उत्तर आफ्रिका भारताच्या रडारवर: संरक्षणमंत्री लवकरच मोरोक्को दौऱ्यावर

0

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान चार दिवसांच्या अधिकृत मोरोक्को दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर आफ्रिकेतील त्यांच्या या पहिल्याच दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात असून, भारताच्या आफ्रिकेतील संरक्षण-औद्योगिक उपस्थितीत वाढ करण्याच्या भूमिकेचा हा एक भाग आहे.

हा उच्चस्तरीय दौरा, पुढील वर्षी होणाऱ्या भारत-अफ्रिका फोरम शिखर परिषदेसाठी (India-Africa Forum Summit) पार्श्वभूमी तयार करतो आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे, भारत-अफ्रिका भागीदारीला नवीन दिशा देणे.

MKU: मोरोक्कोमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय संरक्षण कंपनी

कानपूरस्थित MKU ही भारताची पहिली संरक्षण कंपनी आहे, जी मोरोक्कोमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. Royal Moroccan Armed Forces सोबत, त्यांनी गेली 4 वर्षे जवळून काम केले असून, सध्या ती मोरोक्कोमध्ये पूर्णपणे कार्यरत असलेली एकमेव भारतीय संरक्षण कंपनी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, MKU ने बॅलेस्टिक हेलमेट्स, बॉडी आर्मर, नाईट व्हिडन बायनॉक्युलर्स, ग्रेनेड लाँचर्स सारखी Sighting systems आणि Surveillance उपकरणे मोरोक्कोच्या लष्कराला पुरवली आहेत. ही उपकरणे सैनिकांच्या सुरक्षेत आणि लढाऊ कार्यक्षमतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

MKU आणि मोरोक्कोच्या संरक्षण संस्थांमधील दिर्घकालीन भागीदारीमुळे, भारत-मोरोक्को संरक्षण संबंध दृढ झाले असून, तांत्रिक सहकार्याची विश्वासार्ह पायाभरणी झाली आहे. विशेषतः soldier protection आणि electro-optics क्षेत्रातील त्यांच्या कौशल्यामुळे, मोरोक्कोच्या पायदळ आणि विशेष दलांचे आधुनिकीकरण सुलभ झाले आहे.

Tata Advanced Systems: सामरिक सहकार्याचा नवीन अध्याय

2024 मध्ये, Tata Advanced Systems Ltd (TASL) ने मोरोक्को सरकारसोबत सामरिक करार केला, ज्याअंतर्गत Casablanca येथे 8×8 Wheeled Armoured Platform (WhAP) चे स्थानिक उत्पादन आणि असेंब्ली केली जाईल.

DRDO आणि Tata Motors यांच्या सहकार्याने विकसित केलेले हे वाहन, भारताच्या लडाख सीमेजवळ काही प्रमाणात वापरात आहे. Casablanca येथील 20,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारले जाणारे उत्पादन केंद्र, एक ऐतिहासिक कामगिरी ठरते:

  • भारताची पहिली परदेशातील संरक्षण उत्पादन यंत्रणा
  • मोरोक्कोमधील प्रथमच मोठ्या प्रमाणात लष्करी असेंब्ली प्लांट
  • आफ्रिकेतील निर्यातीसाठी संभाव्य केंद्रबिंदू

TASL च्या सहभागामुळे, भारताचे संरक्षण सहकार्य सह-उत्पादन आणि औद्योगिक इकोसिस्टम उभारणीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

या प्रकल्पांतर्गत, भारताकडून काही सब-सिस्टम्स आणि घटक पाठवले जातील, तर शेवटचे असेंब्ली कार्य मोरोक्कोमध्ये होईल. यामुळे स्थानिक रोजगार, प्रशिक्षण आणि पुरवठादार विकासासही चालना मिळेल.

मोरोक्कोचीच निवड का? धोरणात्मक वेळ, सामायिक हितसंबंध

राजनाथ सिंह यांचा मोरोक्को दौरा, आफ्रिकेतील वाढत्या भूराजकीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. जिथे चीनने लष्करी तळ, शस्त्र पुरवठा आणि पायाभूत कर्ज देत आफ्रिकेत प्रभाव वाढवला आहे, तिथे भारत सहभागीपणावर आधारित क्षमता-विकासाचे पर्याय देतो आहे.

भारताने अलीकडील काळात Indian Ocean Region (IOR) आणि आफ्रिकेतील संरक्षण सहकार्य वाढवले आहे. याचाच एक भाग म्हणून AIKEYME सागरी युद्धसराव यावर्षी टांझानियामध्ये आयोजित करण्यात आला, ज्यात 10 आफ्रिकन राष्ट्रांनी सहभाग घेतला होता.

दुसरीकडे, Djibouti येथील चीनचे लष्करी तळ, आणि 20 हून अधिक आफ्रिकन राष्ट्रांना त्यांनी स्वस्त दरात केलेली शस्त्रांची विक्री, यामुळे आफ्रिकेतील सामरिक अवलंबनाच्या बाबतीत चिंता वाढली आहे. SIPRI च्या आकडेवारीनुसार, आफ्रिकेतील टॉप 10 लष्करी दलांपैकी 7 दलांकडे आता चिनी आर्मर्ड वाहने आहेत.

या पार्श्वभूमीवर, भारताचे प्रशिक्षण, संयुक्त विकास व सहउत्पादनावर आधारित मॉडेल अधिक आकर्षक ठरत आहे.

आफ्रिकेसोबत संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर

MKU च्या आधीपासून असलेल्या उपस्थितीमुळे आणि TASL च्या नव्या भागीदारीमुळे, भारत आफ्रिकेतील संरक्षण क्षेत्रात विविध आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करत आहे.

राजनाथ सिंह यांचा दौरा पुढील बाबींवर लक्ष केंद्रीत करतो: दुय्यम संरक्षण सहकार्य वाढवणे, चालू प्रकल्पांचा आढावा घेणे, संयुक्त उपक्रम आणि निर्यातीसाठी नवीन संधी शोधणे आणि भारत-अफ्रिका फोरम शिखर परिषदेसाठी बहुपक्षीय पुढाकाराची तयारी करणे.

मोरोक्को: भारतासाठी पश्चिम आणि उत्तर आफ्रिकेचे प्रवेशद्वार

भारतासाठी मोरोक्को हे फक्त एक मित्रराष्ट्र नाही. मोरोक्को भारतासाठी पश्चिम आणि उत्तर आफ्रिकेचे प्रवेशद्वार, तसेच ‘Make in India for the World’ मोहिमेसाठी एक आदर्श तळ ठरू शकतो.

राजनाथ सिंह, जेव्हा आपल्या दौऱ्यादरम्यान कॅसाब्लांकामध्ये दाखत होतील, तेव्हा हा दौरा भारताच्या साऊथ टू साऊथ संरक्षण राजनैतिक धोरणात एक निर्णायक क्षण ठरेल, जिथे औद्योगिक महत्त्वाकांक्षा आणि सामरिक दृष्टीकोन यांचा समन्वय दिसून येईल.

मूळ लेखिका– हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय लष्कराने ड्रोन परिवर्तनाला दिली गती
Next articleफेंटानिल: अमेरिकेने केले काही भारतीय अधिकाऱ्यांचे, कुटुंबियांचे व्हिसा रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here