिळतात का याचा शोध सुरू आहे.
9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या NFL सुपर बाऊल स्पर्धेचे यजमानपद न्यू ऑर्लियन्स भूषवणार आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) सांगितले की, भाड्याच्या या पिकअप ट्रकवर आयसिसचा झेंडा फडकवण्यात आला होता, त्यामुळे दहशतवादी संघटनांशी या चालकाचा काही संबंध होता का या दिशेने तपास सुरू झाला आहे.
एकटा जब्बारच या घटनेत सहभागी होता यावर आमचा विश्वास नाही. एफबीआयच्या सहाय्यक विशेष एजंट प्रभारी अलेथिया डंकन यांनी पत्रकारांना सांगितले की, तपास अधिकारी अनेक संशयितांच्या शोधात आहेत.
पीडितांमध्ये कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळाल्याने अलिकडेच नवीन अपार्टमेंटमध्ये रहायला आलेली 4 वर्षांच्या मुलाची आई, न्यूयॉर्कचा एक अर्थविषयक कर्मचारी, सुट्टीसाठी घरी आलेला एक विद्यार्थी खेळाडू आणि मिसिसिपी येथील 18 वर्षीय परिचारिका यांचा समावेश आहे.
बायडेन यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘घृणास्पद’ कृत्य म्हणत या घटनेचा निषेध केला. लास वेगासमधील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर टेस्ला ट्रकला लागलेल्या आगीचा आणि या घटनेचा परस्परसंबंध असू शकतो का? याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत तरी या दोन्ही घटनांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे बायडेन म्हणाले.
“एफबीआयने मला असेही सांगितले की हल्ल्याच्या काही तासांपूर्वी हल्लेखोराने मारण्याची इच्छा व्यक्त करत आयसिसपासून प्रेरित झाल्याचे दर्शविणारे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केले,” असे बायडेन यांनी न्यू ऑर्लिन्सच्या संशयिताबद्दल सांगितले.
सीएनएनने तपासाबद्दल माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की संशयिताने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यात त्याने आयसिसमध्ये सामील होण्याच्या स्वप्नांचा उल्लेख केला असून घटस्फोटानंतर आपल्या कुटुंबाची हत्या करण्याचा विचारही व्यक्त केला.
आयसिस -ज्याला इस्लामिक स्टेट किंवा इसिल असेही म्हणतात-हा एक मुस्लिम अतिरेकी गट आहे ज्याने एकेकाळी इराक आणि सीरियातील लाखो लोकांवर दहशतीचे राज्य केले. अर्थात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या निरंतर लष्करी मोहिमांनंतर हे राज्य संपुष्टात आले.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जरी आयसिस कमकुवत झाले असले, तरी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहानुभूती दाखवणाऱ्यांची भरती करणे सुरू ठेवले आहे.
Public records नुसार जब्बार ह्यूस्टनमधील स्थावर मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात काम करत होता. चार वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या प्रचारात्मक व्हिडिओमध्ये, जब्बारने ह्यूस्टनच्या पूर्वेस सुमारे 80 मैल (130 कि. मी.) अंतरावर असलेल्या ब्युमॉन्ट या शहरात आपला जन्म झाला आणि तिथेच आपण वाढलो असे सांगितले होते. मानव संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान तज्ञ म्हणून अमेरिकी सैन्यात 10 वर्षे घालवल्याचे त्याने सांगितले होते.
जब्बार मार्च 2007 ते जानेवारी 2015 पर्यंत नियमित लष्करात कार्यरत होता. नंतर जानेवारी 2015 ते जुलै 2020 पर्यंत लष्कराच्या राखीव दलात होता, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. फेब्रुवारी 2009 ते जानेवारी 2010 पर्यंत तो अफगाणिस्तानात तैनात होता आणि सेवेच्या शेवटी त्याने स्टाफ सार्जंटचे पद भूषवले.
‘आरडाओरडा आणि किंचाळ्या ‘
अलाबामा येथील माईक आणि किम्बर्ली स्ट्रिकलँड यांनी सांगितले की ते ब्ल्यूग्रास मैफिलीसाठी न्यू ऑर्लिअन्समध्ये आले होते आणि त्यांच्या हॉटेलकडे परत जात होते, जिथून थोड्याच अंतरावर ट्रकने काही पादचाऱ्यांना धडक दिली.
“सर्वत्र लोक होते”, किम्बर्ली स्ट्रिकलँडने एका मुलाखतीत सांगितले. “तुम्हीला फक्त किंचाळ्या, इंजिनचा आवाज आणि हा प्रचंड मोठा धक्का आणि मग लोक ओरडतात आणि सगळीकडे मेटलचा कचरा- मेटल आणि मृतदेह चिरडण्याचा आवाज.”
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी फ्रेंच क्वार्टर परिसरात सुमारे 400 अधिकारी ड्यूटीवर होते, ज्यात पादचारी क्षेत्रात कोणालाही वाहन चालवण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरता अडथळा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
जगभरातील पादचारी मॉल्सवरील वाहनांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, न्यू ऑर्लिन्स बॉरबॉन स्ट्रीट परिसरातील वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालणारे बोलार्ड म्हणून ओळखले जाणारे पोलादाचे अडथळे काढून टाकणे आणि बदलण्याची प्रक्रिया सुरू होती.
सुपर बाऊलचे बांधकाम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. तात्पुरता उपाय म्हणून, पोलिस वाहने आणि अधिकाऱ्यांनी अडथळे उभारण्याचे प्रयत्न केले, असे किर्कपॅट्रिक म्हणाले.
किर्कपॅट्रिक म्हणाले, “आमच्याकडे खरोखरच एक योजना होती, परंतु दहशतवाद्याने त्याचा पराभव केला.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)