चीनच्या K-Visa प्रकरणावरुन, सोशल मीडियावर चीनींचा भारतीयांविरुद्ध संताप

0
K Visa

अलीकडेच, चीनने परदेशी तंत्रज्ञानातील कुशल कर्मचाऱ्यांना नवीन K-Visa देण्यास अधिकृतपणे सुरूवात केली आहे. मात्र, याच प्रकरणावरुन सोशल मीडियावर भारत विरुद्ध चीन अशी संतापाची लाट पसरली आहे. यासंबंधी अनेक मिम्स आणि ट्रोलिंग पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, एका संतप्त सोशल मीडिया वापरकर्त्याने एक पोस्ट केली आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की: “चीन ही केवळ सरकारची मालमत्ता नसून, ती चीनी जनतेची देखील आहे. आम्ही K-व्हिसाचा ठामपणे विरोध करतो!” अशी शेकडो उदाहरणे सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

याव्यतिरिक्त हजारो लोकांनी, नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या वेबसाईटवर जाऊन याप्रकरणी आपली तक्रार नोंदवली आहे. लोकांचे साईटवरील ट्रॅफिक इतके प्रचंड होते की साईट क्रॅश होऊ नये, याकरिता ती बंद करण्यात आली. (खाली यासंबधी एक स्क्रीनशॉट जोडला आहे). चिंताजनक बाब म्हणजे, चीनमधील लोकांचा K-व्हिसा विरोधातील हा संताप, आता भारतीयांकडे वळताना दिसत आहे. हा व्हिसा अन्य वेगवेगळ्या देशातील कुशल कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा जारी करण्यात आला आहे, तरीही चीनी नागरिकांचा भारतीयांवरील रोष मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.

नॅशनल पीपल्स काँग्रेस ऑनलाइन पोर्टलवरून प्राप्त

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये तर, भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या PLA (People’s Liberation Army) च्या सैनिकांचा उल्लेख केला आहे. काही ट्रोलर्सनी यापुढे जात, भारताला थेट शत्रू घोषित केले आहे आणि भारतीयांना या नवीन व्हिसा योजनेअंतर्गत चीनमध्ये प्रवेश नाकारावा, अशी मागणी देखील केली जात आहे.

एका नेटिझनने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्टच म्हटले आहे की: “शत्रू राष्ट्र भारताने चीनमध्ये प्रवेश करू नये.” तर, दुसऱ्या एका व्यक्तीने, गलवान संघर्षाची आठवण करून देत, थेट सरकारला प्रश्न विचारला आहे की: “तुम्हाला खरंच असे वाटते का, की पुन्हा एकदा आमचे सैनिक मारले जावेत??”

या दोन्ही टिप्पण्यांमधून हे स्पष्ट होते की, चीनींच्या K-व्हिसाविरोधातील भावनांनी आता भारतविरोधी संतापाची जागा घेतली आहे.

अशाच आणखी एका पोस्टमध्ये, भारताला टार्गेट करत लिहिले होते की: “या चोरांना (भारतीयांना) आनंदी होण्याची संधी देऊ नका,” आणि या पोस्टसोबत गालवान संघर्षातील एका PLA सैनिकाचा फोटो जोडलेला होता. 

“हे थांबवण्यासाठी मी रस्त्यावर देखील उतरेन,” असा इशारा एका युजरने दिला होता.

विविध भारतीय विषयांवर आधारित अनेक मिम्सही, वेइबोवर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.

या मीममध्ये, चीनच्या PLAच्या सैनिकांची कमकुवत आणि असहाय्य म्हणून थट्टा केली जात आहे, त्यांच्या “आदर्श” देशभक्तीच्या प्रतिमेची तुलना भारतीयांकडून मारहाण किंवा अपमानित होण्याच्या “वास्तविकतेशी” केली जात आहे. या मीममध्ये, गलवान संघर्षाच्या संदर्भांचाही उल्लेख आगे, ज्यामध्ये असे सूचित केले आहे की: चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी काठ्या आणि दगडांनी मारहाण केली. K-व्हिसा प्रतिक्रियेशी जोडलेल्या या संदर्भांद्वारे आपली निराशा व्यक्त करण्यासाठी, चिनी नेटिझन्ससाठी (विडंबनात्मकपणे, कधीकधी स्वतःलाही कमी लेखणारे) हा व्यंग्यात्मक आणि अपमानजनक मार्ग निवडला आहे, जिथे भारताविषयी राग व्यक्त केला जात आहे.
K-व्हिसा संदर्भातील वादादरम्यान, गलवान संघर्षातील शहीदांच्या प्रतिमा प्रसारित करून नेटिझन्सनी भारतावर टीका केली आहे.
K-व्हिसा वादादरम्यान गलवान शहीदांच्या प्रतिमा प्रसारित करून नेटिझन्सनी भारतावर टीका केली आहे.

याआधी, ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ‘जोकर’ म्हणून चेष्टा केली होती, तेच आता त्यांना अचानक दूरदृष्टी असलेला नेता मानू लागले आहेत. (विशेषत: त्यांचे इमिग्रंट्सविरोधातील धोरण आणि H-1B व्हिसावर त्यांनी लादलेले निर्बंध, जे प्रामुख्याने भारतीयांना प्रभावित करतात, तेव्हा एक जोकरही ‘एकमेव सत्यवादी’ वाटू लागतो.)

जरी हा संताप, बहुतांशी प्रमाणात राष्ट्रवादाच्या चौकटीत राहूनच व्यक्त केला जात असला, तरी त्यातून चीनमधील वर्णद्वेष किंवा परदेशी नागरिकांविषयी असलेली असुरक्षिततेची भावना झळकत आहे. जर पाश्चिमात्य देशांमधील स्थलांतरांच्या चर्चांमध्ये अशाप्रकारचा द्वेष दिसून आला असता, तर त्याला अपायकारक ठरवले गेले असते, सरकारकडून त्याविषयी विरोध व्यक्त केला गेला असता.

दरम्यान, पिपल्स डेली या सरकारी वृत्तपत्राने K-व्हिसाविरोधाती संतापाला, तो “वैचारिकदृष्ट्या आणि भाषिकदृष्ट्या चुकीचा आणि अपायकारक” असल्याचे म्हटले आहे.

या व्हिसाचा मूळ उद्देश, सध्या चीनमध्ये भासत असलेल्या 30 दशलक्ष कारखाना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेला भरून काढणे हा आहे, असे पिपल्स डेलीने स्पष्ट केले आहे. त्यांनी विरोध करणामागील 4 प्रमुख कारणे देखील सांगितली आहेत. काही जणांच्या मानण्यानुसार, चीनमध्ये पुरेसै कौशल्य आहे, काहींना आली नोकरी जाण्याची भीती आहे, काही स्थलांतराच्या चिंतेमुळे हैराण आहेत आणि काहीजणांना हा सुरक्षेवर घाला वाटतो आहे. मात्र, या सर्व चिंता आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे निर्माण झाल्या असल्याचे, सरकारचे म्हणणे आहे.

K-व्हिसावर होणारी टीका, ऐतिहासिक संदर्भ देऊनही व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये राजकीय संकेतही आहेत. सध्याच्या नेत्यांची तुलना अशा सम्राटांशी केली जात आहे, जे हितशत्रूंनी वेढलेले होते, वास्तवाशी त्यांचा संपर्क तुटला होता आणि ज्यामुळे पुढे जाऊन त्यांची सत्ता कोसळली.

चीनसारख्या देशात, जिथे मतभेद अगदी सहज दाबून टाकले जातात आणि जिथे खुल्या मतप्रदर्शनासाठी फारशी मोकळीक नाही, तिथे K-व्हिसासंबंधीचा हा वाद आणखी मोठे स्वरूप धारण करू शकतो, आणि नेमकी हीच गोष्ट सरकारसाठी सर्वात मोठे चिंतेचे कारण असू शकतो. हा वाद, आता अशा एका पिढीसाठी संघर्षाचे प्रतीक बनला आहे, जी पिढी बेरोजगारीने ग्रासलेली आहे.

चीनच्या भविष्याबद्दल असलेल्या चिंता आणि अस्वस्थता दुर्लक्षित करता येण्याजोग्या नाहीत. बीजिंगसाठी तर ही स्थिती अधिकच गंभीर आहे. जागतिक कौशल्याला देशात आमंत्रित केल्यामुळे, चिनी जनतेचा तिथल्या सरकारवल असलेला विश्वास डळमळीत तर होणार नाही ना, हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

मूळ लेखिका- रेशम

+ posts
Previous articleगाझा फ्लोटिलाने नोंदवली संदिग्ध जहाजांची हालचाल, सुरक्षिततेचा इशारा जारी
Next articleIndia to Host 30 Army Chiefs for UN Peacekeepers Meet: Focus on Gender, Technology, and Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here