ट्रम्प यांच्या नव्या संवादाच्या प्रस्तावानंतर, उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी

0
क्षेपणास्त्र

शुक्रवारी, उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावर समुद्राच्या दिशेने एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, अशी माहिती दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दिली. वॉशिंग्टनकडून नव्या राजनैतिक संवादाच्या प्रयत्नांनंतरही वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, क्षेपणास्त्र चाचण्यांच्या मालिकेतील ही नवीन चाचणी पार पडली.

राजनैतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपण

दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी प्रमुखांनी सांगितले की, चीनच्या सीमेजवळील उत्तर कोरियाच्या वायव्य भागातून हे संशयित कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. अंदाजे 700 किलोमीटरचा (435 मैल) प्रवास करून, या क्षेपणास्त्राने जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील समुद्रात जाऊन पडले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांनी, उड्डाणादरम्यान या क्षेपणास्त्रावर नजर ठेवली आणि त्याचा मागोवा घेतला, तसेच यासंबंधी माहिती जपानसोबत शेअर केली. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची यांनी, या चाचणीदरम्यान कोणतीही हानी झाली नसल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

उत्तर कोरियाने यशस्वी घोषित केलेल्या, गेल्या काही आठवड्यांतील कमी पल्ल्याच्या आणि अतिशय वेगवान (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्र चाचण्यांच्या मालिकेनंतर, हे नवे प्रक्षेपण करण्यात आले.

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेसोबतच्या ठप्प पडलेल्या संवादाच्या पार्श्वभूमीवर झालेलेल हे नवे प्रक्षेपण, उत्तर कोरियाच्या विरोधी भूमिकेचे आणि दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नाचे प्रतीक आहे.

ट्रम्प यांच्याकडून संवादाचे संकेत

या क्षेपणास्त्र चाचणीनंतर थोड्याच वेळात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, यांच्याशी पुन्हा भेट घेण्याच्या आपल्या तयारीचे संकेत दिले. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना ट्रम्प यांनी सांगितले की, ते खुल्या संवादासाठी तसेच अशा विषयांवरील बैठकीसाठी या प्रदेशात पुन्हा येण्यास तयार आहेत.

जरी अद्याप कोणतीही औपचारिक भेट झाली नसली, तरी ट्रम्प यांच्या विधानांमुळे अमेरिका–उत्तर कोरिया राजनैतिक संवाद नव्याने सुरू होण्याच्या शक्यतांवर चर्चा पुन्हा एका सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांची शेवटची भेट 2019 मध्ये, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात आंतर-कोरियाई सीमेवरील पानमुन्जोम या शांतताप्रिय गावात झाली होती.

किम जोंग उन यांनी, ट्रम्प यांच्या या नव्या आवाहनाला सार्वजनिकरित्या प्रतिसाद दिलेला नाही, परंतु यापूर्वी त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटींबद्दल “चांगल्या आठवणी” असे उद्गार काढले आहेत. तरीही, किम यांची ठाम भूमिका आहे की, जोपर्यंत वॉशिंग्टन, ‘उत्तर कोरियाने आपला आण्विक कार्यक्रम बंद करावा’ हा त्यांचा आग्रह सोडत नाही, तोपर्यंत कोणताही नवीन सुरू होऊ शकत नाही.

वाढता तणाव आणि लष्करी भूमिका

गुरुवारी, उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनावर तीव्र टीका करत असा आरोप केला की, आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणांवरून, उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर घातलेल्या नव्या निर्बंधांमुळे प्योंगयांगला विरोध केला जात आहे. मंत्रालयाने यावर प्रतिसाद देण्याचे कबुल केले, परंतु तो नेमका कशाप्रकारे दिला जाईल, हे स्पष्ट केले नाही.

अलीकडेच झालेल्या सिऑल भेटीदरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी, वॉशिंग्टनच्या दक्षिण कोरियासोबतचा “भक्कम” सुरक्षा कराराचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “अमेरिकन सैन्य आपल्या प्रादेशिक लवचिकतेत वाढ करत असली तरी, उत्तर कोरियाच्या भडकावू कारवायांना रोखणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

गेल्या महिन्यात, ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दक्षिण कोरियामध्ये आयोजित एका प्रादेशिक शिखर परिषदेसाठी येण्यापूर्वी, उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये प्योंगयांगने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि समुद्रावरून जमिनीवर मारा करणाऱ्या अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आल्याची नोंद आहे.

प्रादेशिक विश्लेषकांच्या मते, या नवीन प्रक्षेपणामुळे किम जोंग उन यांची, शस्त्रप्रदर्शन आणि मर्यादित राजनैतिक संवाद यांचा समन्वय साधून, भविष्यातील चर्चांमध्ये स्वतःची ताकद वाढवण्याची रणनीती स्पष्ट होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleHAL–GE Engine Deal Signed as Delays Cloud LCA Tejas Deliveries and Export Prospects
Next articleमालदीव लष्करी विमान खरेदीसाठी सज्ज, पहिल्या हवाई तळाचे उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here